Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/854

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२२ एकनाथी भागवत. श्रीकृष्णाचे वदन । दारुकासी आले रुदन । आसुंवीं नयन लोटले ॥ ४२ ॥ दीर्घस्वरें देऊनि हाक । दारुक रडे अधोमुख । अंती श्रीकृष्ण झाला विमुख । हे अतिदुःख मज माझें ॥ ४३ ।। दुःखें चरफडीत मोटा । करें पिटीत ललाटा । मर मर विधातया नष्टा । वोसटें अदृष्टा का लिहिले ॥४४ ॥ मग ह्मणे श्रीकृष्णनाथा । तुजपुढे बापुडें विधाता। तुजवेगळा मी राहतां । अतिदीनता पावेन ॥ ४५ ॥ तुझेनि व श्रीकृष्णा । म्यां कळि काळा घातला आकणा । तो मी काळाचा वोळंगणा । कां करिसी पोसणा जगाचा ॥ ४६ ॥ ऐसे ऐकोनियां वचन । ना भी ह्मणे जनार्दन । मग आश्वासून पूर्ण । गुह्य आलोचन सागत ॥ ४७ ॥ आजिच्या काळाचे काळगती । तूं एक उरलासी निकटवती । तुज म्यां राखिले निजकार्यार्थी । वेगी द्वारावती तूं जाई ॥४८॥ गच्छ द्वारावनी सूत ज्ञातीना निधन मिथ । समर्पणस्य निर्माण सम्धुम्पो महि मद्दशाम् ॥ ४६॥ द्वारकाया च न स्पेय भवनि स्वस्तयन्धुमि । मया त्याका यदुपुरी समुद्र प्लाव मिष्यति ।। ४७ ॥ स्व स्व परिमह सर्वे आदाय पितरौ च नः । अर्जुनेनाविता सर्व इन्द्रप्रस्थ गमिष्यथ ॥ ४८॥ तूं जाऊनि द्वारकेआंत । यादवाचा निधनवृत्तांत । परस्परें कलयुक्त । निमाले समस्त हैं सांग ॥४९॥ बळिभद्रे निजात्मस्थिती । देहो त्यजिला योगगती । माझी ही दशा समस्ताप्रती । यथानिगुती सांगावी ॥ ३५० ॥ तुवां जाऊनियां त्यांपाशीं । शीघ्र सांगावें समस्तासी । कोणी न रहावे द्वारकेसी । निघावें वेगेंसी ममाज्ञा ॥५१॥ द्वारका त्यागावयाचे कारण । तुज मी सांगेन आपण । दारुका तूं अतिसज्ञान । विश्वास पूर्ण मज तुझा ॥ ५२ ॥ यालागीं तुज राहवूनि एथ । अत्तकाळींचे गुज सांगत । तुवां जाऊनि द्वारकेंत । बाहेर समस्त काढावे ॥ ५३ ॥ बाहेर काढावयाचे कारण । म्या द्वारका त्यागिल्या जाण । समुद्र येऊनि आपण । नगर सपूर्ण वुडवील ॥ ५४॥ ठावं मागूनि समुद्रापाशीं । म्यां वसविलें द्वारकेसी । मज गेलिया निजधामासी । तो अवश्यतेसी बुडवील ॥ ५५ ॥ यालागी सत्वर गमन । शीघ्र करावें आपण । माझी माता पिता समस्त जन । द्वारकेहून काढावे ॥ ५६ ॥ व समुद्र वुडविना तो ठावो । तंववरी आपुला समुदायो । घेऊनि सकळ परिग्रहो । शीघ्रतर पहा हो निघावे ॥ ५७ ॥ झालिया राज्यलोद । चोरींकुळित होईल वाट । कोणी नवजावे ऐकवट । अवधी एकवाट करावी ॥५८॥ अर्जुनाचेनि सागाते । एकत्र मिळूनि समस्ते । शीघ्र जाये इंद्रप्रस्थालें । तो मार्गी त्यातें रक्षील ।। ५९ ॥ ऐसे ऐकतां कृष्णवचन । दारुकासी आले रुदन । न वचे साडूं पाहे प्राण । जळेंवीण मीन जैसा ॥ ३६० ॥ निजकुळासी करूनि घात । गेला गेला रे श्रीकृष्णनाथ। मी काळमुखा द्वारकेआत ।जावों हा वृत्तात सागावया ॥६॥ गिळूनि श्रीकृप्णनिजसुसा । ह्मणती हा आला काळमुखा । सकळ जगाचिया दुःखा । सूचक देखा मी होईन ।। ६२ ॥ ऐकता माझिया वचनासी । प्राणात होईल सर्वांसी । एवढे द्यावया महादु खासी । न वचे हपीकेशी मी तेथें ॥ १३ ॥ ज्यासी म्यां सागावी हे वार्ता । त्याच्या करावं जीवघाती । एवढी घोर निष्ठुरता । नव्हे प्राणनाथा माझेनी ॥ ६४ ॥ .. अधूनी २दीन, गरीव ३ दाय, पाश ४ तावेदार, दास ५ मिऊ नकोस ६ युक्ती ७ जागा ८ परिवार, पार लवकर १० चोरानी गजबनलेली ११ एकेकट्याने जाऊ नये १२ वचन १३ मासा. साताम्या १५ स्मरण परविणारा, स्मारक १६ ही वाती ऐक्ताच प्राण सोडतील