Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/590

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

થાક एकनाथी भागवत. पां अज्ञान । जें शुद्धोसी लावी जीवपण । त्या जीवाअंगी जन्ममरण । अनिवार जाण वाढवी ॥३॥ स्वस्वरूप विसरोनि जाण । देहीं स्फुरे जे मीपण । अत्यंत दृढतर अज्ञान । तो देहाभिमान उद्धवा ॥ ४॥ गौण नाव त्याचे अज्ञान । येन्हवीं मुख्यत्वे देहाभिमान । हे ऐकोनि देवाचे वचन । दचकले मन उद्धवाचें ॥५॥ तेचि अर्थीचा प्रश्न । देवासी पुसे आपण । कोण्या युक्ती देहाभिमान । जन्ममरण भोगवी ॥ ६ ॥ उद्धव उवाच-त्वत्त परावृत्तधिय स्वकृत कर्मभि प्रभो । उधावचान् यथा देहान् गृहन्ति विसृजन्ति च ॥ ३४ ॥ सर्वत्र सदा समुख गगन । त्यासी कदा न घडे विमुखपण । तेवीं आत्मा संवाह्य परिपूर्ण । वृत्ति विमुख जाण होय कैसी ॥७॥ जाळी बांधवे गगन । ते अक्रिया लागे कर्मबंधन । वंध्यागर्भ सटवे जाण । तैसें जन्ममरण मुक्तासी ॥ ८ ॥ आत्म्यावेगळे काहीं। रितें तंव उरले नाहीं । तरी ये देहींचा ते देही । गमनसिद्धी पाहीं कैसेनी ॥९॥ पृथ्वी रुसोनि वासरां राहे । आकाश पळोनि पन्हीं जाये । ते देहींचा देहातरा पाहे । आत्मा लाहे ससरण ॥ ४१० ॥ सात समुद्र गिळी मुंगी । तें आत्मा उंचनीच योनी भोगी। हे अतयं तर्केना मागी । भुलले योगी ये अर्थी ॥ ११॥ . सन्ममारयाहि गोविन्द दुविभाव्यमनाममि । नीताप्रायशो लोके विद्वास सन्ति वञ्चिता ॥ ३५ ॥ __ अभिनव हे तुझी गती । सर्वथा न कळे श्रीपती । मायामोहित जे चित्ती । त्यां तुझी स्थिति नेणवे ॥ १२ ॥ तूं आत्मा अद्वितीय अविनाश । तेथ उत्पत्ति स्थिति विनाश । नाथिली दाविसी भवभास । हा अतयं विलास तर्कना ॥ १३ ॥ येथ वेदाची युक्ती ठेली । उपनिपटें वेडावली । पुराणे मुकी झाली । अतियत्ने लक्षिली न बचेचि मांगी ॥१४ा तुझे केवळ कृपेवीण । तुझें इत्थंभूत नव्हे ज्ञान । ऐसे जड मूढ हरिकृपाहीन । त्यांसी भवबंधन तुटेना ॥ १५ ॥ तुझे योगमायेची अतयंता । ब्रह्मा भुलविला , यत्सें नेता । शिवू भुलविला मोहनी देखतां । इतरांची कथा ते कोण ॥ १६ ॥ प्रपंची अथवा परमार्थी । तुझेनि चालती इंद्रियवृत्ती । यालागी गोविंदैनामाची ख्याती । त्रिजगती वाखाणिली ॥ १७ ॥ सादर कृपापूर्वक आपण । माझा सांगावा अतयं प्रश्न ।, देहीं देहातरा सचरण । जीवास जन्ममरण तें कैसे ॥ १८ ॥ ऐकोनि उद्धवांचा प्रश्न । हासिनला मधुसूदन । हे अवघे मायिक जाण । कल्पनाविदोन मनोमय ॥१९॥ श्रीभगवानुवाच-मन कर्ममम नृणामिन्द्रिय पचमियुतम् । लोकालोक प्रयात्यन्य आरमा तदनुवर्तते ॥३६॥ अकरा इंद्रिय पंच महाभूतें । हैं सोळा कळांचे लिंगदेह येथे । मुख्यत्वे प्राधान्य मनाचें तेथें । नाना विषयातें कल्पक ॥ ४२० ॥ येथ लिंगदेह तेंचि मन- मनाअधीन इंद्रिये जाण । मनाचेनि देहासी गमन । तेथ देहाभिमान मासवे ॥२१॥ मन स्वखरूपाची विस्मृति हेच मज्ञान २ पराअसत्य ३ आतबाहेर ४ पतन पावतो, सटवीच्या पाधेनें मरतो. ५ आश्रयाला ६ पलीकडे, दूर "हाणोनी थोरपण पन्हा साडिजे ।"-झानेश्वरी अध्याय ९३७८ ७ देहातरगमन, जन्ममरण ८ विचारसरणी, पदति ९ विलक्षण, अद्धत १० नसता ११ पाहिली जात नाही, जाणण्यास अशक्य आहे. १२ पूर्ण १३ इदियरत्तींचा चालक हाणून तुला गोविंद ह्मणतात गो झणजे इद्रिये त्याना वागविणारा तू आहेस १४ मधुदेस्याला मारणारा १५ परपनेची करणी १६ पाच इद्रियांसह मन भणजे लिंगदेह है कमांधीनत्वामुळे वासनेच्या थाप देहांतर करिते सग भारमा मनाहून भिन्न असून लिंगदेहच मी अशा मभिमानाने 'मी जातो येतो ब मानतो मान