पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/542

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत गुण ना धर्म । जेथ माया पावे उपरम । तें परब्रह्म उद्धवा ॥४१॥ माझे स्थान वैकुंठ जाण । तेथील प्राप्ति सायुज्य सगुण । पूर्ण सायुज्यता जाण । ब्रह्म परिपूर्ण सदोदित ॥ ४२ ॥ पावावया पूर्ण परब्रह्म । साधकासी कोणे मार्गी क्षेम । वेदोक्त मद्भक्ती सुगम । उत्तमोत्तम हा मार्ग ॥'४३ ॥ आणिके मार्गी जाता जाण । कामलोभादि उठे विघ्न । कां बुडवी ज्ञानाभिमान । ये नागवण प्रत्यवायाची ॥ ४४ ॥ तैसे नाहीं भक्तिपंथीं। सवे नवविध सांगाती । चढता पाउली अतिविश्राती । भजनयुक्ति मद्भावे ॥ ४५ ॥ येथील मुख्यत्वे साधन । गेलियाही जीवप्राण । कदा न देखे दोपगुण । तें ब्रह्म परिपूर्ण पाविजे ॥४६॥ जेथ नाही भवभयभ्राती । जेथ नाही दिवसराती। जेथ नाही जीवशिवस्थिती। ते ब्रह्म पावती मद्भक्त ॥४७॥ जेथ नाही रूपनाम । जेथ नाही काळकर्म । जेथ नाहीं मरणजन्म । ते परब्रह्म पावती ॥ ४८ ॥ जेथ नाहीं ध्येयध्यान । जेथ नाही ज्ञेयज्ञान । जेथ नाही मीतूंपण । ते ब्रह्म पूर्ण पावती ॥ ४९ ॥ ज्यासी नाहीं मातापिता । जे नव्हे देवोदेवता । जे बहु ना एकुलता । तें ब्रह्म तत्त्वता पावती॥४५०॥ जेथ नाहीं वर्णाश्रम । जेथ नाही क्रियाकर्म । जेथ नाहीं मायाश्रम । तें परब्रह्म पावती ॥५१॥ जे गुणागुणी अतीत । जे लक्ष्यलक्षणारहित । जे स्वानदें सदोदित । तें ब्रह्म प्राप्त मद्भक्तां ।। ५२ ॥ पूर्णकृपेचा हेलावा । न सटेचि देवा । तो हा एकादशीचा विसावा । तुज म्या उद्धवा दीधला ॥ ५३ ॥ जेथ ठावो नाहीं देहभावा । जेथ समिरस्य जीवशिवां । तो हा एकादशीचा विसांवा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५४ ॥ जेथ उगाणा होय अहंभावा । शून्य पडे मायेच्या नावा । तो हा एकादशीच विसांवा । तुज म्या उद्धवा दीधला ॥५५॥ जेथ देवभक्तांचा कालोवों । एकत्र होय आघवा । तो हा एकादशीचा विसावा। तुज म्या उद्भवा दीधला ।। ५६ ॥ कष्टी स्वानंद स्वयें जोडावा । त्या स्वानंदाचा आइता ठेवा । तो हा एकादशी विसांवा । तुज म्या उद्धवा दीधला ॥ ५७ ॥ करोनि भेदाचा नागोवौं । होय अभेदाचा रिगावा । तो हा एकादशीचा विसांवा । तुज म्या उद्धवा दीधला ॥ ५८ ॥ काढोनि भावार्याचा भावो । सोलीव सोलियांचा सोलावो । गाळुनी गाळिवाचा भक्तिभावो । उद्धवासि देवो देतसे ॥ ५९ ॥ यापरी श्रीकृष्णनाथु । होऊनिया स्वानदभरितू । विसाव्या अध्यायींची मातूं । 'हरिखें सागतू उद्धवा ॥ ४६० ॥ आता विसाव्याचा विसावा । स्वानंदसुखाचा हेलावा । तो मी सागेन एकविसावा । ऐक उद्धया सादर ॥ ६१ ॥ वेदी शुद्धाशुद्धलक्षण । हे पुढिले अध्यायीं निरूपण । एका विनवी जनादैन । श्रोता अवधान मज द्यावे ॥ ४६२ ॥ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवदुद्धवसवादे एकाकारटीकाया वेदत्रयीविभागयोगो नाम विशतितमोऽध्यायः ॥ २०॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ अध्याय ॥ २०॥ ॥श्लोक ॥ ३७॥ ॥ ॥ ओंव्या ॥४६२॥ ॥एकूण ॥ ४९९॥ ॥ ॥ ,१कोण २ वेदोक्त म न केल्याचा जो दोप त्याची फसणक ३ नऊप्रकाराचे सोबती ४ एक ५भरत ६साठवत नाहीं ७ विसावा अध्याय, ( पक्षी ) विधाति ८ जीव आणि अश्वराचे ऐक्य ९ फेड, नागवण, नाश १० ऐक्य. ११ आआयासाने प्राप्त झालेला १२ नाश १३ प्रवेश १४ कथाभाग १५ हयान १६ अदालन