पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/458

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४८ एकनाथी भागवत. निरूपण । यांत मुख्यत्वें ब्राह्मणभजन । श्रेयस्कर सर्वांसी ॥ ७५ ॥ वैश्याचे प्रकृतीस जाण । स्वाभाविक पंचलक्षण । ऐक त्यांचे निरूपण । आचरण यथार्थ ॥ ७६ ।। ____ आस्तिक्य दाननिष्ठा च अदम्भो ब्रहासेवनम् । अतुष्टिरर्थोपचयैवैश्यप्रकृतयस्त्विमा ॥ १८ ॥ वैश्याचे प्रकृतीसी जाण । अर्थदृष्णा अतिगहन । जाहलिया कोट्यानुकोटी धन । तृष्णा परिपूर्ण हों नेणे ॥ ७७ ॥ आस्तिक्यता अर्थसचयासी । द्वीपीहूनि द्वीपांतरासी । नाना वस्तु ने विश्वासेसीं । साधावया अर्थासी भावार्थी ।। ७८ ॥ कां वेदशास्त्रीं अतिविश्वासी । हे मुख्यत्वे ऐश्वर्य वैश्यासी । नेदें "लिहिल्या स्वधर्मासी । नव्हे उदासी अणु मात्र ॥ ७९ ॥ वैश्याचे स्वधर्माचरण । नेमेसी चा नित्यदान । प्राणांत मांडल्या जाण । दानखंडण हों नेदी ॥१८० ॥ परलोकप्राप्तीचे कारण । ब्राह्मणाची सेवा जाण । ब्राह्मणआज्ञा परम प्रमाण । विशेष जाण गुरुसेवा ॥ ८१॥ वेदशास्त्रार्थं प्रमाण । सद्गुरु परब्रह्म जाण । तद्रूपं देखावे ब्राह्मण । सेवेसी प्राण अर्पावा ।। ८२ ॥ मी मान्य होईन अतिश्रेष्ठां । कां लौकिकी जोडावी प्रतिष्ठा । ऐशा परीची दांभिक निष्ठा । वैश्या वरिष्ठा स्पर्शेना ॥८३ ॥ सांडूनिया धूर्तपंण । निर्लोभ निर्दभ जाण । विनसेवेसी वोपिती, प्राण । हे मुख्य लक्षण वैश्याचें ॥८४॥ येणेचि परमार्थप्राप्ती । सत्य जाण वैश्ययाती । हे स्वाभाविक गा प्रकृती । जाण निश्चिती वैश्यासी ॥ ८५ ॥ आतां शदाचिया प्रकृती । त्रिविध कर्माची पै प्राप्ती । तेही सांगेन तुजप्रती । ऐक निश्चिती उद्धवा ।। ८६ ॥ शुश्रूपण द्विजगवा देवाना चाप्यमायया । तर लब्धेन सन्तोपं शबप्रकृतयस्चिमा ॥ १९॥ स्वकर्म शनाचिये ज्ञाती । द्विजसेवा यथानिगुती । त्याचेनि प्रसादें जीविकावृत्ती । निष्कपट स्थिति सेवेची ॥ ८७ ॥ करावे गृहस्थाचें गोरक्षण । चाराव्या जेये तृणजीवन । श्वापदभय आलिया जाण । वेचूनि प्राण रक्षाव्या ।। ८८ ॥ गोरक्षणी वेचिल्या प्राण । त्यासी उत्तम गति जाहली जाण । ज्यासी गायींचा कळवळा गहन । त्यासी मी श्रीकृष्ण सदा साह्य ।। ८९॥ द्विजसेवा गोरक्षण । दोनही वृत्ति न मिळता जाण । तरी देवालयीं समार्जन । जीविकार्थ जाण करावे ॥ १९० ॥ निष्कपटभावे आपण । निर्मळ करावे हरिरगण । तेथील प्राप्तीचेनि जाण । करावी पूर्ण जीविका ॥ ९१ ॥ तेथ जे जे काळी जे जे प्राप्ती । तेणे सुखें असावे निजवृत्ती । स्वधर्मकर्मस्थिती । शूद्रप्रकृतिस्वभावो ।। ९२ ॥ विपासी अग्निहोत्रादिक कर्म । शूद्र नमी द्विजोत्तम । तेथ दोहीचा स्वधर्म । सहजें सम होतसे ॥ ९३ ॥ गृहस्थाश्रमाचे वर्तन । तिन्ही आश्रमां आश्रयो आपण । अन्न वस्त्र देऊनि जाण । सरक्षण करावे ॥ ९४ ॥ ब्रह्मचर्याश्रमवर्तन । गुरुसेवा वेदाध्ययन । त्यासी द्यावया दान । अधिकार जाण असेना ॥ ९५ ॥ ब्रह्मचान्यासी जे जे योजिलें। ते पाहिजे गुरूसी समर्पिले । गुरूसी वचूनि दान दीधले । ते तेणे केले अधर्म ॥ १६ ॥ वानप्रस्थाश्रमी जाण । मुख्यत्वे तप प्रधान । करावे अनिशुश्रूपण । वेदोक्तलक्षणप्रकारें ॥ ९७ ॥ सन्यासी ब्रह्मचारी दीन । समयीं आश्रमा आल्या जाण । यथानुशत्या द्यावे अन्न । १ पल्याणकारक • द्रव्यरोग ३ अनेक कोटी ४ आस्तिफ्य ५ विहित्या ६ वेदविहित धर्माविषयी उदासीन भरा ७ पापट्य ८ उदरनिर्वाहाचे साधन ९ घास व उदक १० हिंन पराचे भय ११ केर काहा सडा घालणे १२ परितार्यासाठी १३ अगण जागा झणजे सभा १४ मिळाले. १५ फसवून १६ अरण्यात राहून तप करणे। १७ मामीची सेवा