________________
एकनाथी भागवत. देव ॥ ८५ ॥ भिंती पडल्या. भूमीवरी । ते मेळवी आपण्यामाझारी । तेवीं निर्गुणनिर्विकारी । इद्रियें अधिष्ठात्री, येती ऐक्या ॥ ८६ ॥ स्वदेही परदेही जाण ।'इंद्रिये अधिष्ठात्री समान । इंद्रियांचे सुखदुःख दारुण । आपुलें आपण भोगिती देव ॥ ८७ ॥ हातें हाणतां तोंडावरी । तेथ इंद्र अग्निः अधिष्ठात्री । तेव्हां इंद्रचि अग्नीतें मारी । आत्मा अविकारी दुःखातीत ॥ ८८ ॥ हो, का मुखें डसल्या हातासी । अग्नीने घाय केलें इंद्रासी । आत्मा अलिप्त इंद्रियदेवासी । सुखदुःख त्यासी, स्पर्शेना ॥ ८९॥ परमुखें स्वमुखावरी थुकिजे। दोहीं मुखीं अग्निने नादिजे । तेथ कोणे कोणावरी कोपिजे । आत्मस्वरूपी दुजे असेना ॥७९०॥ थुक आणि जे कां मूत । देही उपजे देहाचे अपत्य । तें देहींचे देहावरी लोळत । कोपे तेथ कोण कोणा ॥ ९१ ॥ स्वमुखें परामुखा चुंबन दीजे । तेथ अग्नीने अग्नीसी चुविजे । तेणे सुखें कोण फुजे । आत्मत्वीं दुजें असेना ॥९२॥ स्वदेहें परदेहा आलिगन । उभयस्पर्शी वायूचि जाण । तेणे सुखें सुखाचे कोण । दुजेपण असेना ॥ ९३ ॥ यापरी देवतागण । नव्हे सुखदुःखांसी कारण । आत्म्याचे ठायीं देवतें, जाण । हारपती पूर्ण अभेदत्वे ॥ ९४ ॥ देवी देहो पीडिता निःशेख । देहाभिमान्या होईल दुःख । हे मानिती ते अतिमूर्ख । तेही देख घडेना ॥ ९५ ॥ पुर मणिजे देहो देख । ते पुरी पुरनिवासक । तो सकळ देही पुरुष एक । तेथ कोणाचे दुःख कोण मानी ।। ९६ ॥ जेवीं सभ्रमें आवेशवेगी। निजकर हाणतां निजांगी । तेथील व्यथेचा भागी। कोपावयालागी आप आपण्या ॥९७॥ देखता आपले एकपण । कोणाची व्यथा मानी कोण । कोण कोणावरी कोपे जाण । आपण्या आपण एकला ॥९८ ॥ तेवीं विश्वात्मा मीचि एक । मीचि दैवते मीचि लोक । तेथ कोण कोणा दुःखदायक । म्या कोणावरी देख कोपावे ॥ ९९ ॥ यापरी स्वयें विचारितां । देवांपासाव सुखदुःखता । समूळ न घडे सर्वथा । दैविकी व्यथा घडेना ॥ ८००।। आत्मा सुखदु खासी-कारण । मूळी मजचि हे अप्रमाण । आत्म्याच्या. ठायीं कार्यकारण । सुखदुःख जाण असेना ॥१॥ आएमा यदि स्यात्सुखदु खहेतु किमन्यतस्तन निजस्वभाव । न ह्यारमनोऽन्यद्यदि तन्मृपा स्यात्क्रुध्येत, कमान सुख न दु खम् ॥ ५३ ॥ आत्मा केवळ एकला एक । तेय कैंचे सुख कैचे दुःख । आत्मा सुखदुःखदायक | ह्मणती ते मूर्ख अविवेकी ॥२॥ जेवीं विधुरले घृत जाण । त्यासी नसे आकार ना वर्ण । तेंचि सहजें बिजोनि जाण । दिसे शुभ्रवर्ण कणिकारूपें ॥३॥ त्या घृतकणिका मिळता देख । नाहीं परस्परें सुखदु ख । तेवों निजात्मा एकला एक । तोचि अनेक स्वरूपें ॥४॥ जळी जळाच्या अळलहरी । आदळताही परस्परी । सुखदुःस नुमैटे त्यामाझारी । तेवी चराचरी परमात्मा ॥ ५॥ परमात्मा एकला एक । एकपणेचि तो अनेक । तेथ विजातीय नाही देख । मा सुखदु ख : कोणाचें ॥६॥ आत्मा सुखरूप अवघा एक । तेथ आभासे जे अनेक । ते मायामय. काल्पनिक । स्वभप्राय देस मिथ्यात्वे ॥ ७॥ मृगजळीं १ नियामक देवता सर्वांच्या एकच भाहेत सर्वाच्या हाताची देवता एक्च झणजे इद्र होय, सर्वांच्या मुसाची देवता एक्य झणजे भमि होय २ देहापासून झाटेलें, मूल ३ चढून जातो, फुगतो ४ पुरात राहणारा, जो पुरनायक ५ देवतापासून ६ देवासरधी ७ पातळ झालेले तूप ८ उद्भवत नाहीं ९ दुसरा, मिगजातीचा. १० तर मग.