________________
३५२ एकनाथी भागवत. ज्ञानअज्ञानांचा सत्ववांटा । फेडूनि कांटेन कांटा । दोनी आम्हांटा सांडावे ॥१२॥ जरी सांडिले वाटेवरी । तरी अवचटें आपणासीचि धाधु करी । यालागी सांडावे दूरी। निजनिर्धारी हा त्यागू ॥ १३ ॥ जेथवरी अहंपण । तेथेवरी वद्धकता जाण । शुद्धाशुद्ध अभिमान । निःशेष सज्ञान सांडिती ॥ १४ ॥ उद्ध्वा तुजकरितां माझी भक्ती । झाली माझ्या निजपदाची प्राप्ती । आतां नाना साधनउपपत्ती । शास्त्रव्युत्पत्ती कां करिसी ॥१५॥ सद्भावे करितां माझें भजन । तूं झालासी ब्रह्मसंपन्न । आता संद्विद्यादि सर्व साधन । शास्त्रश्रवणेसी साडी पां ॥१६॥ तस्मादुद्धव उत्सृज्य'। ये श्लोकींचे हे त्यागवीज । विशद सागीतले म्या तुज । निजगुज हृदयस्थ ॥ १७ ॥ सकळा साधना श्रेष्ठ साधन । शिष्यासी सद्गुरूचे भजन । तेणे पाविजे ब्रह्मसमाधान । सत्य जाण उद्धवा ॥ १८ ॥ जो भावे भजे गुरुचरणीं । तो नादे सच्चिदानंदभुवनी । हे सत्य सत्य माझी वाणी । विकल्प कोणी न धरावा ॥ १९॥ ऐसे वोलोनि श्रीहरी । आवडी चारी बाह्या पसरी । उद्धवातें प्रीतिकरी । हृदयीं धरी स्वानंदें ॥ ६२० ॥ देवे मद्भक्ता क्षेम दीधले । निजहृदयीं हृदय, एक झाले। सांगणे पुसणे सहज ठेले । बोलणे बोले माशिले ॥ २१ ॥ चहू वाचां पडले मौन । जीवू विसरला जीवपण । एका तुष्टला जनार्दन । स्वानंदघन सद्भक्ता ॥ २२॥ तेचि सद्भक्तीचा भावार्थ । विशद बोलिला बाराव्यांत । निजभावे श्रीकृष्णनाय । नित्य प्राप्त भाविकां ॥२३॥ निजात्मप्राप्तीचे कारण । केवळ भावार्थचि जाण । भावार्थावेगळे साधन । वृथा जाण परिश्रमू ॥ २४ ॥ जप तप यज्ञ दाने । भावार्थालागी करणें । तो भावार्थ लाहिजे जेणे । धन्य जिणे तयाचें ॥ २५ ॥ धन्य नरदेहाची प्राप्ती । धन्य साधूची सगती । धन्य धन्य ते भावार्थी । जे भगवद्भक्ती रगले ॥ २६ ॥ जे रंगले भगवत्पथा । त्याचें चित्त विसरले विपयावस्था । ते हंसगीताची कथा । उद्धव कृष्णनाया पुसेल || २७ ।। ते अतिरसाळ निरूपण । केवळ शुद्ध ब्रह्मज्ञान । श्रोतां व्हावें सावधान । एका जनार्दन विनवितू ॥६२८॥ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंदे श्रीकृष्णोद्धवसवादे एकाकारटीकायां द्वादशोऽध्यायः॥ १२ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ मूळश्लोक ॥ २४ ॥ ओव्या ॥६२८ ॥ अध्याय तेरावा. ॥श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ॐ नमो जी अनादि हंसा । हंसरूपा जी जगदीशा । तूं सद्गुरु परमहंसा । परमपरेशा परिपूर्णा ॥१॥ उभयपक्षेवीण देख । तुझे शोभती दोनी पाख । शुद्ध सत्वाहोनि चोखे । स्वरूप सुरेख सोज्वळ ॥२॥ हंस बोलिजे शुभ्रवर्ण । १ याचा अर्थ असा दिसतो अज्ञानामुळे प्रपच मोठा झाला आहे, त्याचे सडण ज्ञानानेच होते ज्ञानही सत्वगुणाच्या वृद्धीमुळे अज्ञानाच्याच वाट्याला येतें चतुत दोन्हीही वाधक्च आहेत पण काट्यान काटा फाइन दोन्ही काटे दूर फेकून द्यावेत, त्याप्रमाणे ज्ञानाने अज्ञानाचे खडण करावे व शेवटी प्रतिबंधक असल्यामुळे ज्ञान व अज्ञान दोन्हीही काव्यासारखी दूर पंचून द्यावीत व खखरूपी समरस होऊन रहा २ काढून ३ आडवाटेला ४ तितुकेही बाधक ५'मा दह आह' हा अशुद्ध अभिमान ब 'मी ब्रह्म आह' हा शुद्ध अभिमान, हे दोन्हीही चापक आहेत ६ निगुणात्मक ७ चार बाह, भुज ८ चपला ९ उघड १० भक्तीच्या प्राप्तीसाठी ११ पक्ष, पख विद्या आवद्या, ज्ञान अज्ञान, प्रकृति पुरुप, इत्यादि द्वैत तुझे ठिकाणी नाही दोन्ही रूपानी तूच नादत आहेस "अद्वतमात्मनस्तत्त्व दशेयन्ती मिथस्वराम् ॥" अमृतानुभव लोक ४ १२ चागले अविवेचे ठिकाणी निगुण, विद्येचे ठिकाणी शुद्ध सखगुण, सापटीको तू भत्सत प्रकाशमान निर्गुण आहेस