पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/427

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पधरावा. लाजोनि उठाउठी विरताती ॥३॥ उद्धया ऐक पां निश्चिती । नव्हतां परमानंदमाप्ती । कदा नव्हे कामनिवृत्ती । नाना युक्ती करिताही ॥४॥ या अष्ट महासिद्धीच्या धारणा। तुज म्यां सांगीतल्या जाणा । यासी साधावया आर्गवणा । सुरनरगणा पे नाही ॥ ५ ॥ यापरी अष्ट महासिद्धी । तुज म्या सांगीतली धारणविधी | आता गुणहेतुकाचे प्रबोधी। साबधबुद्धी अवधारीं ॥६॥ श्वेतद्वीपपती चित्त शुद्धधर्ममये मयि । धारयन् ततां याति पद्धमिरहितो नर ॥१८॥ सांडूनि कार्यसी रजतमें दूरी । जो मी सत्याधिष्ठांता श्रीहरी । त्या माझी जो धारणा धरी । अखंडाकारी सर्वदा ॥७॥ तो माझेनि सत्वे सत्वततू । होय पडूीसी रहित । शोक मोह जरा मृत्यू । क्षुधा तृपा हातू लावू न शके ॥ ८॥ मय्याकाशारमनि माणे मनसा धोपमुदहन् । तमोपलब्धा भूताना इसो वाच शृणोत्यसौ ॥ १९ ॥ सघोप भाणेसी शब्दमहिमा । अवश्य विश्रातीस ये व्योमा । त्या आकाशाचाही मी आत्मा । मजमाजी व्योमा रहिवासू ॥९॥ तो मी सघोप प्राणाचाही प्राण । सकळ पाचाची पाचा जाण । वागीश्वरीचे जीवन । सत्य मी जाण उद्धवा ।। ११० ॥ ऐसिया माझें दृढ ध्यान । निजहदयीं जो करी जाण । तो विचित्रों वाचाचे श्रवण । जीवस्वरूपें जाण खये ऐके ॥ ११ ॥ सनाद माझी धारणा पोटीं । धरिता जगाच्या गुह्य गोष्टी । त्याचे पडती कर्णपुटीं । ते काळी उठी दूरश्रवणसिद्धी ।। १२ ।। घनस्यार सयोग्य स्वष्टारमपि चापि । मां सत्र मनसा ध्यायन विश्व पश्यति सूक्ष्मरः ॥ २० ॥ सविर्ता तो मी नारायण । ऐसे डोळ्यांमाजी करी ध्यान । तेव्हां डोळाचि मद्रूप जाण। सविता आपण स्वयें होय ॥१३॥ एवं डोळा सविता हे माझे ध्यान । तिहींस एकात्मता झाल्या जाण । तेव्हां सूक्ष्मद्रष्टा होय आपण । जग सपूर्ण तो देखे ॥१४॥ वैसलेचि ठायीं जाण । चतुर्दशभुवनाचे दर्शन । एके काळे देखे आपण । दूरदर्शन हे सिद्धी ।। १५ ।। मनो मयि सुसयोग्य देह तदनु वायुना । मद्धारणानुभावेन तमारमा पर बै मन ॥२१॥ अत्यंत सवेग ते मन । त्या मनाचेही मी मन जाण । त्या मनासी मजसी अभिन्न । माणधारणयुक्त राखे॥१६॥ऐसे प्राणधारणयुक्त मन । मजसी रासता अभिन्न । त्या धारणामभावे जाण । मनोवेगें गमन देहासी होय ॥ १७॥जे सकल्प जाय मन। तेथें होय देहाचेही गमन । हे मनोजवसिद्धी जाण । धारणालक्षण या हेतू ॥ १८ ॥ पदा मन उपादाय ययप सुभूपति । तत्चद्भवे मनोरूप मद्योगपल्माश्रय ॥ २२ ॥ पहिली मनोजवधारणा । त्याहीवरी माझी भावना । अचित्य सामर्थ्य माझें जाणा । अनुसंधाना जो आणी ॥ १९ ॥ मी नाना रूपातें धरिता । सवेचि रूपातरें विसर्जिता। ऐशी माझी सपूर्ण सत्ता । ते त्याच्या हाता 4 लाभे ॥ १२० ॥ एव माझिया दृढ धारणा। माझे सामर्थ्य ये त्याच्या मना । मग ज्या रूपाची करी भावना । तद्रूप जाणा स्वयें होय ॥२१॥ सुरनरपन्नगामाजी जेजे रूप । धरावया करी जो सकल्पै । तो तत्काळ गा मद्रपा हे कामरूप सिद्धी माझी ॥ २२ ॥ १ सामर्थ १ सत्वगुणाचा अभिमानी ३ आकाशारा ४ सरखतीच ५ माकाशात ऐकू येणान्या दूरदूरच्या वाणीला श्रवण करितो ६ प्रकाशक सूर्य ७ नेनद्रिय व सूर्य यांच्या सयोगात नारायणाचे ध्यान करणे ८ बपदा लोकांचे मन जाईल तिकडे मनोवेगाप्रमाणे त्वरित पोचणे १० ध्यानात ११ टाकणारा १२ इच्छा ए भा.५५