पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/482

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. पुरमामनजान सार्थान् भिक्षार्थ प्रविशश्चरेत् । पुण्यदेशसरिौलवनाश्रमवती महीम् ॥ २४ ॥ . . । पृथ्वी विचरणे विचित्र । पुण्यदेश कुरुक्षेत्र । सप्त पुन्या परम पवित्र । पुष्करादि थोर महातीर्थे ॥ १५० ॥ कृतमाला पयस्विनी । पुण्यरूप ताम्रपर्णी । गौतमी रेवा त्रिवेणी । परमपावनी गोमती ॥५१॥ कृष्णा वेण्या तुंगभद्रा । तपती पयोष्णी भिंवरां। यमुना भागीरथी नीरा । गंगासागरासगीं ॥ ५२ ।। ऋप्यमूक श्रीशैल व्यंकटाद्री । मूळपीठीचा सह्याद्री । गौतमीतीरीचा ब्रह्मगिरी । जो पापें सहारी यात्रामाने ॥ ५३॥ हो कां चढता हिमगिरी । पदी दुरितातें दूर करी । निःोप पापांतें निवारी । ते यात्रा मुनीश्वरी अवश्य कीजे ॥ ५४॥ दंडकारण्य वृहेद्वन । नमिपारण्य आनंदवन । इत्यादि वनाचे गमन । सन्याशी जाण करावे ॥ ५५ ॥ च्यवनकपिलव्यासाश्रम । गौतमवामनआश्रमोत्तम । यात्रा श्रेष्ठ बदरिकाश्रम । जो सकळ कर्मदाहकू ॥ ५६ ॥ ऐशी स्थळे जी पावन । तेथे सन्याशी करावे गमन । मार्गी मिक्षार्थ जे अटन । तेही निरूपण अवधारी ॥५७ ॥ होट हाटवटिया उत्तम । त्यातें पुर ह्मणती नरोत्तम । हाटहाटवटियाहीन तो ग्राम । भिक्षेचा नेम सारावा तेथे ॥ ५८ ॥ गायी गौळियांचे निवासस्थान । बजे त्यातें ह्मणणे जाण । सार्थ हणिजे पहा सपूर्ण । भिक्षार्थ अटन करावे तेथें ॥ ५९ ॥ पवित्र भिक्षेचे प्राप्तीकारणे । सन्यासी अवश्य जाणे । तेचि अर्थीचें निरूपणे । स्वयें श्रीकृष्णे सागिजे ॥ १६० ॥ वानप्रस्थाश्रमपदेवभीक्ष्ण भेक्ष्यमाचरेत् । ससिध्यत्याश्वसमोह सिद्धसत्व शिरान्धसा ॥ २५ ॥ शुद्ध व्हावया अंतर । वानप्रस्थाश्रमी जो नर । जाऊनि ठाकावे त्याचे द्वार । अतिसादर भिक्षार्थ ॥ ६१ ॥ सेविता सात्विकाचे अन्नासी । शुद्ध सत्वता साधकासी। तत्काळ होय ग्रासोनासी । शुद्ध अन्नासी हा महिमा ॥६२॥ यालागी वानप्रस्थाचे द्वार । ठाकोनि जावें वारवार । तेणे सत्वशुद्धि अनिवार । होय साचार साधकां ॥ ६३ ॥ शुद्ध भिक्षेचिये प्राप्ती । सत्वशुद्ध होय वृत्ती । तेणे वासना निःशेषनासती । निजशाती उल्हासे ॥ ६४ ॥ वासना नासल्या निलांग । तो सत्यत्वं न देखे जग । विषयासक्ति कैंची मग । सहज विराग उद्भट ।। ६५ ।। नैतद्वस्तुतया पश्येदृश्यमान विनश्यति । असक्तचिसो विरभेदिहामुत्र चिकीर्पितात् ॥ २६ ॥ येथ जे जे दिसे तें तें नासे । हे सर्वासी प्रत्यक्ष आभासे । परी अज्ञान भुलले कैसे । विषयवशे विगुंतोनी ॥६६॥ यालागी शुद्ध भिक्षेचिये प्राप्ती । ज्यासी शुद्धसत्व झाली वृत्ती । त्यासी विषय सत्यत्वें न दिसती । मा विषयासक्ती मग कैची ॥ ६७ ॥ ऐसे मिथ्या विषयाचे भान । त्याचे विषयासक्त नव्हे मन । यालागी भवस्वर्गसाधन । दोन्ही तो जाण स्पर्शना ॥६५॥ऐसा जो विपीं विरक्त। त्याचें परमार्थी लागले चित्त । तो १ "अयोध्या, मधुरा, माया, काशी, काची, अवन्तिका, । पुरी द्वारावती चैव सप्तता मोक्षदायका ॥" २ पुष्कर आदि तीर्थ ३ गोदावरी ४ नर्मदा ५ प्रयागराज ६ तापी ७ चद्रभागा ८ हिमालय पर्वत ९ माठ भरण्य १० काशीनजीकचें यन. ११ साऱ्या कर्माचा परिहार करणारा, श्रमदाहक १२ बाजार व रहदारीचे रस्ते १३ शाहाणे रोक १४ भिक्षा करावी १५ गौळवाडा १६ पाणपोइ १७ चित्त १८ अप्रतिवध १९ नि शेष २० संसाराची किंवा स्वर्गाची साधने