________________
५७२ एकनाथी भागवत निरूपिलें जाण । हे ज्ञानेंद्रियविंदान । त्रिपुटी संपूर्ण ऐशा रीतीं ॥५८॥ चित्त इंद्रिय जें का येथ । चिंतन विषयो त्यासी प्राप्त । वासुदेव अधिदैवत । आत्मा अलिप्त चित्तेंसी ॥ ५९ ॥ मनेद्रिय अतिचपळ । संकल्प विषयो त्याचा प्रवळ । तेथ अधिदैव चंद्र निर्मळ । आत्मा केवळ मनातीत ॥ ३६० ॥ अहंकार इंद्रिय कठिण । तेथील विषयो मीपण । रुद्र अधिदैवत जाण । परमात्मा भिन्न अहंकारेसीं ॥ ६१ ॥ बुद्धींद्रिय अतिसज्ञान । वोद्धव्य तेथींचा विपयो जाण । ब्रह्मा अधिदैवत आपण । आत्मा चिद्धन बुद्ध्यतीत ॥ ६२ ॥ चित्तचतुष्टय सकारण । त्रिपुटी सांगीतली हे संपूर्ण जाण । आतां कर्मेंद्रियाचे लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ १३ ॥ वागिंद्रियीं वाच्य विषयो । अग्नि अधिदैवत तेथील पहा हो । तेथ सरस्वतीशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो महामौनें ॥ ६४॥ पाणींद्रियीं ग्रहण विपयो । इंद्र अधिदैवत तेथील पहा हो । तेथ क्रियाशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो अक्रियत्वे ॥६५॥ पादेंद्रियी गति विषयो । तेथें उपेंद्र अधिदेवो । तेथें गमनशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो निश्चलत्वे ॥६६॥ गुदेंद्रियीं विसर्ग विषयो । निति अधिदैवत तेथील पहा हो । क्षरशक्तीचा तेथ निर्वाहो । त्यासी अलिप्त देवो अक्षरत्वे ॥६॥ शिश्शेद्रिया रति विषयो। प्रजापति तेथे अधिदैवो । आनंदशक्तीचा तेथे निर्वाहो । त्यासी अलिप्त देवो परमानदें ॥६८॥ ज्ञानकर्मेंद्रिय कर्माचरण । चित्तचतुष्टयाचे लक्षण । हे गुणक्षोभाचे कारण । समूळ जाण मायिक ॥ ६९ ॥ तेचि गुणक्षोभाचे प्रधान मूळ । प्रकृतिविकारें होय स्थूळ । आत्मा अविकारी निर्मळ । अलिप्त केवळ प्रकृतीसी ॥ ३७० ॥ जेवी वृतिभूमीसमवेत । गृहीं गृहसामग्री समस्त । अभिमानें उपार्जी गृहस्थ । परी तो त्याअतीत आपण जैसा ॥ ७१ ॥ तेवी त्रिगुणक्षोभे अभिमान । वाढवी नाना विकारवन । आत्मा वसत तो भिन्न । तेंचि निरूपण हरि बोले ॥ ७२ ॥ __ अह निवृन्मोहविक्रपहेतुःकारिकस्तामस ऐन्द्रियश्च ॥ ३२ ॥ आत्मा परिझानमयो विवादो हास्तीति नास्तीति भिदाऽर्थनिष्ठ । अहंध्यासे संसारप्राप्ती । जीवासी लागली निश्चिती । त्या अहंकाराचे निवृत्तीं । भवनिर्मुक्ती जीवासी ॥७३ ॥ ऐसा वाधकत्वे दुर्धर । कैंचा उठिला अहंकार । हाही पुसों पाहसी विचार । ऐक साचार सागेन ॥ ७४॥ स्वस्वरूपात विसरून । हद जे स्फरे मीपण । तोचि अहंकार जाण । विकारें त्रिगुणक्षोभक ॥ ७५ ।। जागृतीचा जो विसरू । तोचि स्वप्नसृष्टीचा विस्तारू । वस्तुविमुख जो अहंकारू । तोचि संसारू त्रिगुणात्मक ॥७६ ॥ विकारें क्षोभती तिन्ही गुण । हे विस्मरण मोहाचे लक्षण । तेणे विकारले तीन गुण । ते विभाग भिन्न अवधारीं ॥ ७७ ॥ मूळी वोलिला चैकारिकू । तो अहंकार जाण सात्विकू । तो चित्तचतुष्टयद्योतकू । होय प्रकाशकू अधिदैवें ॥ ७८ ॥ सत्वापासोनि उपजे मन । मनापासाव विकार गहन । यालागी वैकारिक जाण । सत्वगुण बोलिजे ॥ ७९ ॥ १ यापरी • तमोगुणाची देवता ३ जे जाण्याचे ते ४ जाण ५ ओळखण ६ आसफ म होणारा ७ मलोत्सर्ग धरणे ८ पूर्वाजिंस कुटुपानवाहक जी भूमि तीसह ९ सपादितो १० विकारपण ११ 'हा मी, हे माझे अशा निल चिंतनाने १२ खवरूपाला विसरणारा १३ विकार. १४ मा, सुद्धि, चित्त व अहकार, याचा प्रकाशक