________________
५५४ एकनाथी भागवत हे बोलूनि वेद हारपे तेथ । ब्रह्म सदोदित सपूर्ण ॥ ८॥ शुद्ध ब्रह्म मी हे स्फुरे स्फूती । तेथचि ॐकाराची उत्पत्ती । तोही ब्रह्मरूप निश्चितीं । त्यासी ब्रह्म ह्मणती एकाक्षर ॥९॥ त्या ॐकारापासोनि गहन । श्रुति शाखा स्वर वर्ण । झाले ते ब्रह्मरूप जाण । एवं वेद पूर्ण परब्रह्म ॥५१० ॥ जेवीं सोन्याचे अळंकार । पाहतां सोनेचि साचार । तेवीं श्रुतिशाखावेदविस्तार । तो अवघा ॐकार मद्रूपें ॥११॥ जो वेदप्रतिपाद्य पुरुषोत्तम । जो भक्तकामकल्पद्रुम । तो हे बोलिला मेघश्याम । आत्माराम श्रीकृष्ण ॥ १२ ॥ तिहीं काडी निजसंबंधू । पूर्वापर अतिविरुद्धू । हा वेदार्थ परम शुद्धू । तुज म्यां विशदू बोधिला ॥१३॥ याहोनिया परता। वेदार्थ नाहीं गा सर्वथा । तुज म्या सागितला आता । जाण तत्वतां उद्धवा ॥ १४॥ या वेदार्थाची निजखूण । हृदयीं भोगितां आपण । होय जीवशिवा समाधान । ऐसे श्रीकृष्ण बोलिला ॥ १५ ॥ हे ऐकोनि उद्धवे जाण । झाला वेदार्थी निमग्न । दोनी टवकारले नयन । स्वानंदी मन बुडालें ॥१६॥ चित्तचैतन्या मिळणी पाडी । कंठी वाप्प दृढ आडी । लागतां स्वानंदाची गोडी । उमिली गुढी रोमांची ॥ १७ ॥ शरीरी स्वेद सकपता । नयनी स्वानंदजळ येता । वोल बुडाला सर्वथा । मूर्छा येतयेतां सांवरी ॥ १८ ॥ तंव हृदया आली आठवण । हे भलें नन्हे दुश्चिचपण । झणीं निजधामा जाय श्रीकृष्ण । येणे धाके नयन उघडिले ॥ १९ ॥ तंव घवघवीत घनसावळा । मुकुट कुंडले मेखळा । कांसे झळके कसिला सोनसळा । आपाद वनमाळा शोभत ॥ ५२० ।। अतरी भोगी चैतन्यघन । वाहेरी उघडितां नयन । आनंदविग्रही श्रीकृष्ण । मूर्ति सपूर्ण समुख देखे ॥ २१॥ ह्मणे श्रीकृष्ण चैतन्यधन । चैतन्यविग्रही श्रीकृष्ण । सगुणनिर्गुणरूपें जाण । ब्रह्म परिपूर्ण श्रीकृष्ण ।। २२ ॥ बाप भाग्य उद्धवाचें । सगुणनिर्गुण दोहींचें । सुख भोगीतसे साचें । हें श्रीकृष्णकृपेचें महिमान ॥ २३ ॥ जेथ सद्गुरुकृपा संपूर्ण । तेथ शिष्याची आवडी प्रमाण । तो जै मागे मूर्ति सगुण । ते तेचि जाण गुरु दे ॥ २४ ॥ पाहिजे निर्गुण निजप्राप्ति । ऐशी आवडी ज्याचे चित्तीं । तें निर्गुणाचिये निजस्थिती । गुरुकृपा निश्चिती नादवी ॥ २५ ॥ सगुण निर्गुण स्वरूपें दोनी । भोगावया आवडी ज्याचे मनीं । तेही स्थितीच्या गुरु दानीं । कृपालूपी समर्थ ॥ २६ ॥ सद्गुरूचे अगाध महिमान । जे वेदा न वोलवेचि जाण । त्याची कृपा झालिया पूर्ण । दुर्लभ कोण पदार्थ ॥ २७ ॥ ते कृष्णकृपेस्तव जाण । फिटले उद्धचाचे दुर्लभपण । सगुण निर्गुण एक कृष्ण । हे खूण संपूर्ण बाणली ॥ २८ ॥ जाणोनि कृष्णाचें पूर्णपण । त्याचे लक्षोनि श्रीचरण । धावोनि उद्धवे आपण । पाली लोटागण हरिचरणीं ॥ २९ ॥ तेव्हां सांवळा संकर्षण । चारी वाह्या पसरी श्रीकृष्ण । उद्धवा सप्रेमें उचलून । दीधले आलिंगन स्वानंद ॥५३०॥ त्या आलिगनाचें सुख । अनुभवी जाणती देख । जो उद्धवासी झाला हरिख । त्याचा जाणता एक श्रीकृष्ण ॥३१॥ तो कृष्ण हाणे उद्धवा हा विर्साव्याचा विसावा । माझ्या वेदाचा निजगुह्यठेवा । तो हा एकविसावा तुज सांगीतला ॥ ३२॥ जेणे मोडे लिंगदेहाचा याचा । जेणे जीवत्व नाठवे जीवा । तो हा विसाव्याचा विसावा । तुज एक १पहीसा होतो २ चित्त चैतन्यात एक झाले, लय पावले ३ कंपता ४ बेसावधपणा, निश्चतता ५ मानदमूर्ति, भानदाची मूस पाविजे ७ दळपण ८ विसावा घेण्याचे शीतल स्थान, ९ उठाव, मळ,