पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ बृहद्योगवासिष्ठसार. वस्तूचा कधी अभाव होत नाही असा नियम आहे. तपादि दुसऱ्या कोणत्याही साधनाच्या योगाने आत्मसाक्षात्कार होत नाही व तो होई तों द्रष्टा कोणत्याही जरी अवस्थेत जाऊन राहिला तरी त्याला तेथे दृश्याचा भास झाल्यावाचून रहात नाही. यास्तव एका गावातून किवा घरातून उठून दुसरीकडे जाऊन बसल्यावर, मी देशत्याग किंवा गृहत्याग केला, असे नुस्ते समजल्यानेच जसा खरोखर देशादि-त्याग होत नाही, ( कारण दुसरीकडे गेल्यावर सुद्धा त्याला तेथील गावाची व घराची गरज असते ) त्याप्रमाणे जप, ध्यान इत्यादिकाच्या योगाने मनास व्यवहारापासून हटवून अत.करणातील उपास्य किवा ध्येय वस्तूकडे जरी ते लाविले तरी त्यामुळे दृश्याचा खरा त्याग होत नाही. जप, ध्यान, अध्ययन इत्यादिकाच्या योगानेच कित्येक तृप्ति मानून रहात असतात, पण ती त्याची तृप्ति भुकेने व्याकुळ झालेल्या पुरुषास पेज प्याल्यामुळे होणाऱ्या तृप्तीप्रमाणे क्षुद्र होय. पड्स अन्नाच्या भोजनामुळे होणाऱ्या तृप्तीसारखी ती परम तृप्ति नव्हे. अरे राघवा, परमाणुरूप आत्म्यामध्यही ब्रह्माडाचा समावेश होणे शक्य आहे. कारण आत्मज्ञानाच्या योगाने जगाचा बाध होईतों चित्परमाणूच्या पोटात सुद्धा त्याचा आभास पडल्यवाचून रहाणार नाही. आरसा कोठेही जरी असला तरी त्याच्या समोर आलेला पर्वत, समुद्र, पृथ्वी, नदी इत्यादिकाचे प्रतिबिंब जसे त्यात पडते, त्याप्रमाणे चिदाकाश- रूपी आरशात दृश्य प्रतिबिबित होते, आणि त्यामुळे दुःख, जन्म, जरा- मरण, स्थूल-सूक्ष्म अस्थिर पदार्थाचे ग्रहण इत्यादि सर्व होते. आत्मज्ञाना- वाचून सविकल्प समाधीच्या योगानेच दृश्याचे परिमार्जन करिता येईल, अशी आशा करणेही व्यर्थ आहे. कारण त्या(दृश्या)चे स्मरण केल्या- वाचून परिमार्जन करिता येणार नाही व त्याचे स्मरण केल्यास समाधीचा भग होणार. त्याचप्रमाणे निर्विकल्पसमाधीच्या योगानेही दृश्य जगाचा बाध होणे अशक्य आहे. कारण दृश्य असेपर्यंत निर्विकल्प समाधीच्या योगानेही त्याचा बाध होणे अशक्य आहे. कारण दृश्य असे पर्यंत निर्विकल्पसमाधीच प्राप्त होणार नाही. समाधीमध्ये चित्त आहे, असें मान- त्यास चेतनत्वही अवश्य असणार व त्याचा बाध होतो, असे मान- ल्यास तीच तुरीय-अवस्था होणार. समाधीमध्ये दृश्याचे स्मरण किवा भानही होत नाही हे खरे पण त्याचे विस्मरण होणे किवा अनुभव