________________
एकनाथी भागवत. करागी जडित मुद्रिका । त्रिकोण पदकोणी या देखा । उपासकां विधिपीठ ॥ ८१ ॥ अगम्य तेज हृदयींच्या पदका । गुणनिवळी उदरीं देखा । मध्ये कळसू नेटका । क्षुद्रघंटिका मेखळे ॥ ८२॥ कांतीव भरकेतस्तंभ जाण । तैसे शोभताति दोन्ही चरण । ते केवळ अचेतन । हे सचेतन हरिअगीं ॥८३॥ ध्वज वन अकुश अर्ध्वरेखा । दोन्ही पायीं पढ़ें देखा । यवांकित सामुद्रिका । अतिनेटका पदबंधू ॥ ८४ ॥ आरक्त रंग चरणतळां । वरील घनसावळी कळा । नभी इंद्रधनुष्यमेळा । तैसी लीळा हरिचरणीं ॥ ८५ ॥ सगुण देखोनियां जगन्नायका । दशदिशांसी चरणी आवाका । पावावया निजसुखा । दशांगुलिका होऊनि ठेल्या ॥ ८६ ॥ चंद्र कृष्णपक्षी क्षीण । तेणे ठोकिले हरिचरण । नखीं चंद्र जडोनियां जाण । परम पावन तो झाला ।। ८७ ॥ हे जाणोनि त्रिनयने । चंद्रमा मस्तकी धरणे । पायवणी माथा वाहणे । जग उद्धरणें तेणे जळें ।। ८८ ॥ सगुण देवो देखोनि पाहीं । चारी मुक्ती लागल्या पायीं । यालागी संतचरणाच्या ठायीं । तत्परं पाही सर्वदा । ॥ ८९ ॥ सलोकता समीपता । दोहीं पायीं वांकी गर्जतां । अंर्दू झाली स्वरूपता । सायुज्यता तोडरू ॥ १४९० ॥ ज्या तोडराचा धाक पाहीं । अहंगर्वित असुर वाहती देहीं । सर्व सुख ते हरीच्या ठायीं । त्याच्या पायीं समाधी ॥ ११ ॥ धैर्य वीर्य उदारकीर्ती । गुणगामीर्य शौर्य ख्याती । यांसी कारण माझी सगुण मूर्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ९२ ॥ माझे ये मूर्तीचेनि दर्शने । होत डोळ्या पारणे । जन्ममरणांचे उठवी धरणें । खंत फाडणे विषयांचें ॥९३ ॥ माझी मूर्ति देखिल्यापाठीं। न लगे योगयाग आटआटी। न लगे रिघा गिरिकपोटीं । नाना संकटीं न पडावें ।। ९४ ॥ न लगे आसन ध्यान । न लगे समाधिसाधन । माझिये प्राप्तीसी कारण । माझी भक्ति जाण उद्धवा ।। ९५॥ एकादश पूजाअधिष्ठान । तेथें माझें करोनि आह्वान । म्यां सांगीतले मूर्तीचे ध्यान । सावधान करावे ॥ ९६॥ माझें अर्चन माझें ध्यान । माझें करावे कीर्तन । माझ्या नामाचे स्मरण । माझे गुण वर्णावे ॥ ९७ ॥ अहर्निशी माझी कथा । अहर्निशी माझी वार्ता । अहर्निशी मातें ध्यातां । भक्ति तत्त्वतां ती नाच ।। ९८ ॥ दीपंकळिका हाती चढे । तें घरभरी प्रकाशू सांपडे । माझी मूर्ति जै ध्यानी जडे । तै चैतन्य आतुडे अवघंची ३९९॥ या उपपत्ति उद्धवा देख । सगुण निर्गुण दोन्ही एक । जाण पां निश्चयो निष्टंक । सच्चिदानंदसुख समत्वे ॥१५००॥जो कसू सुवर्णाचिये 'खोटीं । तोचि वाला एका कसवीं। सगुणनिर्गुणपरिपाटी । नाहीं तुटी चित्सुखा ॥१॥ तेवीं सगुण निर्गुण निःशेष । जाण निश्चये दोन्ही एक । सगळे साखरेचे टेंके । ना नवटाक सम गोडी ॥ २ ॥ हे अतरग माझं ध्यान । तेथें मन करोनि सावधान । अतिहर्षे मदर्चन । मद्भक्ती जाण करावे ॥३॥ उद्धवा ऐसे झणसी मनीं । हे भक्ति पाविजे कसेनी । हे साध्य होय जिहीं साधनी । तें तुजलागोनी सांगेन ॥४॥ निगुणरूपी तीन बळ्या २ बारीक घुगरू ३ पाचूचे स्तम ४ धैर्य ५ माश्रय केले, धरिले ६ पादोदक, पायर्याचे तीर्थ ७ पायातलें एक भूषण, साखळी ८ अहपणाने फुगलेले १ उपास फिटणे, साधक १० खत फाढून देणें धणजे बाकी पूज्य करून टाकणे ११ श्रम, खटपट १२ पर्वताच्या गुहत १३ भाजन, भोजन १४ आवाहन १५ दिव्याची ज्योत १६ परब्रह्म १७ मा विवेचनान १८ दृढ १९ लाडीला २० फनीपणा, मेद २१ डोंगर, पवत (मागें भध्याय ५ ओवी १०४ माय हा शब्द आला आहे)