पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऽरुतवन. । ईश्वराची दया इस्राएल लोकांवर पूर्ण आहे, हैं शास्रावरूनच दिसून येतें असें नाही; परंतु त्यांबरोबरचे दुसरे लोक नाहींसे होत असतां, ते मोठमोठ्या विघ्रांतून वांचून आजपर्यंत राहिले आहेत, यावरूनहि उघडपणें दिसून येतें. फारो, हामान व दुसरे कित्येकांनी इस्राएलांचें नाव जगांतून नाहींसे करावें असें योजिलें होर्त; परंतु त्यांचाच नाश होऊन यांस कांहींच अपाय झाला नाहीं. याम्रमाणें दुसरें पवित्र मंदिर बांधलें जाईपर्यत ईश्वरानें जे चमत्कार इस्राएलांसाठीं केले, ते सर्व पवित्र शास्त्रांत लिहिलेले आहे. त्यानंतरचा त्यांचा वृत्तांत शास्त्रांत नाही; परंतु इस्राएलांतील व अन्य लोकांतील ग्रंथकारांनींहि लिहून ठेविला आहे. यावान म्हणजे ग्रीक लोकांचा राजा आनतिओखोस यानें इस्राएलांचें नाव व त्यांचा धर्म जगांतून नाहींसा करावा असें योजिलें होतें; परंतु त्यांतूनही त्यांस सीडविलैं. याचा वृत्नांत शास्त्रांत नाहीं, परंतु इतिहासांत सांपडतो. या तारणाची इस्राएलांस सर्वकाळ आठवण राहावी म्हणून हान्नुका हा सन नेमिला आहे. यास्तव आजच ईश्वरानी आपणास ह्या संकटांतून सोडविलें असें समजून आणि त्याचे थोर उपकार मानून हा सन पाळावा.