पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/660

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. तक । अतःकरणचाळक । देव प्रकाशक कर्माचे ॥३४॥ त्रिविध अहंकारवृत्ती । गुणक्षोमें क्षोभक शक्ती । यापरी झाली उत्पत्ती । ब्रह्मांडस्थितीलागुनी ॥ ३५ ॥ , मया सचोदिता भावा सर्वे सहत्यकारिणः । अण्डमुपादयामासुर्ममायतनमुत्तमम् ॥ ९ ॥ भूतां परस्परें वैर देख । पृथ्वीतें गिळू धांवे उदक । उदकातें आवश्यक । तेज देख निर्दळी ॥ ३६ ॥ तेजाते प्राशी पर्वन । पपनातें ग्रासी गगन । एवं भूतांसी सौजन्य । सर्वथा जाण असेना ॥३७॥ तेथ अंतयोमिरूपं मी जाण । स्वयें प्रवेशोनि आपण । भूते मेळवूनि पूर्ण । करी संरक्षण मर्यादा ॥ ३८ ॥ माझे मर्यादेची रेखा । पृथ्वी न विरवी ज्दका । उदकातें तेज देखा । न लववी नखा शोपाचे ॥ ३९ ॥ तेजाते न प्राशी पवन । वायु स्वेच्छां विचरतां जाण । सर्वथा ग्रासीना गगन । गतिबंधन करीना ॥१४०॥ यापरी ही महाभूतें । एकवटूनि समस्ते । ब्रजिले ब्रह्मांडातें । मज महापुरुपाते वस्तीशीं ॥ ४१॥ सप्तावरणेसी प्रचंड । आवो साधूनि उदंड । निर्माण केले ब्रह्मांड । मयूरांड आकारें ॥४२॥ तसिनह समभवमण्डे सलिलसस्थिती। मम नाम्पामभूत्पम विश्वारय तन चारमभू ॥ १० ॥ __ असें ब्रह्मांड जे विद्यमान । त्यामाजी मी नारायण । लीलाविग्रही झालों जाण । आपण्या आपण विश्वात्मा ॥ ४३ ।। त्या माझे नाभीसी नाभिपद्म । विकासले विश्वधाम । त्याहीमाजी उत्तमोत्तम । आत्मभ नाम जन्मला ब्रह्मा ॥४४॥ नाहीं योनिद्वारा उदर-' गर्भू । मज आत्म्यापासूनि स्वयंभू । उपजला यालागी आत्मभू । नामाचा गोभू ब्रयासी ॥ ४५ ॥ ब्रह्माड तो विराटदेहो । त्याचा मुख्य भाग विग्रहो । माझे नाभिकमळी पहा हो । ब्रह्मदेवो जन्मला ।। ४६ ॥ करावया लोकसर्जन । पद्मनाभाचे नाभीसी जाण । स्वयें जन्मला चतुरानन । रजोगुणप्राधान्य ॥ ४७ ॥ . सोऽमजत्तपसा युक्तो रजसा मदनमहात् । लोकान् सपालान् विश्वात्मा भूर्भुव स्वरिति विधा ॥ ११ ॥ ब्रह्मा रजोगुणप्रधान । नाभिकमळी वैसोनि जाण । मी जन्ममूळ जो नारायण । त्यासी तो आपण देखेना ॥४८॥ स्वयें बैसल्या कमळासी । कमळमूळ न कळे त्यासी । देखे एकार्णव जळासी । रजोगुणेसी मोहित ॥ ४९ ॥ ते. कमळमूळ पहावया बुडी । एकार्णवी घालोनि उडी । बुडता दिवसाचिया कोडी । त्या मूळाची जोडी न लभेचि ब्रह्मा ॥१५॥ तेय निजला जळभये । वाहेरी उसासे लवलाहें । कमळावरी बैसोनि पाहे । करावे काये स्मरेना ।। ५१ ॥ धांव पाव गा अच्युता । निवारी माझी जगदंधता। तुजवाचूनि सर्वथा। सरक्षिता मज नाहीं ॥ ५२ ॥ ब्रह्मा माझं पोटींचे बाळ । रजें रजाध झाले केवळ । धरोनि ठेला नाभिकमळ । कृपा तत्काळ मज आली ॥ ५३॥ मज विश्वात्म्याचे अपत्य । जडत्वे राहिला तटस्थ । म्या उपदेशिला तेध । सृष्टिसर्जनार्थ तपोनिष्ठा ॥ ५४ ॥ महाकल्पादीचे मांडणी । माझिया अशरीरी वाणी । तप तप या दों वचनीं । उपदेशिला अंग्रगणी चतु. रानन ॥ ५५ ॥ यथोक्त तप करिता जाण । वृद्धि पावला सत्त्वगुण । त्याचिया सात्त्विफता पूर्ण । प्रत्यक्ष नारायण मी झालों ॥५६॥ काळनयीं अबाधित । तूंचि विश्वात्मा निश्चित । है चतुःश्लोकी भागवत । म्या त्यासी तेथ उपदेशिलें ।। ५७ ॥ माझिया उपदेश. भर २ मायु भाकार ४ मैत्री ५ स्वेच्छेने ६ पीपदी मोराचे अड' ८ लीलेन देह धारण करणारा. पाठा भापारमत स्थान १. सयभ ११ शरीर १२ रोकाची उत्पत्ति १३ घाबरला १४ जगाविपया आधळेपण, १५ मटि उपस करण्यासाठी १६ आकारवाणीने. १७ श्रेष्ठ १८ बार लोकाचे मूळ भागवत + + - -- -