Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/642

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ऐसेनि परिपक्क विश्वासीं । येऊनि सद्गुरुचरणांपाशी । तनु मन धन सर्वस्वेसीं । गुरुवचनासी विश्वासे ॥ ४२ ॥ पूर्ण विश्वासाचे लक्षण । होतां गुरुवाक्यश्रवण । परिसी लोह पालटे जाण । तैसे अंतःकरण पालटे ॥ ४३ ॥ गुरुवचन सागोन राहे । परी मनींचें मनन न राहे । कीटकी भ्रमरी ऐसा पाहे । तद्रूप होये निदिध्यासे ॥४४॥ तेव्हा कमनीय कामिनी धन । ते देखे विष्ठेसमान । निंदा द्वेष मानाभिमान । हे मनाचे अवगुण मनचि नाशी ॥४५॥ धन्य धन्य मनाची मैत्री। विश्वास धरोनि निर्धारीं । जन्ममरण जीवे मारी । जीवातें करी अजरामर ॥४६॥ ऐसी मनाशी करितां मैत्री । मन परम उपकारी। जीवातें धरूनि निजकरीं । स्वानंदसागरी वुडी दे॥४७॥ तेथ मनाचे मनपण सरे। जीवाचें जीवपण विरे । बंधमोक्षाची धाव पुरे । समूळ ओसरे भवभय ॥४८॥ मनाचें मिनत्व यापरी । आपुले कुळ स्वयें संहारी । आपणही मरे मित्रोपकारी । मन मित्राचारी अवंचेक ।। ४९ ॥ ऐसे मैत्रीसी मन सादर । जवळी असता निरतर । त्यातें बोसनि पामर । प्राकृत नर मित्र करिती ॥ ७५० ।। वैर करोनि मनचि मारावे । मित्रत्वे मनें मन साधावे । इयें दोनी जैन सभवे । तै उपेक्षावे मनातें ॥ ५१ ।। मन ह्मणेल ते न करावे । मनाते हाती न धरावे । मनाते कांहीं नातळावे । जीवेभावे निःशेप ।। ५२॥ मन ह्मणेल जे सुख । तें साडावे आवश्यक । मन ह्मणेल जे दुःख । तेही निगेख त्यजावे ॥५३ ॥ ऐसे उदास मन देख । जो करी आवश्यक । तरी तो झाला अमनस्क । शांति अलोलिक ते ठायीं ॥ ५४ ॥ शत्रु मित्र उदासीन । करूनि वश्य न करी मन । जो धरी देहाभिमान । त्याचे भवभ्रमण सरेना ॥ ५५॥ . देह मनोमानमिम गृहीत्वा ममाहमित्यन्धधियो मनुष्या । रपोऽहमन्योऽयमिति भ्रमेण दुरन्तपारे तमसि भ्रमन्ति ॥ ५० ॥ आत्मा विदेही चिद्धने । तेथ मी देही हे मानी मन । त्या देहासर्व मीमाझेपण । जन्ममरण सुखदुःखें ॥५६॥ आत्मा नित्यमुक्त विदेही । तो मनाची एकात्मता पाही। विदेही तो ह्मणवी देही । शेखी देहाच्या ठायीं आत्मत्व मानी ॥ ५७॥ मी देह हे मानी मन। तेणे दृढ होय देहाभिमान । तेव्हां देहचि होय आपण । मीमाझेपण ते ठायी ॥ ५८ ॥ मी सच्चिदानद परिपूर्ण । हे आपले विसरे आपण । मी वैश्य शूद्र क्षत्रिय ब्राह्मण । मूखें सज्ञान मी एक ॥ ५९ ॥ मी रोडका बोडका कुन काण । मी घाटा मोटा विचक्षण । हे नाथिले घेऊनि देहगुण । माणुसपण स्वये मिरवी ॥ ७६० ॥ स्वमामाजी सन्यासी । आपणा देखे अत्यजवंशी । तो आतळो भी ब्राह्मणासी । जीवास तैसी दशा झाली ॥ १॥ स्वयें परमात्मा भेदशून्य । तेथ मी माझे स्त्री पुत्र धन । स्वजन दुर्जन उदासीन । त्रिविध भेद पूर्ण सत्यत्वे मानी ॥ १२॥ ऐसी देहात्मभावसिद्धी । सत्य मानितां भेदविधी । जीवाची निजात्मवुद्धी । झाली त्रिशुद्धी आधळी ॥ ६३ ॥ जेसा स्वप्नीचा मिथ्या वेव्हार । तैसा मनःकल्पित ससार । तो मानिताचि साचार । देहअहंकार दृढ झाला रोखड परिसाला लागले झणजे सोने होते २ मोहक, सुदर ३ परब्रह्म ४ ससारभय भोसरून जातें ५ मनीत पसवाफ्सची न करणारे ६ टाकून ७ मन ह्यात ठेवणारा, मनरहित ८ विलक्षण ९ ज्ञानपूर्ण १० धीद ११ मिथ्या, नसलेले ११ शिपायला मितो १३ भेदप्रकार, १४ प्यवहार, किया