Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/684

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६४ एकनाथी भागवत. जो विनटला ब्रह्मसुखासी । स्वनिवृत्ति त्यासी चोलिजे ॥ ६९ ॥ रंक बैसल्या पालखीसी। उपेक्षी पूर्वील सुडक्यासी । तेवीं उपेथूनि विषयांसी । जो ब्रह्मसुखासी पैडकला ॥ ७० ॥ कणाची वादी भुसापाशी । कण निडारे भुसेसी । तो कण यावया हातासी । सांडिती भुसासी पाखडूनी ॥ ७१ ॥ तेवीं ब्रह्मसुखाचिये पाडें । नरदेहाचा पांगडा पडे । तें ब्रह्मसुस जै हाता चढे । तें देहींचे नावडे विषयभूस ॥ ७२ ॥ तेवीं सांडूनि विषयप्रीती । ज्यासी ब्रह्मसुखी सुखप्राप्ती । याचि नांव स्वनिवृत्ती । जाण निश्चिती उद्धया ।। ७३ ॥ या पंधरा लक्षणांची स्थिती । वर्ते तो शुद्ध सत्वमूर्ती । शोधितसत्वाची सत्यवृत्ती । 'आदि' शब्दें श्रीपति सांगत ॥ ७४ ॥ सर्व भूती अंकृत्रिमता । देखे भगवद्भावे तत्त्वतां । या नांव शोधितसत्वता । गुणावस्थाछेदक ॥ ७५॥ ऐशियापरी सत्वगुण । सात्विकापासीं वर्ते पूणे । आतां रजाचे लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥७६ ॥ _____ काम ईहा मदस्तृष्णा स्तम्भ आशीभिंदा सुखम् । महोरसाहो यश प्रीनिहाँस्य वीर्य बलोग्रम ॥३॥ काम मणिजे वियसोसू । जेवीं इंधनी वाढे हुतोशू । तेवीं पुरवितां कामाभिलापू । कामआसोसू . वाढे ॥ ७७ ॥ या नांव काम जाण । कामक्रिया ते ईहा पूर्ण । झाले विद्येचा दर्प गहन । मदाचे लक्षण या नाव ।। ७८ ॥ झालिया अर्थप्राप्ती । वासनेसी नव्हे तृप्ती । चढतीवाढती आसक्ती । तृष्णा निश्चिती या नाव ॥ ७९ ॥ अतिगर्वे जे स्तब्धता । कोणा दृष्टी नाणी सर्वथा । या नाव स्तंभावस्था । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ८०॥ अर्थप्राप्तीकारणे । इष्टदेवता प्रार्थणे । प्रापंचिक सुख मागणे । आशा ह्मणणे या नांव ॥ ८१॥ भिदा ह्मणिजे भेद जाण । स्फुरद्रूप प्रपंचभान । माझें तुझें प्रपंचवचन । भिदालक्षण या नाव ॥ ८२॥राजससुखाचा नवलमाग । विषयसुखभोग जो सांग । तेंचि सुख मानिती ग । सुखप्रयोग या नाव ॥ ८३ ॥रणी उत्साह शूरासी । का पुत्रोत्साह नरासी । विवाहोत्साह सुहृदासी । महोत्साह त्यासी बोलिजे ॥८४ ॥ शास्त्रविवादी जयो घेणे । का युद्धी शूर पराभवणे । तेणे ख्याति वाढविणे । यश मिरवणे या नाव ।। ८५ ॥ बंदिजनाहाती कीर्ती । स्वयें वासाणवी दिगंती । या नांच यशःभीती । जाण निश्चिती उद्धवा ॥८६॥ ऐकोनि वचनोक्ति छदोवद्ध । उपहासी अतिविनोद । तेथ राजसा हास्य विशद । जाण प्रसिद्ध उद्धवा ॥ ८७॥ "वीर्य झणिजे केवळ । वलान्यता अतिप्रवळ । दाखवणे शारीरवळ । या नाव शीळ वीर्याचे ॥ ८८ ॥राजवळे उद्यमव्यवहार । आगदेंट जो व्यापार । न्याय साडूनि स्वार्थ फार । बलोमप्रकार या नांव ॥ ८९ ॥ ही पधराही लक्षणे । ज्या नादती सपूर्णे । तो राजस वोळखणे । जीवेंमाणे निश्चित ॥ ९०॥ केवळ अविवेकसपत्ती । तामसाची तमोवृत्ती । सोळा लक्षणे त्याची स्थिती । ऐक तुजप्रती सागेन ।। ९१ ॥ १ रमला २ चिंध्याना ३ जडला, चिकटला मागे अ२-६४९ मध्ये हा शब्द आला आहे "तथ ज्या ज्या वासना हदयवासी । त्याही पडकल्या हरिसुग्गासी" ४ धान्याचे दाणे ५ परिपकतेस येतो, वाढतो ६ योग्यतन, महत्वाने ७ ममत्व, मोह, पराधीनपणा "अक्षम्य ठेवा सकळाचा । परी पागडा फिटेना शरीराचा। तेणे मागे इश्वराचा । चुकी जाती"-दासयोष ५२-३९ ८ विपयसुस ९ शुद्ध झालेल्या अमिश्र अशा सत्वगुणाची १० निष्कपटता ११ विययांचा सोस, आवड १२ काष्ठामध्ये १३ अपि १४ विषयवासनाचा व्यवहार १५ भेदबुद्धि १६ भाग. १७ खपराकमाचा आविर्भाव १८ बरक्ट १९ बलोद्यम हाणजे न्यायान्याय न पाहता शकीच्या जोरावर उद्योग करणे. २० ज्याच्याजवळ.