________________
६२ एकनाथी भागवत. ॥ ७१ ॥ तीर्थ क्षेत्र पवित्रोदक । सरिता ममुद्र झाले एक । हारपले चंद्रसूर्यादिक । तिनी लोक बुडाले ।। ७२ ॥ ऐशिया एकार्णवाचे ठायीं । विराट निराला गा पाहीं । साकार उरे ऐसे कांहीं । उरले नाहीं नृपनाथा ।। ७३ ।। ___ रातो निराजमुग्मज्य पेराज पुरपो गृप । अव्या निशते सूक्ष्म निरिन्धन इयानर ॥ १२ ॥ प्रळयकाळी अतिगहिसू । अगाध उमळे जळोल्हासू । स्यूलाचा करितां नाशू । विरे निःशेषु विराटु ॥ ७४ ॥ वैराटाचा वैराज पुरुपू । तो अन्यक्ती करी प्रवेश । जेवीं इंधननाशे हुताशू । करी रहिवासू निजकारणी ॥ ७५ ॥ जे ब्रह्मलोकनिवासी होती । त्यांसी महाप्रळयाचे अती । ब्रयासवे सर्वांसी क्रम मुक्ती । ऐसे श्रुतीचे दृढ वाक्य ।।७६ ॥ 'राजपु. रुप'नाम वदंती। हिरण्यगर्भातें ह्मणती । त्यासी प्रळयीं प्रवेशुअव्यक्ती ते इतरांची गती श्रुतिवाक्ये कैसी ।। ७७ ॥ विदेहें पुगिली मायेची स्थिती । ते मायेची ऐशी दुर्धर शक्ती । जे न करिती भगवद्भक्ती । त्यां ब्रयासवे मुक्ती घडो नेदी ॥ ७८ ॥ जालिया ब्रह्मसदनप्राप्ती । न करिता भगवद्भक्ती । अतिशय दुर्लभ मुक्ती । ते भक्तीपाशी मुक्ती दासी जैसी ॥७९॥ न करिता भगवद्भजन । नयासीही मुक्ति नव्हे जाण । मा इतरांचा ज्ञानाभिमान । पुसे कोण परमायौं ॥१८० ॥ ज्यासी जेथ पदाभिमान । त्यासी तचि दृढ बंधन । यालागी दुर्लभपण । मोक्षासी जाण तिही लोकी ।। ८१ ॥साडोनिया पदाभिमान । अगें सदाशिवु आपण । नित्य यसवी महास्मयान । भगवद्भजनी निजनिष्ठा ।। ८२ ॥ यालागी ज्यासी ब्रह्मलोकपदप्राप्ती । तेथेही जे करिती भगवद्भती । त्यासीच प्रळयाच्या अती । परममुक्ती नृपवर्या ॥ ८३ ॥ ब्रह्मलोकी ज्या नाही हरिभक्ती । तेही पावती पुनरावृत्ती । ऐशी मायेची दुर्धर शकी। न करिता भक्ति मुकि कैची ॥ ८४॥ येचि अर्थी ब्रहृयाचे वचन । दो श्लोकी चोलिला आपण । ज्ञानाभिमानिया पतन । भक्का भवबंधन कदा न वाधी॥ ८५॥ ब्रह्मादिकृतगर्भस्तुतिश्लोकी ॥ ये येरविदाक्ष विमुक्तमानिनस्यव्यसभावादविशवउदय । भारस कृष्ण पर पद तत पतन्त्मधोऽनाइत्तयुष्मदाय ॥१॥ तथा न ते माधव तावका सचिद्रदयात मागाचयि मसौदा ! स्वयाभिगुता विचरन्ति निर्भया विनायकानीपमूर्धसु प्रभो ॥२॥ न करितां भगवती । सज्ञानाही नातुडे मुक्ती । तेचि अर्थीच्या दृष्टाती । ब्रह्माची उक्ती दाविली येथे ॥ ८६ ॥ जन्मामाजी नाहाणपण । तेही वेदशास्त्रसंपन्न । न करिता भगवद्भजन । अचुक पतन तयांसी ॥ ८७ ।। भक्तां सर्वभूती भगवझायो । तेथ विघ्नांसी नाही ठायो । तया अपावचि होय उपावो । भावार्थी देवो सदा साह्य ॥ ८८॥ भक्तीवीण मुक्तीचा सोसू । करिता प्रयत्न पडे बोसू। असो हैं बैराजपुरुपू । करी प्रवेश अव्यक्ती ॥ ८९ ॥ अव्यक्ती वैराजाचा प्रवेश । होताचि महाभूता विलासू । हों लागे भूता न्हासू । तो अप्रवेशू ऐक राया ॥ १९० ॥ १ जलमय झालेल्या जगात २ ईश्वराचा स्थूल देह, पुढ ब्रह्माड ३ भयकर ३६ च्या श्लोकानरील टीकतली 'जे हलुपट ना गहिंस' ही आवी पहा गहिंसपणा झणजे मूर्सपणा (शाश्वरी अ. ९.५१३ ४ कारणात प्रति स्पात ५ काटनाशी ६ अनि ७ वास्तव्य ८ भापामचार, नागपद्धति ९ काशीक्षेत्रातील स्मशानभूमि १० जन्मसत्य ११ लाभत नाही १२ नि सशय १३ अपाय १४ हव्यास, उत्कट इच्छा १५ व्यर्थ, निष्फळ १६ प्रसार