Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/413

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चवदावा ४०१ माझी भक्ती । कैची होय विषयविरक्ती । विरक्तीचीण माझी प्राप्ती । नव्हे निश्चिती उद्धवा ॥ १४ ॥ माझी शुद्धभक्ती तत्त्वतां । साचार आली जयाचे हाता । ऐक त्याच्या चिह्नाची कथा । आणि पवित्रता तयाची ॥१५॥ माझे भक्तीसी जो लागला । तो तत्काळ पवित्र झाला । त्याणे त्रिलोक पुनीत केला । हे गानि बोलिला श्रीकृष्णू ॥ १६ ॥ वागद्गदा द्रवते यस्य चित्त रदत्यभीक्ष्ण हसति चिध । विरज उद्गायति नृत्यते च मगतियुक्तो भुवन पुनाति ॥ २४ ॥ __ अगी रोमांच रवरवित । स्वेदविद् डळमळित । चित्त चैतन्य द्रक्त । तेणे सद्गदित पंवाचा ॥१७॥हर्ष वोसता पोटीं । अर्धोन्मीलिते होय दृष्टी । जीवशिया पडली मिठी। ध्यानत्रिपुटी मावळली ॥ १८॥ नयनी अधूचा पूर लोटी । उभं न सटेचि पोटी । होत जीवभावाची तुटी । पडे सृष्टी मूच्छित ॥ १९ ॥ आक्रंदे थोर आक्रोगे । वारवार रडता दिसे । रडण्यामाजी गदगदा हांसे । जेवी लागले पिसे ब्रह्मग्रहो ॥ ३२० ॥ रडणे हांसणे न साडी । त्याहीमाजी नवल आवडी । अर्थाववोधे गाणे माडी । निजात्मगोडीचेनि योगें ॥ २१ ॥ विसरोनि माझे तुझें । सांडोनियां लोकलाजे । हरियै प्रेमाचेनि 'भोजे । तेणे नाचिजे निशंक ॥ २२॥ गाणे नाचणे हासणे।तो रडे कासयाकारणे ऐक तीही लक्षणे । तुजकारणे सागेन ॥ २३ ॥ माउलीवेगळा बालक पडे । जननी पाहता कोठे नातुडे । भेटता ओरडूनि रडे । मिठी पडे सप्रेम ॥ २४ ॥ जीव परमात्मा दोनी । चुकामुकी झाली भ्रमपहनी । त्यासी एकाएकी होता मिळणी ।रडे दीर्घस्वरें स्फुदत ॥२५॥ बहुकाळे झाली भेटी ऐक्यभाचे पडली मिठी। तेणें भंडन सटे पोटी। रुदन उठी सप्रेम ॥६॥ देवो लाघवी नानापरी । मायावी नातुडे निर्धारीं । तो सापडला घरींच्या घरी । तेणे विस्मय करी टवकारें ॥२७॥ देव सदा जवळीच असे । त्यालागी जन कैसे पिसे पाहों जाती देशोदेशे । तें देखोनि हासे गदगदा ॥ २८ ॥ देव सर्वासी अजितू । तो म्या जिकिला भगवंतू। धरोनि राखिला हृदयांतू । यालागी गातनाचतू उहासे ।।२९॥ निवदृति दुजयाची मातू । अगं जीतिला भगवतू । जगी झाला यशवंतू । यालागीं गातनाचतू उल्हासे ॥३३०॥ पाहता दुसरे न दिसे मज । यालागी धरू विसरला लाज । जगी झाला तो निर्लज । निलेजतेची वोज हे त्याची ॥३१॥ यापरी भक्तियुक्त । होऊनिया माझे भक्त । निजानंदें गात नाचत । तेणे केले पुनीत लोकत्रये ॥ ३२ ॥ जयाचे देखता चरण । जडजीवा उद्धरणा । ज्याचे लागतां चरणरेण । पशु पापाण उद्धरती ॥ २३॥ कीर्तनाचेनि महाघोके । नाशिली जगाची सर्व दुखें। अवघे विश्वचि हरिखें । भरिले महासुखें उचंबळत ॥ ३८ ॥ दर्शने स्पर्शने पचने । एक तारिले कीर्तने । एक तारिले नामस्मरणे । यापरी जग उद्धरण उद्धवा ॥ ३५ ॥ अविद्यायुक्त जीव मलिन । त्यासी शुद्ध व्हावया जाण । माझी भक्तीचि प्रमाण । हेंचि श्रीकृष्ण स्वये सागे ।। ३६ ।।। ११ घामाचे अब ४ अखत बादपणा नाहीसा झापा कविरमा १० दयामा १ कृतार्थ २ ताठ उभे राहिलेले ३ घामाचे थव ४ गलत बाटता ५ अधी उपरी होणे ( शानदातिशयामुळे ६ ध्येय, ध्याता, ध्यान, ही निपुटी गहिवर पोटा माईना जीवपणा नाहीसा झाल, जीवशिवाची महाराग १० आवडीन ११ सापटत नाही १२ आविरूप नगरात १३ नेट १४ नाटकी, कोनुरु करणारा १५ एदयामध्येन, १६ खुळे, वेडे. १५ नाहीशी करुन १८ शुद्धता, चागुपणा १९ लोय .. पायाची धूळ ११ महापोवा, ए मा ५१