पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १. १०१ ठिकाणी भ्रातीने भासणारे जग ब्रह्माहून निराळे नाही. ब्रह्म व जग याची सत्ता एकच आहे. पण ती ( सत्ता ) स्वयसिद्ध ब्रह्माचे ठायी स्वाभाविकपणे असते व जगाचे ठायी स्वाभाविकपणे नसते. कारण जगाची सत्ता ब्रह्माच्या अधीन आहे. सोन्याच्या कड्याची सत्ता सोन्याच्या सत्तेहून निराळी नाही व सोन्याच्या सत्तेनेच कडे सत्तावान् असते, हे प्रसिद्ध आहे. जगाला जर स्वतःची सत्ता नाही तर त्याच्याठायीं ती भासते कशी? ह्मणून ह्मणशील तर सागतो. खोट्या मृगजळाच्या सत्तेप्रमाणे किवा गारुड्याच्या गारुडी सत्तेप्रमाणे ती भ्रमाने भासते. ह्मणूनच त्या भासणाऱ्या जगाच्या सत्तेला सर्वज्ञानी अविद्या, ससृति, बध, माया, मोह, महत्, तम इत्यादि नावे योजिली आहेत. आत्मज्ञानाच्या योगाने तिचा नाश होतो. झणून तिला अविद्या ह्मणतात. देवलोक, मनुष्यलोक, पशुपक्ष्यादि तिर्यक् प्राणी व वृक्ष-पाषाणादि नारकी योनी यात जन्मादिरूप ससरण करण्यास ही कारण होत असल्यामुळे या सत्तेला ससृति ह्मणतात. ही चैतन्याच्या पारतत्र्यास कारण होते, ह्मणून हिला बध ह्मणतात. ही मिथ्या असल्यामुळे हिला माया हे नाव दिले आहे. भ्रमाला कारण होत असल्या- मुळे हिला मोह हे यथार्थ नाव योजिले आहे. ही दुस्तर असल्यामुळे हिला महत् मटले आहे व आत्मस्वरूपास ही आच्छादित करीत असल्यामुळे हिला तम ही सज्ञा दिली आहे रामा, मी तुला अगोदर बधाचे स्वरूप सागतो. झणजे मोक्षाचे स्वरूपही सहज समजेल. द्रष्टयास दृश्याची सत्ता सत्य वाटणे, हाच बध होय. दृश्य जगाच्या योगानेच द्रष्टा बद्ध झाला आहे. दृश्याच्या अभावीं तो मुक्त होतो. जग, मी, तू इत्यादि मिथ्या आत्म्यास दृश्य ह्मणतात. याचा जोपर्यत संभव असतो तोपर्यत मोक्ष होत नाही. पण हे दृश्य, नाही, नाही, नाहीं; अशा संकल्पोत्पादक व्यर्थ प्रलापानी नाहीसे होत नाही तर उलट आत्मज्ञानावांचून जिहेर्ने उच्चारिलेल्या या शब्दाच्या योगाने दृश्य-व्याधि अधिक वाढते. अनेक सर्क, तीर्थाटन, नियम इत्यादिकाच्या योगानेही या रोगाचा क्षय होणार नाही. दृश्याच्या अस्तित्वाची अनादराने उपेक्षा करून चालत नाही; तर विचाराने तिचा बाधच करावा लागतो. दृश्याची स्वतःसत्ता जर मानली तर तिचा बाध होणे अशक्य होणार व मग मोक्षाची आशाही करावयास नको. कारण-असत् वस्तूचा कधी भाव (अस्तित्व) नसतो व सत्