________________
६८० एकनाथी भागवत, परिपूर्ण स्वयें होती ॥ २४ ॥ पूर्ण ब्रह्माचिया प्राप्ती । निरपेक्ष माझी भक्ती । तोचि भजनभाव श्रीपती । पुनः पुनः श्लोकार्थी दृढ दावी ॥ २५ ॥ नि सङ्गो मा भोहिद्वानप्रमत्तो रितेन्द्रिय । रजस्तमश्चाभिजयेरसस्वससेवया मुनि ॥ ३४ ॥ सत्व चाभिजयेधुक्तो नैरपेक्ष्येण शातधी । करूनि विपयाची विरक्ती । हृदयीं नापेक्षावी मुक्ती । ऐशी निरपेक्ष माझी भकी। वाढत्या प्रीती करावी ॥ २६ ॥ तेणे अनिवार सत्वशुद्धी । सर्व भूती भगवहुद्धी । दृढ वाढे गा निशुद्धी। हे भजनसिद्धी साधका ॥ २७ ॥ ऐसे करिता माझें भजन । विस्मरणासी ये मरण । सर्वेद्रियीं सावधपण । सहजे जाण ठसावे ॥ २८ ॥ तेव्हां रज तम दोनी गुण । निःशेप जाती हारपोन । शुद्धसत्वाचे स्फुरण । तेणे स्वानंद पूर्ण साधकां ॥ २९ ॥ केवळ उरल्या सत्वगुण । साधका ऐसें स्फुरे स्फुरण । जगामाजी एक पावन । धन्य धन्य मी होयें ॥ ४३० ॥ मी पावलो शुद्ध बोध । मज प्रकटला परमानंद । ऐसा सुखाचा जो स्फुदै । तो सत्वबोध साधका ॥३१॥ ऐसा उरला जो सत्वगुण । तो निवारावया साधन कोण । मी स्वयें सुसस्वरूप आपण । मज सुसाचे स्फुरण ते माया ॥ ३२ ॥ गूळ गुळा गोडपणे पागे । की दुधा दूध गोड लागे । तैसा सुखरूप मी सर्वांगें । वृथा सुखभोगें कां फुजें ॥ ३३ ॥ ऐशी साधी स्फूर्ति स्फुरे । तंव सत्वगुण स्वरूपी विरे। तेव्हां सुखाचाही फुद सरे । निजसुख उरे निजशाती ॥ ३४ ॥ ऐसे निवारल्या तिनी गुण । केवळ उरे निर्गुण । तेचि अर्थीचें निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ ३५॥ मपद्यते गुणैर्मुको जीवो जीव विहाय माम् ॥ ३५ ॥ जीवो जीवविनिर्मुक्तो गुणैश्वाशयसम्भवे । वाढल्या सत्वगुणाचा हरिख । त्यातें निर्दळी शुद्ध सत्वविवेक । पाठी विवेकेंसी सत्व देख । हारपे निःशेख निजात्मरूपी ॥ ३६॥ ऐसे निमाल्या तिनी गुण । निमें कार्य कर्म कारण । लिगदेह नाशे सपूर्ण । जीवासी जीवपण मिथ्या होय ॥ ३७॥ तेव्हां कार्य कर्म कर्ता । भोग्य भोग आणि भोक्ता । ज्ञान ज्ञेय मी एक ज्ञाता। याची वार्ता असेना ॥ ३८ ॥ ऐसे हारपल्या जीवपण । स्वयें सहजे निजनिर्गुण । होऊनि ठाके ब्रह्म पूर्ण । अहसोऽहंपण साडूनी ॥ ३९ ॥ यापरी मद्भक्त जाण । ब्रह्म होती परिपूर्ण । तेंचि जालेपणाचे लक्षण । श्लोकार्धे श्रीकृष्ण सागत ॥ ४४० ॥ मयेव ब्रह्मणा पूर्णो न बहिर्नान्तरश्चरेत् ॥ ३६ ॥ इति श्रीभागवत महापुराणे एकादशस्कन्धे पञ्चविंशोऽध्याय ॥ २५ ॥ प्रपच एक पूर्वी होता । हे समूळ मिथ्या वार्ता । पुढे होईल मागुता । हेही सर्वथा असेना ॥४१॥ जैसे आत वाहेरी भाग । नेणे साखरेचे अग । तैसे सबाह्याभ्यंतर चाग। ब्रह्म नियंग निजानदें ॥ ४२ ॥ ऐसे पावल्या ब्रह्म परिपूर्ण । साधकासी न ये मरण । प्रारब्धं देही उरल्या जाण । देहाभिमान वाधीना ॥ ४२ ॥ वाह्य न देखे दृश्यदर्शन । अतरी नाहीं विपयस्फुरण । देहींचे न देखे देहपण । जीवन्मुक्तलक्षण या नाच ॥४४॥ वाह्य देखे दृश्यप्रतीती। अंतरी विपवयाची आसक्ती । या नाव अज्ञानाची स्थिती । १ साग २ नाहीसे होऊन ३ सददितपणा ४ सात्विका ५ चटक लावितो ६ फुगून जातो ७ अभिमान, गवं ८ नाहीसे होवें दोपरहित १० आयुष्याचे काही दिवस शिल्लक राहिरे तरी ११ दिसते तेवढ्याचाच अनुभव