________________
५७० एकनाथी भागवत । " . . मूपमा वपुरन रन्धे परस्पर सिध्यति यः स्वत से।। ।। मारमा यदेपामपरो य,आद्य स्वयाऽनुभूत्याऽसिलसिद्धसिद्धिः ॥ ३१ ॥ चक्षु इंद्रिय यंत्र थोर । तेथ कोमिनीरूपाचा महामार । धायें भेदिती जिव्हार । पडले सुरनर कोव्यानुकोटी ॥ १५ ॥ चक्षुगोल इंद्रिय शरीरीं । तेथ अधिदैव सूर्य अधिष्ठात्री । देखिल्या रूपाची धारणा धरी । तेचि निजनिर्धारी अध्यात्म ॥१६॥ नीलपीतरूपाभरण । दृष्टी देखिजे दर्शन । तेचि अधिभूत सत्य जाण । दृश्याचे भान दृष्टीसी ॥१७॥ सूर्य अधिदैव सिद्ध आहे । अधिभूत दृष्टी भरले पाहें । शरीरी चक्षुगोळही होये । परी अध्यास्मतेजेंवीण राहे अधत्व ॥ १८ ॥ अधिदैव अधिभूत असता पाहीं । अध्यात्म तेज जंव दृष्टीसी नाहीं । तंव देखणे न घडे काहीं । अंधत्व ते ठायीं ठसावोनि ठाके ॥ १९ ॥ अध्यात्म अधिभूत दोनी आहे । अँ अधिदैव सूर्य अस्ता जाये । तँ दृष्टीचे देखणें ठाये । स्तब्धत्वे राहे तमामाजीं ॥ ३२० ॥ ते काळी दृष्टीसी पाहे । स्नेहसूत्र मेळवून लाहे । अग्नि जरी केला साह्ये । तरी प्रकाशू नोहे रवीऐसा ॥ २१ ॥ तेथ चंद्रोदयो जरी जाहला । तो सूर्यसमान नाही आला । निशा निरसूनि दृष्टी साह्य जाहला । यालागी सूर्य बोलिला अधिदैव ॥ २२ ॥ अध्यात्म अधिभूत असतां पाहीं । अधिदैव सूर्य जेथ नाहीं । तेथ दृष्टीचें न चले काहीं । तुज म्यां तेंही सागीतले ॥२३॥ अध्यात्म अधिदैव दोनी आहे । अधिभूतें दृश्यदर्शन राहे । तै सत्य ब्रह्मज्ञान होये । जै गुरुकृपा पाहे पूर्णाओं ॥ २४ ॥ येथ जें दृश्याचे दर्शन । तेणें देहबुद्धि दृढे जाण । तें दृश्याचें पुशिल्या भान । होय देहेंशी शून्य ससार ॥ २५ ॥ अधिदैव अध्यात्म अधिभूत । त्रिपुटी बोलिजे हे येथ । तुज म्यां सागीतली साद्यत । जाण निश्चित विभाग ॥ २६ ॥ येथूनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दर्शन । कर्म कर्ता क्रियाचरण । ध्येय ध्यान ध्यातृत्व ॥ २७ ॥ त्रिपुटी ह्मणावयाचे कारण । परस्परें सापेक्षपण । ते अपेक्षेचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ।॥ २८ ॥ नानाकारें अतिविलास । येथ देखणी दृष्टी डोळस । तेही सूर्यवीण वोस । हा अनुप्रवेश परस्परें ॥ २९ ॥ सूर्य आहे डोळा नाही । तेथ पाहणे न चले पाहीं । हो कां डोळा आहे सूर्य नाही । तेथे दृष्टीचे काही चालेना ।। ३३० ॥ सूर्य आणि दृष्टी दोनी आहे । परी दृश्य जै नाहीं होये । तै दोहींचे सामर्थ्य राहे। देखावे काये दृष्टीनें ॥ ३१ ॥ सूर्य प्रकाशी रूपासी । दृष्टींसी रिघोनिया स्वाशेसीं । दाखवी नाना आकारासी । परस्परानुप्रवेशी बोलिजे सिद्धी ॥ ३२ ॥ इतुकें करोनिया संविता । नभोमंडळी अलिप्तता । तेवीं 'जगदा कारें चेतविता । अलिप्त तत्त्वतां चिदात्मा ॥ ३३ ॥ जो जगामाजीं भरला राहे। जगाचा हृदयस्थही होये । जग जरी होये जाये। परी तो आहे जैसातैसा ॥ ३४॥ जेवी आकाश अभ्यंतरीं । होता घटाकाश सहस्रवरी । आकाश त्या 'घटाभीतरीं । प्रत्यक्षाकारी १ कामिनीयनाचा २ प्रहाराने ३ चित्त ४ विकारी कार्यवर्ग स्यूलरूपाने पाहिला तर अध्यात्म, अधिदैव आणि अधि"भूत असा निकारक आहे नेनाचे उदाहरण घ्या नेनेंद्रिय (अध्यात्म), रूप (अधिभूत) व नेत्रंद्रियात प्रविष्ट झालेला 'सूर्यप्रकाशक (अधिदेव ) ही तीनही असतील तरच परस्पराची सिद्धि होठे ५ पाढे ६ मारमापासून तों शेवटपर्यंत. v एकमेकांची एकमेकास अपेक्षा असते ह्मणून हिला निपुटी मणतात ८ शून्य ९ दृष्टीचिया स्वअशेसी १० सूर्य ११ सूपाला भापल्या सिद्धीसाठी कोणाची अपेक्षा नाही १२आत