पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ बृहद्योगवासिष्ठसार. हा, न्याय आह्मी येथे सक्षेपतः सुचविला आहे. पुढे याचेच विस्तारपूर्वक वर्णन करणार आहो. या न्यायाने ब्रह्माकाशामध्ये अध्यासक्रमाने हा सवे दृश्यप्रपच आहे किवा या सृष्टीत अपवादक्रमाने ब्रह्मावाचून दुसरे काही नाही, असा निश्चय झाला असता “भगवन् , हे नाश पावणारे काय आहे ? उत्पन्न कोण होते व वृद्धि कोणाची होते?" इत्यादि जे प्रश्न तू मागे केले होतेस त्याचे आपोआप निरसन होते. कारण सत् वस्तूचा नाश होत नाही व असत् वस्तु उत्पन्न होऊन वाढत नाही, हा सिद्धात समजल्यावर नाश पावणे, उत्पन्न होणे व वृद्धि पावणे हे धर्म कोणाचे आहेत, असा प्रश्नच करिता येत नाही. असो, तर, हे रघुवीरा, आता मी तुला हेच तत्त्व, प्रमाण व अनुभव याच्या द्वारा मला जसे सम- जले आहे, परीक्षण करून पाहिल्यावर जसे त्याचे वस्तुत्व सिद्ध झाले आहे, साधन व युक्ति याच्या योगाने ज्या क्रमाने त्याचे निरूपण करिता येते व श्रोत्याच्या बुद्धीचा जसा परिपाक झाला असेल त्याप्रमाणे, सागतो. चैतन्याकाश जीवभावास प्राप्त होऊन स्वप्नामध्ये हे जग पहाते. स्वप्नात पाहिलेले विषय जागे होताच नाहीसे होतात. पण त्याचे ज्ञान नाहीसे होत नाही. त्याप्रमाणे जगाचा बाध झाला तरी त्याचे ज्ञान बाधित होत नाही. यावरून ज्ञानशक्ति नित्य असल्याचे ठरते. त्याचप्रमाणे ' अह' ह्मणजे मी, असे प्रत्यक्-आत्म्याशी तादात्म्य पावून आतरभावाने व त्व ह्मणजे तूं असे पराक्-बाह्य-भावाने अनुभवास येणारे जग स्वप्नातील ससाराप्रमाणेच अगदी पूर्णपणे आहे. झणजे ते मिथ्या आहे, यात काही सशय नाही. असो, मी आता हे तुला तिसरे जगदुत्पत्ति-प्रकरण सागतो. याच्या श्रवणाने तुझा बध नाहीसा होईल. कारण दृश्य जगत् आहे, असे वाट- ल्यामुळेच बध होतो. पण दृश्य प्रपच नाही. तो भासत असला तरी मिथ्या आहे, असें एकदा निश्चयपूर्वक समजले की, बध नाहीसा होतो. आता दृश्य जगाच्या अस्तित्वाचाच असभव कसा आहे, ते क्रमाने ऐक. उत्पत्ति, वृद्धि, नाश, स्वर्ग, नरक, इत्यादि बध हा द्रष्टयाचा (आत्म्याचा) धर्म आहे, असा अनुभव येत असल्यामुळे त्यास दृश्य कोटीत न घालता द्रष्ट-कोटींतच घेतले पाहिजे, असे सकृदर्शनी वाटते. पण ते अक्षरशः खरे नाही. कारण जो उत्पन्न होतो त्याचीच वृद्धि होते; तोच नाश