________________
एकनाथी भागवत द्वैताची स्फूर्ती भगवंती स्फुरली ॥८१॥ किंबहुना एकपणे समस्ते । रूपा आली महाभूतें । तीचि हरीची माया येथे । जाण निश्चित नृपनाथा ॥ ८२ ॥ भूतभौतिक स्फुरे जे स्फूर्ती । ते प्रकाशं न शके माया स्वगती । मायाप्रकाशक चिन्मूर्ती । असंडत्वे भूताकृती प्रवेगला भासे ॥ ८३ ॥ मुख्य मायेचें निजलक्षण । प्रकाशी परमात्मा चिद्धन । तोचि भूती भूतारमा आपण । प्रवेशलेपण नसोनि दावी ॥ ८४॥ एन सृष्टानि भूतानि प्रविष्टः पञ्चधातुमि । एकधा दशधा'मान विभजन जपते गुणान् ॥ ४ ॥ ऐशी सजिली भूतें महाभूते । जी जडमूढ अचेतें । त्यासी वर्ताचया व्यापाराय । विभागी आपणाते तत्प्रवेगी ॥ ८५ ॥ पचधा पंचमहाभूते । ते कार्यक्षम व्हावया येथें । पंचधा विभागें श्रीअनंते । प्रवेशिजे तें ऐक राया ॥८६॥ गंधरूपै पै पृथ्वीतें। प्रवेशोनि श्रीअनंत । पूर्ण क्षमा आणोनि तीते । चराचरभूतें वाहवी स्वयें ।। ८७ ॥ पृथ्वी प्रवेशला भगवंतु । यालागी ते आवरण जलातु । उरलीसे न विरतु । जाण निश्चितु मिथिलेगा॥८॥धरा धरी धराधरं । यालागी विरवू न शके समुद्र । धराधरें पृथ्वी सधर । भूतभार तेणे चाहे ॥८९॥ स्वादरूपें उदकाते । प्रवेशोनि श्रीअनते । द्रवत्वे राहोनियां तेथें । जीवनें भूतें जीववी सदा ॥९०॥ जीवनी प्रवेश जगजीयन । याकारणे आवरण तेचि जाण । न शोपिता उरे जीवन। हैं लाघव पूर्ण हरीचें ॥९१॥ तेजाचे ठायीं होऊनि रूप । प्रवेशला हरि सद्भप । यालागी नयनी तेज अस्प । जठरी देदीप्य जठराग्नि जाहला ॥ ९२ ॥ रूपयोग लवलाही । हरि प्रवेशे तेजाच्या ठायीं । ते आवरण वायूमाजी पाही । न मायळे काहीं यालागी राया ॥ ९३ ॥ यायूमाजी स्पर्शयोगें । प्रवेशु कीजे श्रीरगें । यालागी प्राणयोगें । वर्तती अंगें अनेक जीव ॥ ९४ ॥ वायूच्या ठायीं हुपीकेश । स्पर्शरूपें करीमवेश । यालागी वायूचा पास। सर्वधा आकाश करू न शके ॥ ९५ ॥ शब्दगुणे हपीकेश । आकाशी करी प्रवेश । यालागी भूतासी अवकाश । सावकाश वर्तावया ॥ ९६ ॥ शब्दगुणें गगनी । प्रवेशला चक्रपाणी । यालागी तें निजकारणी । लीन होऊनी जाऊनचके ॥९७ ॥ महाभूता निरतर । स्वाभाविक नित्य वैर । येराते ग्रासावया थेरें । अतितत्पर सर्वदा ॥ ९८ ॥ जळ विरवू पाहे पृथ्वीते । तेज शोऽपाहे जळातें। वायु प्राशं धांवे तेजाते। आकाश वायूते गिळं पाहे ॥१९॥ तेथ प्रवेशोनि श्रीधर । त्याते करोनिया निवैर । तेचि येरामाजी येर । उल्हासे थोर नादवी ॥ १०० ।। एवं पचभूतां साकारता । आकारली भूताकारता । तेथे जीवरूपं वर्तविता । जाहला पै तत्वतां प्रकृतियोगें ॥१॥ त्यासी ब्रह्माडी "पुरुप' हे नांव । पिंडी त्यात ह्मणती 'जीव' हा मायेचा निजस्वभाव । प्रतिबिवला देव जीवशिवरूपें ॥२॥ शिवीं जे योगमाया विख्याती । जीवीं तीत अविद्या ह्मणती । हेचि मायेची मुख्यत्वे भ्राती । स्वनस्थिती ससारू ॥ ३॥ज्याते ह्मणती दीर्घ स्वम | तो हा मायावी ससार सपूर्ण । निद्रेमाजी दिसे जे भान । तें जीवाचे स्वम अविद्यायोगें ॥ ४॥ येथ जागा जाल्या मिथ्या स्वप्न । चोधु जाहलिया मिथ्या भवभान । हे अवघे मायेचे विदान । राया तूं जाण निश्चित ॥ ५ ॥ आता जीवाची विषयावस्था । विपयरसी विषयभोका । एकधा दशधा विभागता । आईक नृप . १ निर्जीव, चेतनारहित २ शेप ३ विरघळण्याला ४ बरस्ट ५ पाण्या ६ जगाचा प्राण, परमात्मा ७ पुष्पळ, ८ स्थान, जागा ९ एक्मेक १० गिळू ११ ससार दा स्वमवत् मिध्या आहे १२ आत्मज्ञान १३ करणी .१४ रसभोक्ता