Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/612

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५९४ एकनाथी भागवत. यक्षवित्त । जीवाहून आप्त अर्थ मानी ॥ १२ ॥ स्वशरीरीं भोग नाही जाण । तेणें इह लोक झाला शून्य । नाहीं स्वधर्मकर्म पंचयज्ञ । परलोक शून्य तेणें झाला ॥ १३ ॥ वज्ञाचे पंच विभागी। यज्ञभाग न पवे त्यांलागीं । ते कोपोनिया पंचविभागी। वित्तनाशालागी उद्यत ॥ १४ ॥ पावोनि ब्राह्मणजन्म वरिष्ठ । धनलोभ स्वधर्मनष्ट । तो होय उभय लोकी भ्रष्ट । पावे कष्ट कृपणत्वे ।। १५ । करितां अतिआयास । जोडला अर्थ बहुवस । त्यासी अधर्मे आला नाश । तोही विलास हरि सांगे ॥ १६ ॥ तवध्यानविखस्तपुण्यस्कन्धस्स भूरिद । अर्थोऽप्यगच्छनिधन बह्वायासपरिश्रम ॥ १० ॥ पंचयज्ञदेवता सकळ । येणे उपेक्षिल्या केवळ । तिही द्रव्यलाभाचें मूळ । पुण्यक्षयें तत्काळ छेदिले ॥१७॥द्रव्यप्राप्तिपुण्यदिवाकर। अस्तमाना गेला तो भास्कर । मग द्रव्यलाभाचा अधकार । अधर्मे थोर दाटला ॥ १८ ॥ प्रयासें सचिली सपत्ती। तिसी अधर्म आधाराची ये राती । क्षोभल्या पचधा यज्ञमूती । पंचधा पावती महानाश ॥ १९ ॥ जो सुखी न करी कुटुंबालागी । जो निजात्मा निवविना नाना भोगी । जो द्रव्य न वेची धर्मालागीं। त्यासी पचविभागी ऊठती ॥ १२० ॥ दायादै चोर राजा आगी। अधम रोग सचरे अंगीं । हे पांचजण विभागी । द्रव्यनाशालागी पावती ॥ २१ ॥ नाहीं द्विजपूजा श्रद्धायुक्त । नाहीं लौकिकक्रिया उचित । नाही दानादि धर्म वेदोक्त । द्रव्यक्षयो तेथ : आयश्यक ॥ २२ ॥ जेय नाही वडिलांसी सन्मान । जेथ नाही पंचमहायज्ञ । जेथ गुरूसी करी अभिमान । तेथ क्षयो जाण उद्धवा ॥ २३ ॥ ज्यांसी परांचा द्वेष सदा । जे बोलती परापोंदा । जे चढती धनगर्वमदा । तेथ क्षयो सदा उद्धवा ॥ २४ ॥ त्याच द्रव्यक्षयाचें लक्षण । ग्रंथाधारी निरूपण । स्वयें सागताहे श्रीकृष्ण । दयाळू पूर्ण निजभक्तां ॥ २५ ॥ . ज्ञातयो जगृहु किञ्चित् किशिद्दस्सव उद्धव । दैवत कालत किंचिद्रह्मरन्धो पार्थिवात् ॥ ११ ॥ . स्त्री पुत्र होऊनि एक । तिहीं ठेवा नेला कित्येक । गोत्रज मिळोनि सकळिक । वलाकारें देस वाटा नेला ॥ २६ ॥ चोरी फोडोनिया घर । कादनि नेले भांडार । आगी लागोनिया घर । वस्तु अपार जळाल्या ॥ २७ ॥ हिवाळ्याने गेले शेत । प्रवर्त बुडाला जेथींचा तेथ । विश्वासू ठेवा घेऊनि जात । खतखूतं हारपले ॥ २८॥ भाडी ठेविला कापुर उडे । समुद्रामाजीं तारूं बुडे । पातिकरीवरी घाला पड़े । चहूंकडे अपायो ।॥२९॥ ठक येऊनि एकाती । मुलांम्याची नाणी देती। धनलोभाचे काकुळती । हातींची सपत्ती त्यासी दे ॥ १३० ॥ स्वचक्रवरचक्रविरोधधाडी । खणती लावूनि घर फोडी । तळघरींचे ठेवे काढी । भरोनि कावडी धन नेती ॥ ३१ ॥ पाणीरिघे पेंवाआंत । तेणे धान्य नासे समस्त । घट्ट झोंबोनि हरी सेव । दैवहत तो झाला ॥ ३२ ॥ गोठणी सेणया रोगू पडे । निमाले गायीहागींचे वाडे । उधारें नेले ठाणबंदी घोडे । तो रणी पडे महायुद्धी ॥३३ ।। भूमिनिक्षेप जे करूं जाती। ते आपणियाकडे धूळी ओढिती । तेथ घालूनि निजसपत्ती । तोंडी माती स्वयें घाली ॥ ३४ ॥ बुद्धि सागती बाड चाड । येउनि तोंडी घाला दगड । १ पुष २ दिवाकर-मूर्य ३ भाऊवद, गोनज ४ दुसऱ्याची निंदा ५ रोग, कीड ६ व्यापारधदा ७ सतपनें ८ भागीदाराबर ९ सोटी १० लाइंच्या धामधुमी. ११ कुदळीने राणून भूमीत द्रव्य नेले १२ शिरले १३ धीट, भादगग. १४ गायवाचावर, गुराढोराला १५ पसले, ओस पडले. १६ देणेकरागी, १७ जमिनीत द्रव्य पुरुन ठेवणे