________________
एकनाथी भागवत - येन योगेन साइयेन दानमततपोवर । व्यारयास्वाध्यायसन्यास प्रामुयायशयानपि ॥ ९॥ - ' योग याग व्रत दान । वेदाध्ययन व्याख्यान । तप तीर्थ ज्ञान ध्यान । संन्यासग्रहण सादरे ॥ १९ ॥ इत्यादि नाना साधने । निष्ठा करितां निबंधनें । माझी प्राप्ति दुरासतेने । जीवेप्राणे न पविजे ॥ १२० ।। यापरी शिणतां साधनेसी । माझी प्राप्ति नव्हे अतिप्रयासी । ते गोपी पावल्या अप्रयासीं । सत्सगासी लाहोनी ॥२१॥ त्या गोपिकांसी माझी प्रीती । मीचि त्यांची सत्सगती । सत्संगें निजपदप्राप्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥ २२ ॥ गोपिकांची सप्रेम स्थिती । ते तुज गोकुळी झाली प्रतीती । तुजही न तर्केचे त्यांची प्रीती । ते मी तुजप्रती सांगेन ॥ २३ ॥ गोपिकाचे अत्यंत प्रेम । स्वमुखें सागे पुरुपोत्तम । उद्धयाचे भाग्य उत्तम । आवडीचे वर्म देवो सांगे ॥२४॥ रामेण साधं मधुरा प्रणीते श्वाफरिकना मय्यनुरक्तचित्ता । निगाढमावेन न मे वियोगतीयाधयोऽन्य ददृशु सुसाय ॥ १० ॥ वळिभद्रासमवेत तत्त्वतां । अक्रूरें मज मथुरे नेतां । तै गोपिकांसी जे झाली व्यथा । ते सांगतां मज नये ॥ २५ ।। ते त्यांची अवस्था सागतां । मज अद्यापि धीर न धरवे चित्ता । ऐसे देवो सांगतसागतां । कंठी वाप्पता दाटली ॥२६॥ सांगता भक्ताचें निजप्रेम । प्रेमें द्रवला पुरुषोत्तम । जो भक्तकामकल्पद्रुम । कृपा निरुपम भकाची ॥ २७ ॥ मज मथुरे जाता देखोनी । आँसुवाचा पूर नयनीं । हृदय फुटे मजलागुनी । प्रेमें लोळणी घालिती ॥ २८ ॥ पोटातील परम प्रीती । सारिता मागें न सरती । धरिले चरण न सोडिती । येती काकुलती मजलागीं ॥ २९ ॥ नवल भावार्थ त्याच्या पोटी । माझ्या रूपी घातली मिठी । सोडवितां न सुटे गाठी । श्वास पोटी परतेना ॥ १३० ॥ लाज विसरल्या सर्वथा । सासुरा पतिपित्या देखता । माझे चरणी ठेवूनि माथा । रडती दीर्घता आनंदें ॥ ३१ ॥ मजवीण अवघे देखती वोस । माझीच पुनःपुन्हा पाहती वास । थोर घालोनि श्वासोच्छ्वास । उकसावुकीं स्फुदत ॥ ३२॥ आमुचा जिवलग सांगाती । घेऊनि जातो हा दुष्टमूर्ती । अक्रूरा समुख र ह्मणती । येती काकुळती मजलागीं ॥ ३३ ॥ उभ्या ठोकोनि समुख । माझे पाहती 'श्रीमुख । आठवे वियोगाचे दुःख । तेणे अधोमुख विलपती ॥ ३४ ॥ ऐशिया मजलागीं आसक्त । माझ्या ठायी अनन्यचित्त । विसरल्या देह समस्त । अतिअनुरक्त मजलागीं ॥ ३५॥ माझेनि वियोगें तत्त्वता । त्यांसी माझी तीन व्यथा । ते व्ययेची अवस्था । वोली सागता मज नये ॥ ३६॥ मजवेगळे जे जे सुख । ते गोपिकांसी केवळ दुःख । केशी आवडी अलोलिक । मज हृदयीं देख न विसर्वती ॥ ३७॥ मज गोकुळी असतां । माझे ठायीं आसक्तचित्ता । ते आसक्ती समूळ कथा । ऐक आतां सागेन ।। ३८॥ १लाभून २ गोपिकाची प्रीति रिती होती याची रत्पना तुला कारितांच ली। नाहीं ३ गला दादन आला ४ भक्ताच्या कामना पुरविणारा रपवृक्ष ५ अश्रूचा ६ दूर ढकलल्या तरीसुद्धा ७ काय साचा विलक्षण भाव त्यानी माझे रूपारा इतव दृढ आलिंगन दिले की ती गाठ मुना, व त्या देहभानावर येईनात. त्याचा प्राण धमकात माझेशी युक . झाला, तो कुमक सोडून साली येईना ८ शून्य ९ बाट १० स्फुदन स्फुदन ११ शिव्या देती १२ राहन १३ मुखकमळ १६ मामा खाली घालून शोक करितात १५ स्थिती १६विसरत नाहीत