Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/338

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२४ एकनाथी भागवत नाम रूप जाति गोत । या अवघ्यांसी मी अलिप्त । सकळ कुळेंसी मी कुळवंत । गोत समस्त जग माझें ॥ ७५ ॥ ऐसे जाणोनि निजगुह्यसार । तुज मी सांगेन साचार । तेणे होईल जगाचा उद्धार । ऐसे शाईधर बोलिला ॥७६ ॥ तें ऐकावया गुह्य ज्ञान । उद्धवें मनाचे उघडिले कान । सावध पाहतां हरीचे बदन । नयनी नयन विगुंतले ॥ ७७॥ यापरी उद्धव सावधान । त्यासी कृष्ण सांगेल गुह्य ज्ञान । पुढिले अध्यायीं अतिगहन । रसाळ निरूपण हरीचें ॥७८ ॥ एका विनवी जनार्दन । सती मज द्यावें अवधान । श्रोती व्हावे सावधान ! मस्तकी चरण बंदिले ॥ ७९ ॥ तुमचेनि पदप्रसादें । श्रीभागवतींची श्लोकपदें । वाखाणीन अर्थावबोधे । संत स्वानंदें तुष्टलिया ॥ १५८० ॥ यालागी एका शरण जनार्दनी । तंव जनार्दनचि एकपणी । जेवीं का सागरींचे पाणी । तरंगपणीं विराजे ॥ १५८१ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां श्रीकृष्णोद्धवसंवादे एकादशपूजाविधानयोगो नाम एकादशोऽध्यायः॥११॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ - - - - - अध्याय बारावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ॐ नमो सद्गुरु वसतू । ऐक्यकाळी तुझा ऋतू । तया ऋतुकाळींचा मारुतू । ज्ञानवनांत जै रिघे॥१॥ ते अविद्येची जुनी पाने गळूनि जाती तत्क्षणे । नव पल्लवीं विराजमाने । विरक्तपणें अनुरक्त ॥२॥ अत्यंत वैराग्याची हाव । खांकर झाले वृक्ष सर्व । त्यासी निघाले नव पल्लव । अतिलवलव कॉवळिक ॥३॥ जाहल्या वसंताचें रिगवणें । वृक्ष आडवे फुटले तेणे । सोहंभावाची सुमने । तेणें गुणें विकासलीं ॥ ४ ॥ कृष्णसारूप्ये कृष्णभ्रमर । तेथें झेपावले अतिसत्वर । आमोद सेविती अंरुवार । कैसेनि केसर कुंचवे ॥ ५॥ सदावाच्या आमोदधारा । सेवितां सुख झाले भ्रमरा । हृदयकमळी केला थारा । मध्यमद्वारा चालिले ॥ ६ ॥ भेदोनियां सोही कमळे । द्विदळादि पोडशदलें । झेपावले मळयानिळे । सहस्रदळी मिसळले ॥ ७ ॥ तेथ सेवूनि पराग धवळ । उन्मत्त मातले अलिकुळ । करिती आनंदाचा गोंधळ । सुखकल्लोळ स्वान ॥ ८॥ लागला अनुहताचा ध्वनी । रुणझुणती दशलक्षणीं । त्याही नादातें प्राशुनी । निशब्दपणी निवात ॥९॥ तेथे मोक्षसुखाचे घड । डोलतां दिसे अतिगोड । तेणे जीवाचे पुरत कोड । करिती धुमाँड सोहंशन्दें ॥ १० ॥ मुमुक्षुमयूर अतिप्रीती । पिच्छे पसरूनि नाचती । येऊन वसतवनाप्रती। टाहो फोडिती गुरुनामें ॥११॥ नेमस्त कोकिळा होते मौन । वसतऋतुराज देखोन । तिहीं करोनि विसर्जन । मधुरस्तवने गर्जती ॥ १२ ॥ १ एक झाले, लोभले, जडले द्विताचे निरसन करून ऐक्याचे स्थापन करणारा सद्गुरु वसत ऐक्यकाळाचा समय आला ह्मणने प्रकट होतो, व प्राणापानाचे भाडण, द्वैत मिटवून त्याना सम करितो व ते सम झालेले प्राणापान नेव्ही ज्ञानरूपी भरण्यात शिरतात, त्या वेळी अनादि कालापासून जीवाला अविद्येचा जडलेला सबध जी देहात्मवुद्धी ती लय पावू लागते, ऋतुकाळी ३ अत्यत वैराग्याचे आचीमुळे भविद्यारूपी वृक्ष करपू लागला. तेव्हा सद्गुरु वसताचा प्रवेश होऊन विरक्तीची कोवळी पानें फुटली व सोहभावाची सुमनें उमलली ४ आरक्त ५ शडलेले ६ प्रवेश, प्रारंभ. ५ सोहमावाने नीवदशा जाऊन शिवदशा झणजे कृष्णवरूपस्थिती प्राप्त झाली ८ मुगय ( मधु) ९ मृदु, कोमळ, हलका १० चुरडे ११ खरूप. निटेन प्रेमामृत सेवन करून भ्रमर हदयामध्ये स्थिर झाले व मध्यमद्वाराने झणजे सुषुम्नामार्गानें चिदाकाशात जाऊ लागले १२ पु ३०३ पासून पहा १३ भ्रमराचे सघ १४ आरोळ्या, नाद १५सोह हसें १६ हरिनाम १५ यमनियमादिक मागमत जीयरूपी पोकिनगी धारण केले होते. गुरुवसतराज पाहन मताचे विसर्जन फरून सा सद्दरतति करू लागल्या