पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० ३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १. पावतो, तोच धर्माचरणाने स्वर्गास जातो, तोच अधर्म करून नरकात पडतो व आत्मसाक्षात्काराने तोच मुक्त होतो हे खरे, पण आत्मा उत्पन्नच होत नाही. स्वस्वरूपाचे ज्ञान न झाल्यामुळे तो उत्पन्न होतो, इत्यादि भ्रम होतो. आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान नसल्यामुळेच त्यास बध असल्यासारिखे वाटते. यास्तव आत्म्याच्या बोधाकरिता दृश्य जगाचा असभव आहे, असे आता अगोदर मी तुला सागतो. उत्पत्ति, वृद्धि इत्यादि विकाराचा सबध या दृश्य ससाराशीच असतो. आत्मा त्रिकाली निर्विकार असल्यामुळे त्याच्याशी, त्या किवा दुसऱ्या कोणत्याही विकाराचा मुळीच सबध नसतो. उपनिपदातही अक्षरशः असेच सागितले आहे. यास्तव बध द्रष्ट-कोटींत येत नाही. तो दृश्यकोटींतच रहातो. या प्रथम सर्गात मी तुला हा सिद्धातच सक्षेपत मागतो व पुढे त्याचाच विस्तार करीन. आत्मा त्रिकाली निर्विकार आहे, असा जो वर उल्लेख केला आहे, तो सत्य कसा ते आता तू पहा. हे जे चराचर जग दिसत आहे तें सर्व, स्वप्न जसे गाढ निद्रेत लीन होते त्याप्रमाणे, प्रलयात नष्ट होते. झणजे साख्याची प्रकृति, व नैयायिकाचे परमाणुही त्यावेळी अव- शिष्ट रहात नाहीत सर्व दृश्य जगाचा लय झाला असता, अमूर्त असल्यामुळे क्रियारहित, त्रिविध परिच्छेदशून्य असल्यामुळे गभीर, रूपरहित असल्यामुळे जे तेजही नव्हे व स्वय- प्रकाशरूप असल्यामुळे जे तम( अंधकार )ही नव्हे, सर्व धर्मरहित असल्यामुळे जे अवर्णनीय आहे, • अज्ञानाने आच्छादित झाल्यामुळे किवा प्रपचाच्या अनेक सस्काराचे आधाररूप असल्यामुळे जे विशेषतः व्यक्त नाही, असे काहीं सत् अवशिष्ट रहाते. त्या सत् वस्तूचा अधिकाऱ्यास उपदेश करिता यावा ह्मणून ऋत, आत्मा, पर, ब्रह्म, सत्य इत्यादि सज्ञा विद्वानानी कल्पिल्या आहेत. श्रुतीसारख्या उत्कृष्ट प्रमाणावरून त्याचे ज्ञान होत असल्यामुळे त्यास ऋत ह्मणतात. ते सर्वास व्यापून रहात असल्यामुळे, सर्वाचे ज्ञानद्वारा ग्रहण करीत असल्यामुळे, विषयाचा उपभोग घेत असल्यामुळे व सर्व वस्तूमध्ये त्याची अनुवृत्ति झाल्यामळे अणजे ते अखड असल्यामुळे त्यास आत्मा ह्मणतात. त्याच्या ठायी सत्यतेची. परमावधि असल्यामुळे त्यास पर ह्मणतात. सर्वाइन मोठे भसल्यामुळे किवा जगदाकारास पुष्टि देत असल्यामुळे ते ब्रह्म होय.