पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/787

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अठ्ठाविसावा. ७५७ अहावीस । जेवीं यतीमाजी परमहंस । तेवीं अष्टाविंश भागवर्ती ॥ १९॥ जेवी क्षीराब्धीमाजी शेषशयन । त्याहीवरी जैसा नारायण । तेवी भागवतामाजी जाण । ब्रह्मपरिपूर्ण अष्टाविंश ।। ७२० ॥ जेवी वैकुंठ परम पावन । त्यावरी विराजे श्रीभगवान । तेवी भागवतामाजी जाण । विराजमान अष्टाविश ॥ २१ ॥ एवढे या महत्त्वाचे वैभव । कृष्णकृपेने पावला उद्धव । चाप निजभाग्याची धाव । ब्रह्मा स्वयमेव स्वये झाला ॥२२॥ उद्धव झाला ब्रह्म पूर्ण । त्यासी कृष्णकृपा प्रमाण । ते मी वाखाणी अज्ञान । देशभापण भाकृत ॥ २३ ॥ अधासी सूर्य प्रसन्न । झालिया देसे तो निधान । तेवीं प्रकटोनि जना. दन । हें गुह्यज्ञान बोलवी ॥ २४ ॥ जनार्दन प्रकटला आता । हे बोलणे माझी मूर्खता । तो स्वत-सिद्ध सदा अमतां । हेही झालो मी जाणता त्याचिया कृपा ॥ २५ ॥ त्याचिया कृपें ऐसे केले । माझं मीपण निःशेप नेले । नेलेपण देखों नाही दीधले । जेवीं सूर्य केले अधारा ॥ २६ ॥ मज कृपा करील जनार्दन । हेही नेणे मी अज्ञान । तेणे दयालवे कृपा करून । हे गुह्यज्ञान बोलविलें ॥ २७ ॥ निकट असता जनार्दन । मी नेणे त्याचे महिमान । तेणे आपला महिमा आपण । मजमुखें जाण बोलविला ॥ २८ ॥ मी जें मणे माझें मुख । तेही जनार्दन झाला देख । तेणं मुखें निजात्मसुस । बोलवी "निष्टक निजात्मसत्ता ॥ २९॥ एवं माझेनि नावे कविता । परी जनार्दनचि झाला वक्ता । तेणें वक्तेपणे तत्त्वता । रसाळ कथा चालिली ॥ ७३० ॥ ब्रह्मरसे रसाळ कथा । निरूपिले श्रीभागवता । त्यामाजी अलतल्लीनता । जाण तत्त्वता अष्टाविंश ॥ ३१ ॥ अक्षाविसाब्याचे निरूपण । ते तत्त्वता ब्रह्म पूर्ण श्रद्धेने करिता श्रवण । उद्धव सपूर्ण निवाला ॥३२॥ उद्धव निवोनियां आपण । स्वयं विचारिता झाला जाण । ह्मणे है शुद्ध आत्मज्ञान । परी प्राप्त कठिण अवळासी ॥ ३३ ॥ या चित्स्वरूपाची प्राप्ती । सुगम होय साधकामती । पुढील अध्यायाचे अर्थी । उद्धव विनंती करील ॥ ३४ ॥ कडा फोडूनि मार्ग कीजे । का उंची फर्रस बांधिजे । तेवीं सुगमें निर्गुण पाविजे । तो उपाय पूसिजे उद्धवें ॥ ३५ ॥ ब्रह्मप्राप्तीचा सुगम उपावो । स्वयें सागेल देवाधिदेवो । सो सुरस पुढील अध्यावो । साधका पहा हो परमार्थसिद्धी ॥ ३६॥ पव्हणियाविण पायउतारा । अवळी उतरिजे भवसागरा । तैसा साधकालागी सोपारा । उपाच पुढारा हरि सागे ॥ ३७॥ सीतेचेनि कृपापडिभारें । सेतु वाधिजे रामचंद्रे । तेथ समुद्र तरिजे वानरे । जे वनचरें अतिमंदें ॥३८॥ तेनी उद्धवप्रश्नप्रीतीसी । भवाब्धिसेतु हृषीकेशी । वाघिला निजभक्तिउपायेसीं । तेथ तरती आपसी भावि अचलें ॥ ३९ ॥ कृष्णभक्तिसेतुबारे । तरली जड मूड पामरें। ते भक्ति सागिजेल यादवें । श्रोता सादरें परिसिजे ॥ ७४० ॥ एका जनार्दना शरण । तेणे श्रोते सुप्रसन्न । पुढील अध्यायाचें कथन । तेणें साधक जन तरतील ॥४१॥ साडूनिया एकपण । एका जनार्दना शरण । सुगम साचे आत्मज्ञान । ते भकिसाधन हरि सांगे ॥ ७४२ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्कघे भगवदुद्धवसवादे परमहससहिताया एकाकारदीकाया परमार्थनिर्णयो नाम अष्टारिंशतितमोऽध्याय ॥२८॥ अध्याय ॥ २८॥ ऑव्या ॥७४२ ॥ श्लोक ॥४४॥एव सख्या ॥७८६॥ श्रीकृष्णार्पणमस्त। विराजमान २ मोठी, अजय ३ धनाचा टेवा माझ्याकडन ५ निशफ६ परशी, परसरी रखा. पायया ७ पोद्दण्यावाचून (अ.५ पहा ) मुलम १ ससाररूपी समुद्रावरील पूल