पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/342

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२८ एकनाथी भागवत. त्या वळीचा पुत्र वाणासुर । शिववर मातला थोर । माझे पुत्राचा चोरिला पुत्र । दोहींचा हेरे नारदू ।। ७८ ॥ तो म्यां साधूनि धरिला चोरू। वाणी केला अतिजर्जरू । छेदिला सहस्र भुजांचा भारू । शिव जीवें मारू नेदीच ॥ ७९ ॥ तो ह्मणे भक्तपुत्र तूं झणी मारी। मजही वळीची मीड भारी । अखंड मी असे त्याच्या द्वारीं । यालागी उद्धरी वाणातें ॥८०॥ मग सबोखाँवया शिवातें । वाण आपुले निजहस्तें । ऐक्य शिवपदी स्थापिले त्यातें । कल्याणातें पावला ॥ ८१ ॥ खांडववन अग्नीसी । अर्जुने दीधलें खावयासी । तेथे जळता मयासुरासी । म्यांचि तयासी उद्धरिले ॥ ८२ ॥ राक्षसकुळी जन्मला जाण । गनूचा वधु विभीपण माझ्या ठायीं अनन्यशरण । जीवप्राण तो माझा ॥ ८३ ।। सुग्रीव हनुमंत जांचवंतू । यांचा पेवाडा विख्यात । जटायु उद्धरिला वनातू । जो रावणे खस्तु केला होता ॥८४|| गंज सरोवरी ग्रहगरत । स्त्रियापुत्रीं सांडिला जीत । तो अंतकाळी मातें स्मरत । आर्तभूत अतिस्तवनें ।। ८५ ॥ सांडूनि समस्तांची आस । पाहोनि चैकुंठाची वास । राजीव उचलूनि राजस । पाव परेश हाणे वेगीं ॥८६॥ त्या गजेंद्राचे तांतडी । वैकुंठौंहूनि लवडसवडी । म्या गरुडापुढे घालोनि उडी । बंधन तोडी गजाचें ॥ ८७ ।। त्यासी पशुयोनी जन्म होते । परी तो अती स्मरला माते । पावला माझ्या निजधामाते । गाइजे त्यातें पुराणी ॥ ८८ ॥ वैश्य तुळाधार वाणी । सत्य वाचा सत्य जोखणी । सत्यें पावला मजलागुनी । सत्यतोलणी त्याचे नाव ॥ ८९ ॥ अत्यजांमाजी धर्मव्याध । माझें पावला निजपद । जरीव्याध गा प्रसिद्ध । करोनि अपराध उद्धरिला ॥९०॥ चरणीं विंधोनिया वाण । घायें घेतला माझा प्राण । तो परीक्षिति जराव्याध जाण । कृपणे आपण तारिला ॥९१ ।। कौलिकामाजी गुहक देख । आला श्रीरामासमुख । कर्म निरसलें निःशेख । निजधाम देख पावला ॥ ९२ ॥ कुब्जा'ती ठायीं वांकुडी । नीट निजभावे चोखडी । तिच्या चदनाची शुद्ध गोडी । अतिआवडी मजलागीं ॥ ९३ ॥ तिणे चर्चेनिया चंदन । मन केले मदर्पण । मी झालों तिजआधीन । निजधाम ते जाण पावली ॥ १४ ॥ गोकुळीचिया गोपिका । ससारासी होऊनि विमुखा । तनमनमाणे मजलागी देखा । भाळोनि निजसुखा पावल्या ॥ ९५ ॥ माझी गोपिकासी परम आवडी । की मजचि गोपिकाची गोडी । पाहता याचे समान पोडी । जाहली वापुडी साधनें ॥ ९६ ॥ १ शकराच्या वराने . यातमीदार ३ मारू नकोस, स्वयें मारी ४ समजावण्यासाठी ५पराक्रम ६ छिनमिन ७ मगराने ग्रासलेला गजेंद्र ८ जिवत असतानाच ९ सक्टानी गाजन जाऊन १० कमल ११ लगबगीने १२ एक धर्मात्मा वैश्य भारत शातिपात याची कथा आहे जाजलि नावाच्या मुनीला तपाचा गर्व होता, त्याचा याच्याशी संवाद होऊन तो नष्ट झाटा १३ भारत-बनपर्वोत याची गोष्ट आहे हा व्याध मिथिला नगरीत राहात होता एकदा एक तपधयोंयान वाहाण वृक्षासाली अध्ययन करीत होता तो एक बलाकी ( वगळी) याचे अगावर शिटली प्राह्मणान वर पाहिल तो ती दग्ध झाली, यामुळे ब्राह्मणास गये झाला पुन्हा मधुकरी मागत एका पतिमतेच्या घरी गेला तय भिक्षेस विलय लागला ह्मणून त्याने तिजक्टेही क्रोधाने पाहिले, पण ती सती दग्ध झाली नाही | बाह्मण आश्वयेचकित झाला, तेव्हा ती सास दाणाली, 'मी पतिव्रता असल्यामुळे अमिसम तेजसी आह तुझें तेज मला जाकू शकले नाही तू मिथिलेस धर्मव्याधाकडे जा तो मजपेक्षा मानी आहे तो तुझा सशयच्छेद करील 'धर्मव्याधाने त्या माझणास बहुसाल नीती सागितली १४ हा जराव्याध क्षनिय असून दुराचारामुळे व्याध झाला त्याचाच वाण श्रीकृष्णास लागला व कृष्णाचे निधन साल, क्षा गपेने दिव्यलोकात गेला १५ कृष्णाचा १६ कोळ्यामध्ये १७ तीन ठिकाणी वाकडी ही कृष्णप्रमादा। सरळ झाली (भागवत १०-४२) १८ भुलन १९ योग्यतेने, थोरवीन