Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/570

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५५६ एकनाथी भागवत. सत्यत्वें दाविशी डोळां । हा अतिशय अगाध सोहळा । तुझी अतयं लीळा तर्केना ॥९॥ अचेतनी चेतनधर्म । प्रत्यक्ष दाविशी तूं सुगम । हेंचि तुझें न कळे वर्म । करोनि कर्म अकर्ता ॥ १०॥ अकर्ताचि तूं होशी कर्ता । कर्ता होत्साता अकर्ता । हे तुझी खांबसूत्रता। न कळे सर्वथा कोणाते ॥ ११॥ तुझी माया पाहों जातां । तोचि मायेने ग्रासिला तत्तां । असो तुजचि पाहों ह्मणतां । तेही सत्वावस्था मायेची ॥ १२॥ ऐसे तुझे खांव सूत्र । अकळ न कळे गा तुझे चरित्र । देखों नेदितां निजसूत्र । भूते विचित्र नाच. विशी ॥ १३ ॥ तुझेनि जग होये जाये । परी म्यां केले हे ठावे नोहे । ऐसा तुझा खेळ पाहें । कोणे काये लक्षावा ॥ १४ ॥ यापरी खेळ वाढविशी । संवेचि विकल्पोनि मोडिशी। विकार महत्तत्त्वीं सांठविशी । हेही कर्तृत्व अगासी न लगत गेलें ॥१५॥ याचे मुख्यत्वें मूळ लक्षण । तुझे कृपेवीण न कळे जाण । तुझी कृपा झालिया पूर्ण । जनीं जनार्दन प्रकटे पैं ॥१६॥ जनीं प्रकटल्या जनार्दन । तद्रूप होइजे आपण । हे मूळींची निजखूण । तेथ मीतूंपण रिगेना ॥ १७ ॥ मीतूपणेवीण प्रसिद्ध । जनी जनार्दन निजानंद । त्याचे कृपेस्तव विशद । श्रीभागवत शुद्ध वाखाणिले ॥ १८ ॥ तेथ एकविसाव्याचे अतीं । वेद त्रिकांड लक्ष्यार्थस्थिती । ब्रह्म एकचि निश्चिती । अद्वयस्थिती अविनाशी ॥ १९ ॥ हे वेदार्थसारनिरूपण । ऐकता उद्धवा पावली खूण । ब्रह्म एकाकी परिपूर्ण । दुजेनिवीण सचले ॥ २० ॥ वेदवादें ब्रह्म एक । स्वानुभवें तैसेंचि देख । तरी ज्ञाते ऋपिजन लोक । केत्री तत्त्वे अनेक बोलती ॥२१॥ येचि आशंकेलागी जाण । उद्धवे स्वयें मांडिला प्रश्न । परी पोटातील भिन्न खूण । उगा श्रीकृष्ण न रहावा ॥ २२॥ मी झालो जी ब्रह्मसपन्न । हैं एकता माझं वचन । निजधामा निघेल श्रीकृष्ण । मग हे दर्शन मज कैंचें ॥ २३ ॥ ऐशिया काकुळती जाण । सशयेंवीण करी प्रश्न । तेंचि ऐकता कृष्णवचन । सुखसमाधान भोगित ॥ २४ ॥ तंव कृष्णाचे मनी आणिक । उद्धव मी दोघे एक । मिथ्या वियोगाचे दुःख । हे कळे तंव देख कृष्ण सांगे ॥ २५ ॥ वाविसावे अध्यायीं देख । तत्त्वसंख्या सांगेल आवश्यक । प्रकृतिपुरुपविवेक । जन्ममरणद्योतक प्रकारू ॥ २६ ॥ आत्मा एक की अनेक । आणि तत्त्वसख्याविवेक । हे कळावया निष्टंक । उद्धव देख पूसत ॥ २७ ॥ उद्धव उवाच-कति तत्वानि विश्वेश सरयातान्यपिभि प्रभो । नवैकादश पञ्चत्रीण्यास्थ त्वमिह शुश्रुम ॥ १ ॥ विश्वात्मका विश्वेश्वरा । विश्वधारका विश्वभरा । विश्वसाक्षी विश्वाकारा । विश्वैकसुंदरा श्रीकृष्णा ॥२८॥ तुज विश्वात्मक ह्मणतां । जड मलिन एकदेशिता । आली ह्मणशी अज्ञानता । यालागीं प्रभुता उपपादी ॥ २९ ॥ जड मलिन अज्ञानता। हे मायेस्तव होती तत्त्वतां । ते मायेचा तूं नियता । हे अगाध प्रभुता पै तुझी ॥ ३० ॥ ऐशिया स्ववोधनद्वारा । विनवूनि स्वामी शारगधरा । तत्त्वसंख्येच्या विचारा । निजनिर्धारा पूसत ॥३२॥ जे तप सामर्थ्य समर्थ थोर । अनागतद्रष्टे ऋपीश्वर । 'त्याची तत्त्वसख्या विचित्र । १ पाहण्याचा प्रयत्न करणारा २ तोचिते ३ गिळिला जातो । सर्वधा ५ समजण्याला अशक्य ६ स्वयचि ७ लक्षणार्थ स्थिती ८ अद्वैतपणाने ५ पदव व कृष्ण एक असन वियोगच नाही असे उदयास पटेपर्यत कृष्ण प्रश्न सांगनात सशयानाचून उद्धव प्रश करितो व उद्धव आणि मी एक है जाणून कृष्ण उत्तर देतात, यावरून दिसते की जगल ल्याणासाठी किंवा तमिपान खमुसानुभव द्विगुणित करण्यासाठी त्यानी हा सवाद पुढे चालविला. १० जन्ममरण दाखविणारा ११ निश्चयरूप. १२ अगाधता १३ भविष्यकाळच्या गोधी आज पाहणारे