Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/336

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२२ एकनाथी भागवत. प्रायेण भक्तियोगेन सत्सगेन विनोदय । नोपायो विद्यते मध्यमायण हि सतामहम् ॥ ५ ॥ ___ माझिये प्राप्तीलागुनी । भक्तिज्ञानमार्ग दोन्ही । ज्ञान अत्यत कठिणपणीं । भक्ति निर्विनी पाववी मज ॥ २८ ॥ ससार तरावयालागीं । अनेक साधने अनेगीं । बोलिली ती जाण वाउगी । उत्तम प्रयोगी मद्भक्ती ॥ २९ ॥ उपायांमाजी अतिप्रांजळ । निर्विघ्न आणि नित्य निर्मळ । माझा भक्तिमार्ग केवळ । ज्ञान ते विकळ मध्यपाती ॥ १५३० ॥ मळा शिंपावयालागुनी । मोट पाट उपाय दोन्ही । मोदां काढिजे विहीरवणी । बहुत कष्टोनी अतिअल्प ॥ ३१॥ मोटनाडा बैल जोडी । अखंड झोडितां आसुडी । येतां जातां वोढाचोढी । भोय भिजे थोडी भाग एक ॥ ३२ ॥ तेथही मोद फटे का नाडा तुटे । वोडव पडे बैल अवचटे । तरी हाता येता पीक आटे । बोल तुटे तत्काळ ॥ ३३ ॥ तैसा नव्हे सरितेचा पाट । एक वेळ केल्या वाट । अहर्निशी घडघडाट । चालती लोट जीवनाचे ॥३४॥ मोटेचे पाणी तैसे ज्ञान । करूनि वेदशास्त्रपठण । नित्यानित्यविवेकासी जाण । पंडित विचक्षण चैसती ॥ ३५ ॥ एक कर्माकडे बोढी । एक सन्यासाकडे घोडी । एक ह्मणती हे गोष्टी कुडी । देहो वोढावोढी न घालावा ॥ ३६ ॥ एक हाणती प्रारब्ध प्रमाण । एक ह्मणती सत्य शब्दज्ञान । एक ह्मणती धराये मौन । अतिजल्पन न करावे ॥ ३७॥ एक ह्मणती सांड व्युत्पत्ती । ज्याची चढे अधिक युती । तोचि ज्ञाता निश्चिती । सागों किती मूर्खासी ॥३८॥ एक ह्मणती तप प्रमाण । एक ह्मणती पुरश्चरण । एक हाणती वेदाध्ययन । द्यावे दान एक ह्मणती ॥ ३९ ॥ एक तो हे अवघेचि मोडी। घाली योगाचिये कडाडी । लावी आसनमुद्रेची वोढी। वैसवी रोकडी वारयावरी ॥ १५४० ॥ ऐसे नाना वाद करितां । एक निश्चयो नव्हे सर्वथा । ज्ञानाभिमान अतिपंडिता । ज्ञान तत्त्वता कळेना ॥४१॥ ऐसी ज्ञानमार्गीची गती । नाना परींची विघ्नं येती । विकल्प नासल्या व्युत्पत्ती । माझी निजप्राप्ती तेथें नाहीं ॥ ४२ ॥ तैसी नव्हे माझी भक्ती । नाममात्रे मज पावती । नामें उद्धरले नेणों किती । हेचि भागवतीं वोलिले ॥४३॥ माझें करिता गुणवर्णन । का हरिकथा नामसकीर्तन । तेथे रिपो न शके विघ्न । गडगर्जन हरिनामें ॥४४॥ जेथे हरिनामाचे पवाडे । तेथें विघ्न कैचें वापुडें । विघ्न पळे मद्भक्तापुढें । उघडती कवाडे मोक्षाची ॥ ४५ ॥ माझे भक्त अतिनिराश । न धरिती मोक्षाची आस । यालागी मी हपीकेश । त्यांच्या भावार्थास भूललों ॥४६॥ एवं निर्विघ्न मजमाजी सरता । मार्ग नाहीं भक्तिपरता । त्रिसत्य सत्य गा सर्वथा । भक्ति तत्वतां मज पढिये ॥४७॥ ऐशी निजभक्ति सुलभ फुडी। देवो सांगे अतिआवडौं । उद्धवासी हरिभक्तीची गोडी । हांची गुढी उभारिली तेणे॥४८॥ उद्धवाच्या जीती होतें । तेंचि निरूपिलें श्रीअनंतें । हरिखें नाचौ लागला तेथे जीवे श्रीकृष्णाते बोवाळी ॥४९॥ ऐसी तुझी.सुलभ भक्ती । तरी अवघेचि भक्ति का न करिती देवो ह्मणे भाग्येवीण माझी भक्ती । न घडे निश्चिती उद्धवा ॥ १५५० ॥ कोटि जन्माची पुण्यसपत्ती । जरी गाठी असेल आइती । ते जोडे माझ्या सतांची सगती । सत्सगे भक्ती उल्हासे ॥५१॥ सत्सगें १ निर्विघ्नपणे २ अनेकानी ३ सरळ ४ नेमळे ५ विहिरीचे पाणी, पायवणीसारसाहा शब्द आहे ६ चाबकाने ७ जमीन ८ ओढणारा ९ नदीचा १० पाण्याचे ११ फार बाय ११ तर्कशफि १३ सपाव्यात १४ ज्ञान १५ गजर, पौष १६ दार १७ पोचणारा १८ खरी १९ पदरी