पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/604

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૧૮૬ एकनाथी भागवत. नव्हे अतिनिर्वाण ! पीडा दारुण करितांही ॥ ६९ ॥ कायिक वाचिक मानसिक-त्रिविध, पीडा देख । साधु निजशांती नेटक । जाणोनि विवेक ते साहती ॥ ६७० ॥ उजू वोलतां शुद्ध युक्ती । आक्षेपूनि, हेडाविती । झिडकावूनियां निर्मिती । अपमानिती समेसी ॥७१ ॥, शब्दी शब्दाने करूनि छळ । ह्मणती दुष्ट दुर्जन दुःशीळ । अपवित्र अमंगळ । नष्ट चांडाळ हा एक ॥७२॥ ऐशा दुर्जनांच्या दुष्टोकी । साधु साहे निजशांतीं । ते शांतीची उपपत्ती । विवेकस्थिती अवधारीं ॥ ७३ ॥ पराची जिह्वा वोठ हालती । माझ्या अंगी ते न रुपती । यालागीं क्रोध न ये चित्तीं । निजशांति ढळेना ॥७४ा सभेसी सन्माने पूजिता । लोटूनि घातला खालता । हाणोनियां चरणघाता । नेला परता अपमाने॥७॥ सन्माने जेथ पूजू नेती । तेथ केवळ असे क्षिती । अपमाने जेथ लोटिती । तेथही क्षिती तेचि पै ॥७६ ॥ येथ मान अपमान । कल्पना मनाची जाण । ऐसेनि विवेके सज्जन । द्वेपीना जन निजशांती ॥ ७७ ॥ प्रलोभूनि नाना युक्ती । धने ठकवूनियां निर्सिती। धनलोभ. केवळ अधःपाती । त्याची निवृत्ति जिंही केली ॥ ७८ ॥ त्यांसी निदितांचि जाण । दोपी होइजे आपण । यालागीं क्रोधा न ये मन । शांति सपूर्ण ढळेना ॥ ७९ ॥ शुद्ध बोलती शास्त्रार्थ । अर्थ तितुका अनर्थ । त्या अनर्थी जो करी निवृत्त । त्यातें द्वेपित ते मूर्ख ॥ ६८० ॥ सद्गुणी दोष आरोपिती । नानापरी निदा करिती । तेणे हित मानिती चित्तीं । तारक निश्चिती हे माझे ॥ ८१ ॥ मातेचे जे करतळ । ते वरिवरी क्षाळिती वाह्य मळ । हे जनक माझे केवळ । संबाह्य मळसकळ जिह्वाग्रे धुती ॥ ८२ ॥ ऐशियाचें करितां छळण । हितास नाडिजे आपण । कोणाचे न बोले दोपगुण । तेणें शांति जाण थोरावे ॥ ८३॥ चाले जेणे जीविकास्थिती । धन धान्य क्षेत्र वृत्ती। छळं वळे हिरोनि नेती। तेणे चित्ती क्षोभ नुपजे ।। ८४ ॥ येथ लाभालाभ देवाधीन । त्यासी देतेघेतें तेंचि जाण । यालागी द्वेषीना जन । शातीचा गुण न साडी।। ८५ ॥ वृत्ती घेऊनि उगे नसती । अन्यायी ह्मणोनि वांधिती । एक तोडावरी थुकिती । एक माथा मुतती अतिदुष्ट ॥८६॥ एक ताडिती पाडिती। एक नानापरी गांजिती । तरी अंगींची ढळेना शाती । विवेक सागोती-सजेना ॥ ८७ ॥ थुका आणि जे मूत । ते देहाचिमाजी उपजत । देहींचें देहास लागत । क्षोभ तेथ कोण मानी ॥ ८८॥धुंका आणि जे मूत । जैसे-देही उपजे देहाचे अपत्य । देहाचें देहावरी खेळत । दुःख तेथ कोणाचें ॥८९॥ धरितां मारिता ह्मणे देख। देहो, तितुका, पांचभौतिक । मारिता मारिजता. दोनी एक, कोणाचे दुःख कोणासी ॥ ६९० ॥ ऐशी सविवेकें ज्यासी शांती । चारी मुक्ती त्याच्या दासी होती । त्याचा अकिला मी श्रीपती । यावरी प्राप्ती ते कायी ॥ ९१॥ तेथ केवळ जो मोक्षार्थी । तेणें सर्वस्वे पाळावी शांती । ते दुःखसागरावर्ती । होय तारिती सुखरूप ॥ ९२ ॥ वैराग्य योग-ज्ञान ध्यान । त्याचे फळ ते शाति जाण । ते शाति साधूनि सपूर्ण। आपणिया १नीट, स्थिर. २ सरळ ३ उपहास करितात ,४ शाति उत्पन्न होण्याचे कारण ५ रुतत नाहीत ६ लाथानी ७पृथ्वी. ८ दूर ९ तळहात १. मलमूनादि ११ मनाचा व शरीराचा मळ १२ उदरनिर्वाहाच साधन, पृत्ति १३ देप करीत, नाही १४ डोक्यावर १५ ब्रह्मनिष्ठाचा सोवती विवेक (नित्यानित्यविचार ) असतो १६ मोक्ष ७खाधीन, सेवक +