पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/742

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

+ एकनाथी भागरत. . माजी आतुडे । तै ब्रह्मानं गोंधळ पडे । गीग चढे भक्तीची ॥३॥ अभेदभक्ताच्या द्वारापाशी । तीर्थे येती पवित्र व्हावयासी । सुरनर लागती पायांसी । मी हपीकेशी त्यांमाजी ॥ ४ ॥ अभेदभक्तांपाशी देख । सकळ तीर्थे होती निर्दोख । भक्तीचें माहेर तें आवश्यक । मजही सुख त्यांचेनी ॥ ५ ॥ अभेद जे क्रियास्थिती । या नांव माझी उत्तम भक्ती । ऐसा अतिउल्हासे श्रीपती । उवाप्रती बोलत ॥ ६॥ अभेदभक्ती वाकोडें । श्रीकृष्ण सांगे उद्धयापुढें । कथा राहिली येरीकडे । तेही धडफुडें स्मरेना ॥ ७ ॥ देव विसरला निरूपण । तब उद्धवासी वाणली खूण । तोही विसरला उद्धयपण । कृष्णा कृष्णपण नाठवे ॥ ८ ॥ अभेदभजनाचा हरिख । देव भक्त झाले एक । दोघां पडोनि ठेले ठेक । परम सुख पावले ॥ ९॥ उद्धव निजबोधे परिपूर्ण । तरी पूजाविधानप्रश्न । एथ करावया काय कारण । ऐशी आशंका मन कल्पील ॥ २१० ॥ तरी उद्धवाच्या चित्ती । उगा राहतांचि श्रीपती । जाईल निजधामाप्रती । यालागी प्रश्नोक्ती तो पुसे ॥ ११ ॥ उपासनाकाडगुह्यज्ञान । आगमोक्तपूजाविधान । उद्धवमि श्रीकृष्ण । वेदार्थ आपण स्वये वोले ॥१२॥ सकळ वेदार्थ शास्त्रविधी । ग्रंथी श्रीकृष्ण प्रतिपादी । जैसी श्रद्धा तैसी सिद्धी। व्हावया त्रिशुद्धी साधका ॥१३॥असो हे ग्रंथव्युत्पत्ती । ऐकता अद्वैतभक्ती। उद्धव निवाला निजचित्ती । तेणे श्रीपति सुसावला ॥ १४ ॥ तेणे संतोपें ह्मणे श्रीकृष्ण । उद्धवा होई सावधान । पुढील पूजाविधान । तुज मी सागेन यथोक्त ॥ १५ ।। पूज्य पूजक एकात्मता ध्यान । करोनिया दृढ धारण । तेचि वाह्य पूजेलागी जाण । करावे आवाहन प्रतिमेमाजी ॥ १६ ॥ प्रतिमेसमुख आपण । आवाहनमुद्रा दाखवून । माझी चित्कळा सपूर्ण । प्रतिमेसी जाण भावाची ॥ १७॥ तेव्हां मूर्तीचें जडपण । निःशेप न देखावे आपण । मूर्ति भावावी चैतन्यपन । मुख्य आवाहन या नांव ॥ १८ ॥ गुरुमुखें मंत्र निर्दोष । तेणे मंत्र मूर्तीसी न्यास । करावे सर्वांगी सावकाश । शास्त्रविन्यास आगमोक्त ।। १९ ।। एवं आवाहन सस्थापन । सन्निधि सन्निरोधन । सुमुखीकरण स्वागतन । या मुद्रा आपण दावाच्या ॥ २२० ॥ अवगुंठन सफलीकरण । या अष्टौ मुद्रा दावूनि जाण । मग होऊनि सावधान । पूजाविधान माडावे ॥ २१ ॥ पाद्योपस्पहिणादीनुपचारान्प्रकल्पयेत् । धर्मादिमिश्च भवभि करपयित्वाऽऽसन मम ॥ २५ ॥ पद्ममष्टदर तन कणिकावेसरोज्ज्वलम् 1 उभाभ्या वेदतन्त्राभ्या महा भयसिद्धये ॥ २६ ॥ स्नानमडप कल्पूनि जाण । तेथ आणावा देव चिद्धन । पाद्य अर्घ्य आचमन । मधुपर्कविधान करावे ॥ २२ ॥ अभ्यंग अगमर्दन । पुरुपसूक्तं यथोक्त स्नान । पीतावरपरिधान । स्नानमडपी जाण देवासी ॥ २३ ॥ इतर यथोक्त पूजन । करावे सिंहासनी संपूर्ण। त आसन पीठावरण । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥ २४ ॥ सिहासनी आवरणक्रम । आधारप्रकृति कूर्म क्षेम । क्षीराब्धि श्वेतद्वीप कल्पद्रुम । मनोरम भावावा ॥ २५ ॥ त्या तळी रत्नमडप नेटक । त्यामाजी विचित्र पैयक । त्या मंचकाचा विवेक । यदुनायक सांगत ॥२६॥ १एकात्मतेच्या रूपान तन्मय होऊन पूजा करणान्याच्या दारी २ निष्पाप ३ एकीकडे ४ नाट, वरावर ५ टक, स्वच्छता ६ रमला, आनदला ७ करपायी, ध्यावी ८ ज्ञानसरूप, सजीध ९ आपण तन्मय हाऊन मूात जड नसून विद्रूप आहे अशी भावावी हच खर भाचाहन होय १० रमन्ने ११ भावाहनादि १२ पटग १३ निचार मुदा मानिकाच्या आहेत