पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १. न येणे, हा दृश्याचा बाध नव्हे. तर ते मिथ्या आहे, असे आत्मसाक्षात्कारा- नतर समजणे हा बाध आहे. त्यामुळे समाधीमध्ये असे पर्यत जरी योग्याला जगाचा प्रत्यय न आला तरी समाधी सोडून उठल्यावर म्हणजे व्युत्थान दशेत, झोपेतून उठल्यावर जसे हे जग पूर्वीप्रमाणेच दु खरूपाने भासते त्याप्रमाणे, भासल्यावाचून रहात नाही. तेव्हा, हे रामा, अनेक कष्ट सोसून सपादन केलेल्या समाधीपासून तरी क्षणिक समाधान-सुग्वाच्या पलीकडे काही लाभ होतो का ? मुळीच नाही. आता-नेहमी समाधीतच रहावे व्युत्थान पावूच नये म्हणजे तरी ज्ञानावाचून अक्षय मुख मिळेल की नाही ?-म्हणून म्हणशील, तर त्यात काही अर्थ नाही. कारण अक्षय निद्रेप्रमाणे ती अवस्था होणार. म्हणजे अज्ञानाचा उच्छेद झाला नाही तो नाहीच. शिवाय अक्षय समावि दुलेभ आहे. त्यामळे जेव्हा जेव्हा चित्ताचा उदय होईल तेव्हा तेव्हा दृश्यभ्रम झात्यावाचून रहाणार नाही. कारण हे मनोरूपी दृश्य असताना समाधीविषयी प्रयत्न करणाऱ्या पुरुपालाही त्याचे निरसन करिता येणे अशक्य आहे. आता हा द्रष्टा अज्ञ असल्या- मुळे तो पापाणादि अनात्मवस्तूचीच समाधीत भावना करील व त्यामुळे तद्रूप होईल म्हणून म्हणावे तर त्या योग्यास फलकालीही तो अनान्म पदार्थच अनुभावास येणे शक्य असल्यामुळे दृश्यतेचा बाध होणार नाही. केवल दृक्-शक्ति ( ज्ञान ) अवशिष्ट राहणे हा हेतु सिद्ध होणार नाही. शिवाय समाविबलाने दुःखशून्य पाषाणभावाची जरी प्राप्ति झाली, तरी तोच भाव सतत कायम राहील, असे समजणे व्यर्थ आहे. कारण पाषाणतुल्य निर्विकल्पसमाधि अक्षय रहाते, असा कोणाही समाधिनिष्ठाचा अनुभव नाही. असल्या समाधी आजपर्यंत रूढ झालेल्या नाहीत, व दीर्घ प्रयत्नानतर रूढ होतील, असे जरी क्षणभर समजले, तरी त्या सर्व ससारशातिरूप मोक्षप्रद नव्हेत, हे उघड आहे. तस्मात् विद्यमान असल्यासारिखे भासणारे हे जग तप, जप, ध्यान, समाधि इत्यादि उपायाच्या योगाने बाधित होईल ही अज्ञकल्पना आहे. कमलाच्या फुलांतील एका लहानशा छिद्रात ज्याप्रमाणे पुढे होणाऱ्या कमलाच्या वेलीचे बीज असते त्याप्रमाणे द्रष्टयाच्या ठायीं दृश्यबुद्धि असते. ह्मणने बीजामध्ये नसलेला वृक्ष त्याच्यापासून उत्पन्न होतो, असे समजणे जसें चुकीचे आहे, त्याप्रमाणे द्रष्टयाच्या ठिकाणी दृश्य नसते, असे सम-