________________
एकनाथी भागवत स्मअर्पण । तरी उत्तीर्ण नव्हेचि ॥ ४८ ॥ यालागी वर्तताही गरीरी । मी अखंड त्याची सेवा करी । निजात्म अर्पण प्रीतीवाही । मी त्याच्या घरी सर्वदा ।। ४९ ॥ त्यातें जे में जेडभारी । तेही मी वाहें आपुले शिरीं । माझी चैतन्यसाम्राज्यनी । नांदे त्याचे घरीं सर्वदा ॥ ४५० ॥ एकादशाचे ब्रह्मज्ञान । बोधूनि मद्भक्ता करी जो दान । त्यासी मी यापरी जाण । आत्मार्पण स्वयें करीं ॥ ५१ ॥ असो न साधवे ब्रह्मज्ञान । तरी या प्रथा• चेचि पठण । जो सर्वदा करी सावधान । तो परम पावन उद्धवा ।। ५२ ॥ ___ य एतत्समधीयीत पविन परम शुचि । स पूयेताहरहा ज्ञानदीपेन दर्शयन् ॥ २७ ॥ निखळ जे कां ब्रहाज्ञान । तो हा माझा तुझा सवाद जाण । जो सादरें करी पठण । सावधान श्रद्धालू ॥ ५३ ॥ चढत्यावाढत्या परवडी । शुद्ध सात्विकी श्रद्धा गाढी । पदोपदी नीच नवी गोडी । अद्भुत आवडी पठणाची ॥ ५४ । वाचेचिया टँवळ्याप्रती । श्रद्धास्नेहाची संपत्ती । निजजिह्वा करूनि वाती । जो हे ज्ञानदीप्ती प्रकाशी ॥ ५५ ॥ एकादशाचे ज्ञानदीप्ती । एकादश इद्रियांच्या वाती । उजळूनि जे मज वॉवाळिती । ते पवित्र किती मी सागू ॥ ५६ ॥ यापरी जे ग्रंथपठण । ते माझें ज्ञान निरर्जन । तेणें ज्ञानदीपें जाण । माझे स्वरूप पूर्ण प्रकाशी ॥ ५७ ॥ त्याचे लागले जे सगती । त्यांतें ब्रह्मादिक वदिती । त्याचेनि पावन त्रिजगती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ५८ ॥ असो ज्यासी ने टके पठण । तिही श्रद्धेने करिता श्रवण । त्यासी न वाधी भवबंधन । तेही निरूपण हरि सागे ॥ ५९॥ य एतच्छद्धया नित्यमन्यन शृणुयानर । मयि भक्ति परा कुर्वन् कर्मभिर्ग स बध्यते ॥ २८ ॥ असो न करवे अध्ययन । तरी श्रद्धायुक्त सावधान । करिता एकादशाचे श्रवण । कर्मबंधन वाधीना ।। ४६० ॥ श्रवण केले अतिश्रद्धेन । त्याहूनि दृढ व्हावे मनन । मननेवीण ते नपुंमक जाण । ब्रह्मप्राप्ति पूर्ण फळेना ॥ ६१ ॥ सपलिया कथाश्रवण । मनींचे सपाये ना मनन । जैसे लोभियाचे धन । हदयी आठवण सर्वदा ॥६॥जैसे जैसे कीजे श्रवण । तैसे तैसे लागे मनन । मननानुसारे भजन । परी भक्ति जाण उद्बोधे ।। ६३ ।। आर्त जिज्ञासु अर्थार्थी । याची साडोनिया स्थिती । उल्हासे माझी चौथी भक्ती । जीते परीं ह्मणती सज्ञान ॥ ६४ ॥ पराभक्तीचे माझे भजन । क्रियामाने निजात्मदर्शन । यालागी मद्भक्तासी जाण । कर्मबंधन वाधीना ।। ६५ ।। हे असो अतिगृह्य वोलणे । येणे एकादशाचेनि श्रवणें । मी तरेन हा विश्वास जेणे । अत करणे दृढ केला ॥ ६६ ॥ दृढ विश्वास मानूनि पाहीं । जो लोधला श्रवणाविपयीं । माझी भक्ति त्याच्या ठायीं । दबडितां पाहीं घर रिघे ॥ ६७ ॥ घर रिघोन भक्ति निष्काम । भक्ताचे निदेळी सकळ कर्म । या नाव परा भक्ति परम । विश्रामधाम श्रवणाऱ्यां ॥६८॥ एकादशाचे श्रद्धाश्रवण । करिता एवढा लाभ पूर्ण श्रवणे उपजे माझें भजन | भजने भक्तजन निमुक्त ॥ ६९ ॥ १ उतराई, मुक्त प्रीतीवरी, प्रेमास्तव ३ सफ्ट 'पडता जडभारी । दासें आठवारा हरी-तुकाराम ४ शुद्ध ५ उत्तरोत्तर वाढत आहे अशा प्रकारची ६ निल याचेच्या टवळ्यात श्रद्धारूपी तेल ओतून जिव्हारूप वातान ज्ञानाचा प्राश पासवा ८ काजळीरहित, स्वच्छ ९ होत नाही १० असमर्थ, कार्य न करणारे ११ गोणी भक्ति आणि परा भात झणजे ज्ञानोत्तर अमिनपणाची भफि १२ जान होते १३ उत्कृष्ट १४ लब्ध झाला १५ हाक्लली-घिकारिलीअसताही भापण होऊन खाच्या ठिकाणी ओढावाप्रमाणे येवे