पान:Sulabh Vaastu Shastra.djvu/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११) त्यामुळे कंत्राटदार व कामावर प्रत्यक्ष देखरेख करणारे मेस्त्री यांनाच काय तो थोडाबहुत खरो अनुभव मिळतो. अशा स्थितीत वर लिहिल्याप्रमाणे केलेला प्रयत्न सामान्य लोका(Laymen)ना कितपत उपयुक होईल याबद्दल जबरदस्त शंका वाटत होती. परंतु सुदैवाने पुढे थोड्याच दिवसांत पुणे येथे सारस्वत ब्राह्मण हाउसिंग सोसायटीतील निरनिराळ्या तन्हांची बरीचशी कामें व त्यात स्वतःचेंहि एक अशी प्रत्यक्षपणे नजरेखाली होण्याचा योग आला. त्या वेळी बो अनुभव येत गेला तो लक्षात घेता त्यापूर्वी सरकारी खात्यांत बरीचशी बांधकामें हातून झाली असली तरी पुष्कळ गोष्टी माहित नव्हत्या असे दिसून आले. सदरह वसाहतींतील आजवर झालेली बहुतेक सर्व कामें मालाचा पुरवठा मालकांकडून व मजुरी कंत्राटाने अशा पद्धतीवर झाली असल्यामुळे घरांच्या मालकांस फार मन घालून काम करावे लागले व ते तर बोलूनचालून अनभिज्ञ लोक. तेव्हां कामाच्या बरेवाईटपणाबद्दलची जबाबदारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने प्रस्तुत ग्रंथ- कांच्या शिरावर आली व त्याच्या मनांत या विषयावर सांगोपांग माहिती लिहून प्रसिद्ध करावी असे असल्यामुळे त्याने तें काम उत्साहाने अंगावर घेऊन आलेल्या संधीचा त्यास दोन रीतींनी फायदा घेता आला. पहिला, मालकांस निरनिराळ्या कल्पना सुचवून कामाच्या खर्चाची टिपणे ठेवून कोणतें काम करें पडतें, कोणत्या कामापासून फायदे आहेत वगैरेंचे प्रयोग करून पाहतां आले व दुसरा फायदा, अनभिज्ञ लोकांस (Laymen) खरोखरीच कोठें नडते याची यथातथ्य कल्पना करून घेतां आली व तिला अनुसरूनच या ग्रंथांत अगदी सोप्या भाषेत गृहरचनेच्या बाबतीत जे जे म्हणून अनुभव आले ते ते लिहून काढले आहेत. अर्थातच हे पुस्तक शिकलेल्या किंवा अनुभव घेतलेल्या इंजिनियर व कंत्राटदार लोकांसाठी लिहिलेले नाही. तथापि त्यांनाहि त्यांत काही प्रात्यांश दिसून आला तर लेखकास फार आनंद होईल. प्रो. भागवत यांनी प्रस्तावनेत काही सुशिक्षित म्हणविणाच्या सुदा लोकांचे डोळे पाश्चात्य भपक्याने दिपून जाऊन मापल्या कोव्यवाष दरिद्री बांधवांच्या दैन्याची त्यांस कशी विसर पडते, व कृत्रिम, भपकेबाज राहणी म्हणजेच विसाव्या शतकांतील सुधारणा असे त्यांना कसे वाटते याबदल केलेले विवेचन जरी भक्षरशः खरें माहे, तरी अन पाणी यांची बीवनास व आरोग्यास जेवढी बरुरी आहे तितकीच शुद्ध हवा व उजेड यांचीहि नाहे. या पुस्तकांत शेषषरा- ► , .