________________
श्रीएकनाथस्वामीची आरती. ( पहिली ) जय देव ! जय देव ! जय एकनाथा ! सज्जनवृंदामाजीं देखो आधिकता ॥४०॥ बाळपणी कोणा डसों आला काळ । तो काळचि कोणा झाला कृपाळ ।। जन्मारभी कोणाचे वैराग्य प्रवळ । कोणाचे वैराग्य राहीले अढळ ॥ जय देव ॥१॥ क्षालन सद्गुरुपदपंकजिचे नीर । कोण त्याला मानुनि साराहुनि सार ।। कोण गुरुभकीसी जाहला तत्पर । सर्वां गुरुभक्तीसी एक आधार ॥ जय देव० ॥२॥ करतळामळ कोणी 'एकादश केला । विश्वव्यापक ग्रंथ कोणाचा झाला ।। अनंत कोटी ब्रह्माड ज्यासी अवलीला । त्यासी 'अनुभवसार' कोणा वदला ज०॥३॥ भूसुरमहिमा अवनी कोणी वाढविला । पट्कर्माचा महिमा आगी दाखविला ॥ . . . . ...॥ जय देव०॥४॥ कोणाचे ऋण जाउनि कमलापति फेडी । कोणाचे हरिदास स्वयें अगण झाडी ।। अनंत ब्रह्माडाच्या करितो घडामोडी । कोणाचे धरि खाद्या चाहे कावडी || ज० ॥५॥ कोण मुक्या हाती रामायण पदवी । समुद्रवलयांकित भू कोणाची झाली? ॥ ऐसा अगम्य महिमा जाणति अनुभवी । भावे मुक्तेश्वर वाछित पदपदवी । अ० ॥६॥ (दुसरी ) जय देव ! जय देव ! जय एकनाथा ! निर्विकार ब्रह्म तूंचि तत्त्वता ॥ नामें भवकुंजर ताडूनी लाथा । भक्तप्रतिपाळक कळिकाळमाथा ।। ध्रु० ॥ नानारूपी चालक व्यापक तूं एक । हणुनी 'एका' नामें पाचारिति लोक ।। ज्याचे नामें न चले विपयाचा पक । जनार्दनाजवळी कीतींचा जनक ॥ ज० ॥१॥ निर्मळ गोदाती मुनिराजहंस । निर्गुण प्रतिष्ठानी केला रहिवास ।। लोकत्रयीं मिरवी कीतींचा घोष । आचार विचार निर्मल निःप ।। जय देव० ॥२॥ अपर भानुकूळी उगवला भानू । सूर्याचाही सूर्य देदीप्यमानू ॥ काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मानू । कृपादृष्टी करनी तारिसि रजरेणू॥ ज०॥३॥ भगवद्भावे करुनी सकळांसी मैत्री । हाणुनी जन्म विश्वामित्राचे गोनी । विश्व तरले हरिहरनामाचे मंत्री पाहू न शके जवळ कळिकाळ नेत्री ।। जय देव० ॥४॥ नाहाणतीर्थी पूजा, नामाचा महिमा । सत्को लोटली मोक्षाची सीमा । नाना मताचिया वंदूनि गरिमा । मुक्तेश्वर ते धरियेला प्रेमा ।। जय देव० ॥५॥ १ एकनाथाच्या मुलीचा मुलगा प्रसिद्ध कवि मुकेश्वर होय मुफेश्वर हा जन्मत मुसहोता, परंतु नायांच्या पेनें खास पाचा फुटली अशी भारयायिका माहे परतुया आत्यापिकेच्या सरेपणाबद्दल बरीच शका मादेशोधक - -