Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/734

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७०६ एकनाथी भागवत. ते अधमाधम स्वयें होती ॥ ३० ॥ सर्व वर्ण आणि आश्रम । भगवद्भजने गति उत्तम । हे भक्तीचे निजवर्म । भक्त निष्काम जाणती ॥ ३१ ॥ करूनियां भगवद्भक्ती । स्वयें भगवद्रूप होती । यालागी भक्तातें श्रीपत्ती । अतिप्रीती मानितू ॥ ३२ ॥ तुझें भजनपूजन करिता । तूं निजभक्तासी होसी त्राता । तूंचि भक्तांसी होसी सन्मानदाता । ते पूजनकथा मज सांग ॥ ३३ ॥ एतस्कमलपनाक्ष कर्मरन्धविमोचनम् । भक्ताय चानुरक्ताय बेहि विश्वेश्वरेश्वर ॥ ५॥ कमळनामि नारायणा । भक्तविश्रामा कमळवदना । कमलालया कमलनयना । विनंती श्रीकृष्णा अवधारी ॥ ३४ ॥ तुवा पाहिल्या कृपादृष्टी । तत्काळ पैं उठाउठी । सुटती कर्मबंधाच्या गांठी । स्वानंदपुष्टी निजभक्तां ॥ ३५ ॥ जेवीं घृताचे कठिणपण । क्षणे विरवी सूर्यकिरण । तेवीं कर्मबंधा निर्दळण । तुझें कृपावलोकन करी कृष्णा ॥ ३६॥ कां सैधवाँचा महागिरी । जेवीं विरे सिधूमाझारी । तेवीं कर्मबंधा बोहरी । तुझी कृपा करी श्रीकृष्णा ।। ३७ ।। तुझी झालिया कृपादृष्टी । कर्माकर्मासी पडे तुटी । जेवी सूर्योदयापाठी । नातुड़े भेटी सद्योत ॥ ३८॥ तमी दाटती खद्योतकोडी । तेवीं अज्ञानी कर्माची आवडी । तुझी कृपासूर्य जोडल्या जोडी। जाती वापुडी विसरोनी ॥ ३९ ॥ ऐशिया निष्कर्मकृपायुक्त । तुझे नांदती निजभक्त । जे कां विषयी अतिविरक्त । सदा अनुरक्त हरिचरणीं ॥ ४० ॥ ते पूर्णकृपेचें आयतन । तुझें भजन पूजाविधान । ते मज सांग कृपा करून । मी अतिदीन पै तुझें ॥४१॥ ह्मणसी तुज अधिकार नाही। परी मी शरण तुझ्या पायीं । शरणागताची तुझ्या ठायीं । उपेक्षा नाहीं श्रीकृष्णा ॥४२॥ तुवा उद्धरिले पशुगीधगजासी । गणिके तारिले कुंटणीसी । तेचि कृपा करी आझांसी । हपीकेशी कृपाळुवा ॥४३॥ ह्मणसी ब्रह्मा शिव असतां सृष्टी । मजचि पुसायाची श्रद्धा मोठी । कैसेनि पां वाढली पोटी । ऐक ते गोठी सागेन ॥४४॥ ब्रह्मा जगाचा कतो होये । तोही विसरला निजात्मसोये । तो तुझ्या पोटा येऊनि पाहें । निजज्ञान लाहे तुझेनी ॥ ४५ ॥ शिव पायवणी चाहे माथां । तुझें नाम सदा जपता । तुझे कृपेस्तय तत्त्वता । तोही निजास्मता पावला ॥४६॥ यालागी तूं ईश्वराचा ईश्वर । नियत्या नियंता सर्वेश्वर । विश्वीं विश्व विश्वभर । विश्वेश्वर तू कृष्णा ॥४७॥ यापरी तूं ज्ञाननिधी । पूर्ण बोधाचा उदधी। जेणे होय निजात्मसिद्धी । ते पूजाविधी मज साग ॥४८॥ ऐसा भक्तवचने तो सतोपला । पूर्ण निजबोधे द्रवला । निजात्मकृतं कळवळला । काय बोलिला श्रीकृष्ण ॥ ४९ ।। श्रीभगवानुवाच-नयन्तोऽनन्तपारस्य कर्मकाण्डस्य चोद्धव । सक्षिप्त वर्णयिष्यामि यथावदनुपूर्वश ॥ ६ ॥ ज्याचे ऐकत्ता वचन । वेदवाक्या पड़े मौन । ज्याची करितां आठवण । मनपणा मन स्वयं मुके ॥ ५० ॥ जो वेदार्थप्रकाशक । जो अर्काचा आदि अके। तो उद्धवासी यदु-' नायक । स्वमुखें देख , बोलत ।। ५१ ॥ आगमनिगमोक्तप्रकार । माझी पूजाविधि सविस्तर । सागता अनत अपार । न कळे पार ब्रह्मादिका ॥५२॥ उद्धवा एक पा तत्वता । श्रानिवासा २ तुपाचा घट्टपणा ३ वितळवितो ४ मिठाचा मोठा डोंगर ५ समुद्रामध्ये ६ नाश, भस्म ५ कोट्यमाप कार्य ८ आसपा स्थान १० हयगय ११ सुग्रीव, जटाय.सपाति. गजेंद्र, यास १२ पिंगलेस १३ पायार्च साय, गगा १४ीयमन फरणाराचा. १५ सर्याचा १६ मलपराश देणारा सर्य. १७वेदनशान याना सागितलेला