पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/370

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५८ एकनाथी भागवत. करितां प्रेतभूतआराधन । प्रेतजन्म जाण तामसा ॥ २४ ॥ जेथ तमोगुण प्रधान । तो क्रोधयुक्त पुरुप जाण । सदा शत्रूचें करी ध्यान । करावया हनन उद्यतू ॥ २५ ॥ तामसी मंत्र मुकी मैली । अथवा उच्छिष्टचाडाळी । कां प्रेतदेवता कंकाळी । मंत्रशैली हे तेथे ॥ २६ ॥ संस्कार दगड माती । माझे घर हे माझी क्षिती । स्वप्नी निजेला घाली भिंती। एवढी आसक्ती गृहाची ॥ २७ ॥ घर करावया अशक्त । तरी ते खिंडेरों अतिस्मरत । सदा दगडमाती राखत । नांदते तेथ येवों नेदी ।। २८ ॥ देहालागीं गेह करणे घडे । तेही देह कष्टवी अतिदुर्याडें । तामससंस्कारें रोकडें । केवळ बेडे गृहासक्ती॥ २९ ॥ गृहासक्तीचा व्यापारू । जो मरणात न सोडी नरू। तो जाण तामस सस्कारू । त्याचा ससारू तो माती ॥ १३०॥ जेणे थोरावे तमोगुण । तें हैं जाण दशलक्षण । ऐक राजसाचे चिह्न । त्याचें भिन्न स्वरूप ॥३१॥ करावे सत्वाच्या अंगीकारा । त्यागावा तमोगुण दुसरा । पुढे चाविरा मागे लातिरा । ऐक तिसरा रजोगुण ॥ ३२ ॥ हो का शाहाणी सिंदळी जे नारी । ते पुरुषाचे मन बरें धरी । मग ठकोनि जाय व्यभिचारी । तैसी परी रजोगुणा ॥ ३३ ॥ जैसे का कुचर घोडें । वरें दिसे परी आडवी अडे । कांही केल्या न चले पुढे । मागिलीकडे सरों लागे ॥ ३४ ॥ तैसी रजोगुणाची स्थिती । त्यागू न सभवे कल्पातीं। धर्म करितो केवळ स्फीती । मनी आसक्ती कामाची ॥ ३५ ॥ सर्वस्व घ्यावया सवैचोरू । सर्वे धांवे होऊनि नफेरू । तैसा रजोगुणाचा विचारू । कामनाससारू वाढवी ॥ ३६॥ धर्म करी कामासक्ती । केलें भोगवी निश्चिती । पाडी जन्ममरणावर्ती । कदा कल्पांती सुटेना ॥ ३७॥ सात्विक तरले माझेनि भजने । तामस तरले मद्विरोधध्याने । राजसाचें जन्ममरणधरणे । रजोगुणे उठीना ॥ ३८॥ जेणे प्रवल वाढ रजोगुणा । त्या सांगेन मी दशलक्षणा । केवळ त्यागावया काम्यकल्पना ! या निरूपणा अवधारी ॥३९॥राजसाचें प्रवृत्तिशास्त्र । जे केवळ कामनापर । जेणे होय इहामुत्र । तेथे अत्यादर राजसा ॥१४०॥ आप हाणिजे ते तंव जळ । वेळी वाळा सुपरिमळ । कर्पूरयुक्त अतिशीतळ । प्रिय प्रवळ तें राजसा ॥४१॥ प्रजासगति त्याची ऐका राजवर्गी सभानायक । व्यवहारी चतुर अतिरंजैक । प्रवृत्ति लोकप्रिय त्यासी ॥४२॥ राजद्वारी कां सभेमाझारी । वैसावे पारी अथवा वेव्हारीं । का महपतोरणाभीतरी । सन्माने करी उपविष्ट ॥४३॥ वेळु न गमे जै घरिच्याघरीं । ते कमी चौहोटा नगरी । कां बैसे बुद्धिबळांवरी । अत्यादरीं सादर ॥ ४४ ॥ ऐक रजोगुणाची वेळ । सूर्योदयाउपरि जो काळ । कां राजस जे सांजवेळ । ते ते काळ प्रिय त्यांसी ॥ ४५ ॥राजसाचें सकाम कर्म । धनधान्यार्थ करिती धर्म । वासना ते पशुपुत्र. काम । स्वमी निष्काम नेणती ॥ ४६॥ राजसांसी काम गहन । कामासक्ती दीक्षाग्रहण । तेचि त्यांचे जन्म जाण । सदा ध्यान स्त्रियेचें ॥४७॥ मंत्र घ्यावा अभिलाखें । जेणे सन्मान होय लौकिकें । ज्याचा सुगरावा थोर देखे । तो मंत्र आवश्यकें आदरी ॥४८॥ संस्कार अतिराजस शरीरभोगाचे विलास । नाना परिमळ बहुवस । उत्तमोस सुंधूत ॥४९॥ १ही तामस टेवताची नावे आहेत - गावापाहेर राहण्याची पिंडारे ३ नष्टचन ४ प्रबळ होतो ५ हसणारा ६ लाया मारणारा ७ फसवून ८ अगरा ९ माडवाटेत, मार्गात १० दम, डील, रीतीची लालसा, यांकरिता ११ सोचतीचा घार १२ पाकर, सेवक १३ भोपऱ्यात १४ हा रोकप खरोक १५ वेलनी,वेलदोडा १६ वामनागक मुगधी वनसती १५ लोवाच रंजन करणारा. १८परीकमत नसेल तर. १९ चव्हाण्यावर.१०मत्रोपदेश घेणे, २१ लोकवधीकरण. २२खच्छ धुवट वक्ष.