________________
६६२ एकनाथी भागवत. श्रीकृष्णनाथा । तेणे सांख्य या अर्था निरूपिलें ॥ २४ ॥ सकळ प्राप्तीचा अभिप्रायो । सांख्य अनुवांदला देवो । अवश्य साडावा अहंभावो । हेचि पहा वो दृढ केलें ॥२५॥ माझेनि पराक्रमें तत्त्वतां । माझें मीपण न वचे सर्वथा । लाजिरवाणे कृष्णनाथा । किती आतां पुसावे ॥२६॥ ऐशी उद्धवाची चिंता । कैलूं सरैली श्रीकृष्णनाथा । चाप कृपालु निजभक्तां । जेणें निवारे अहंता ते निजवर्म सांगे ॥ २७ ॥ आजि उद्धवाचे भाग्य पूर्ण । जगी उद्धवचि धन्य धन्य । ज्यासी संतुष्टला श्रीकृष्ण । न करितां प्रश निजगुह्य सांगे ॥ २८ ॥ वाळक काय भूक सागे । मग माता स्तन देऊं लागे । ते कळवळ्याचे पागें । धांवोनि निजांगें स्तनपाना लावी ॥ २९ ॥ त्याहूनि अतिआगळा । कृपणी उद्धवकळवळा । तो स्वभक्तांची भजनकळा । जाणोनि जिव्हाळा पोखिते ॥३०॥वाळक नेणे आपुली चिता । परी माता प्रवर्ते त्याच्या हिता। तेवीं उद्धवाचे निजस्वार्था । श्रीकृष्णनाथा कळवळा ॥३१॥ त्या उद्धवाचे जे जे न्यून । तें तें करावया परिपूर्ण । प्रवर्तलासे श्रीकृष्ण । तो निजनिर्गुण उपदेशी ॥३२॥ पंचविसावे अध्यायीं जाण । सांगोनि गुणजयोलक्षण । लक्षवील निजनिर्गुण । हेंचि निरूपण निजनिष्ठा ॥ ३३ ॥ प्रकृतिपुरुपविवेक। झालियाही बुद्धिपूर्वक । जंव गुणजयो नाहीं निष्टंक । तंव वाढे सुखदुःखअहंभावो ॥ ३४॥ तिही गुणास्तव देह झाला । देहीं गुणजयो न वचे केला । मूलउच्छेदू आपुला । न करवे वहिला कोणासी ॥ ३५ ॥ दांडा जन्मला वृक्षजातीसी । तो मिळोनियां कुन्हाडीसी । समूळ छेदवी वृक्षासी । तेवीं विवेकासी सत्वगुण ॥३६॥ विवेका मीनल्या सत्वगुण । समूळ उच्छेदी तिनी गुण । सहजे प्रकटे निजनिर्गुण । तेव्हा गुणच्छेदन तें मिथ्या ॥३७॥ समूळ मिथ्या तिनी गुण । नित्य सत्य निजनिर्गुण । येचि अर्यांचे निरूपण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत ॥ ३८ ॥ श्रीभगवानुवाच । गुणानामसमिश्राणा पुमान्येन यथा भयेत् । तन्मे पुररावयेंदमुपधारय शसत ॥३॥ ज्याचेनि चरणे पवित्र क्षिती । नामें उद्धरे त्रिजगती । ज्याची ऐकता गुणकीती । क्षयो पावती महापापें ॥ ३९ ॥ ज्याचें मृदु मधुर अविट नाम । उच्चारिता निववी परम । तो उद्धवासी पुरुषोत्तम । आवडी परम बोलत ॥ ४० ॥ सत्व रज तम तिनी गुण । न मिसळता भिन्नभिन्न । पुरुपापासी एकैक गुण । उपजवी चिह्न ते ऐका ॥४१ ॥ नि:सदेह सावधान । निर्विकल्प करूनि मन । ऐकतां माझे वचन । पुरुपोत्तम पूर्ण होइजे स्वयें ॥ ४२ ॥ माझे स्वरूपी सद्भावता । ते पुरुपाची उत्तमावस्था । माझे वचनीं विश्वासता । पुरुषोत्तमता घर रिघे ॥४३॥ ऐसी उत्तमा अतिउत्तम । निर्गुण पदवी निरुपम । तुज मी अर्पितसे पुरुषोत्तम । माझें वचन परम विश्वासल्या ॥ ४४ ॥ भक्तिभावार्थ परम श्रेष्ठ । वचनविश्वासी अतिवरिष्ठ । यालागी उद्धवासी पुरुपश्रेष्ठ । स्वमुखें वैकुंठ साधा ॥ ४५ ॥ ससारी योनि अनेगें। त्यामाजीं मनुष्यत्व अतिचाग । तेही अविकळ' मागील अध्यायांत सारयशास्त्र सागितले आहे. या शास्त्राच्या योगाने सटीचा उपक्रम व उपसंहार परममाप्रियाय सर्व काही मामिक कसे आहे हे समजतें २ बोलिला ३ कळों आली, समजला... ५ पोपीत, पाठवीत हेच शिल्पण निष्ठापूर्वक ऐकल्यास आपल्या निर्गुणखरूपाप्रत पायवाल, लक्षात पा र मियल्यास १० कधीही पटाळा न आणणारं, निरंतर गोड अस ' ११ पुपान - - - १३ पुष्पट १४ उत्तम