पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/544

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३२ एनाथी भागवत आतां ग्रंथार्थनिरूपणे । माझें वोलणें तो बोले ॥ २४ ॥ तेणें बोलोनि निजगौरवा।। वेदविभांगसद्भावा । तो एकादशी विसावा । उद्धवासी वरवा निरूपिला ॥ २५॥ तेथभक्त आणि सज्ञान । त्यांसी पावली वेदार्थखूण । कर्मठी देखतां दोपगुण । सगयीं जाण ते पडले ॥ २६ ॥ त्या सशयाचे निरसन । करावया श्रीकृष्ण । एकविसावा निरूपण । गुणदोपलक्षण स्वयें सागे ॥ २७ ॥ त्या गुणदोपांचा विभाग । सांगोनियां विषयत्याग । करावया श्रीरंग । निरूपण साङ्ग सागत ॥ २८॥ श्रीभगवानुवाच-य एतान्मस्पयो हिरवा भक्तिनानक्रियारमकान् । क्षुद्रान्कामाश्चरे प्राणर्जुपात ससरन्ति ते ॥ ॥ म्या सांगीतले जे विभाग । भक्तिज्ञानक्रियायोग । हा सांडूनि शुद्ध वेदमार्ग । सकाम भोग जे वांछिती॥२९॥क्षणभंगुर देहाचा योग । हे विसरोनिया चाग । सकाम कर्माची लगबग । भवस्वर्गभोग भोगावया ॥ ३० ॥ चळतेनि प्राणसगे । देहाते काळ ग्रासू लागे। येथ नानाकामसंभोगें । मूर्ख तद्योगें मानिती सुख ॥ ३१॥ भोगितां कामभोगसोहळे । नेणे आयुष्य ग्रासिले काळें । मग जन्ममरणमाळे । दुःखउमाळे भोगिती ॥ ३२॥ काम्य आणि नित्यकर्म । आचरता दिसे सम । तरी फळी का पां विपम । सुगम दुर्गम परिपाकू ॥ ३३ ॥ ते कर्मवैचित्र्यविदान । सकल्पास्तव घडे जाण । तेचि अर्थीचें निरूपण । जाणोनि श्रीकृष्ण सागत ॥ ३४॥ स्वे स्वेऽधिकारे या निष्टा स गुण परिकीतित । विपर्ययस्तु दोष स्वादुभयोरेप निश्चय ॥२॥ ___ कर्म विचारितां अवघं एक । परी अधिकार भिन्नभिन्न देख । ते मी सागेन आवश्यक। जेणे सुखदुःख भोगणे घडे ॥ ३५ ॥ मुखाचा व्यापार भोजन । तो नाके करूं जाता जाण । सुख वुडवूनि दारुण । दुःख आपण स्वयें भोगी ।। ३६ ॥ का पायांचे जें चालणे । पडे जे डोई करणे । ते मार्ग न कठे तेणें । परी कष्टणे अनिवार ।। ३७॥ तेवीं जें कर्म स्वाधिकारे । सुखाते दे अत्यादरे । तेचि कर्म अन्याधिकारें । दुःखे दुर्धरें भोगवी ॥ ३८ ॥ गजाचे आभरण । गाढवासी नव्हे भूपण । परी भार आणी मरण । तेवीं कर्म जाण अनधिकारी ॥ ३९॥ मेघ व निर्मळ जळ । परी जैसे वीज तैसे फळ. एका भागी पिके सवळ । एका प्रवळ साळी केळे ॥४०॥ पाहें पा जैसे दुग्ध चोख । ज्वरितामुखी कडू विख । तेचि निरुजा गोड देख । पुष्टिदायक सेवनीं ॥ ४१ ॥ तेवीं सकामी कर्म घडे । ते बाधक होय गढेि । तेंचि गा निष्कामाकडे । मोक्षसुरवाडें सुखावी ॥४२॥ स्वाधिकार स्वकर्माचरण । तोचि येथे मुख्यत्वे गुण ! अनधिकारी कर्म जाण । तोचि अवगुण महादोप ॥ ४३ ॥ या रीती गा कर्माचरण । उपजवी दोप आणि गुण । हेंचि गुणदोपलक्षण । शास्त्रज्ञ जाण बोलती ॥ ४४ ॥ तेंचि गुणदोपलक्षण । शुद्ध्यशुद्धीचे कारण । तेचि अर्थीचे विवंचन । देवो आपण सागत ॥ ४५ ॥ शुद्ध्यशुद्धी विधीयते समानेष्वपि घरतुपु । द्रव्यख विचिकित्साथै गुणदोपौ शुभाशुभौ ॥ ३॥ । पचभूत समान जाण । वस्तु सर्वत्र समसमान । तेथ गुणदोप अप्रमाण । परी कल १ फर्म, ज्ञान, व उपासना, अशी वेदाची ती का. करून २ दिधला ३ संसारातील व स्वर्गीय विषयभोगासाठी ४दुखसोहळे ५ परिणाम ६ अनधिर ७ घस्त्रादि अलकार ८ तापकन्याच्या तोंडी ९निरोग्याला १० सहेतुक ११ अस्यत १२ मोक्षलाभाप्रमाणे १३ विचार १४ परमात्मा । -- -- -