Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३० एकनाथी भागवत. समूळ नामरूप जाये । मज कोणी देखों न लाहे । ऐसी दशा जेणे होये । ते ते उपाये करीतसे ॥ ५१ ॥ लौकिक देखोनि उद्वेगू । देहगेहांचा उवैगू । एकलेपणी अतिचांगू। न धरी सगू द्वैताचा ॥ ५२ ॥ मज कोणी न देखावें । मज कोणी न वोळखावे । मज कोणी न लाजावे । ऐसे जीवे वांछितू ।। ५३ ।। मान देखोनियां दिठीं । लपे देहँउपेक्षेच्या पोर्टी । जेवीं चोर लागलिया पाठी । लपे सकटी धनवंतू ।। ५४॥ मी एकु लौकिकी आहे । ऐसे कोणा ठावे नोहे । ऐशी ऐशी दशा पाहे । मानु न साहे यालागीं ॥५५॥ सांडावया अहंममता । मानू न पाहे सर्वथा । लौकिकी सन्मानू घेतां । दृढ अहंता होईल ॥ ५६ ॥ ज्यांचे पोटी दृढ अभिमान । ते सदा चांछिती सन्मान । जो सांडूं रिघे अभिमान । तो मानापमान न पाहे ॥ ५७ ॥ जेणे घेतला सन्मान । त्यासी नेघवे अपमान । तेथ सहजें आला देहाभिमान । यालागी सन्मान नाघडे ॥५८॥ सन्मानु घ्यावया तत्त्वतां । ज्ञातेपण मिरवी ज्ञाता । ते सधीं वसे ममता । अर्थस्वार्थाचेनि लोमें ॥ ५९॥ एवं नापेक्षी सन्मान । हे प्रथम शिष्याचे लक्षण । आता निर्मत्सरत्व सपूर्ण । तें सुलक्षण परियेसीं ॥१६०॥ सज्ञानामाजी वैर । ज्ञातृत्वाचाचि मत्सर । तेथे देहाभिमाने केले घर । अतिर्दुस्तर जीवासी ॥ ६१ ॥ ज्ञानाभिमानाची गोष्टी । वेचूनि तपाचिया कोटी । दुजी करीत होता सृष्टी । अभिमान पोटी ज्ञानाचा ॥ ६२ ॥ ज्ञानाभिमानु दुर्वासासी । व्यर्थ शापिले अवरीपासी । म्यां सोशिले गर्भवासासी । ज्ञानाभिमानासी भिजनी ॥ ६३ ॥ ज्ञानाभिमानु ब्रह्मयासी । नेले गोपालवत्सांसी । मज होणे पडिले त्या वेषांसी । ज्ञानाभिमानासी भिऊनी ।। ६४ ॥ उद्धवा ज्ञानाभिमान । सर्वो अभिमानांमाजी कठिण । वसिष्ठ विश्वामित्र जाण । ज्ञानाभिमानें भांडती ॥ ६५ ॥ एवं ज्ञानाभिमानाभेण । म्यां घेतले गोवळेपण । मज मूर्ख ह्मणती याज्ञिक ब्राह्मण । त्यांसी ज्ञानाभिमान कर्माचा ॥६६॥ मुख्य माझीच हे ऐशी दशा । तेथें इतराचा पौडू कायसा । ज्ञानाभिमानाचा दृढ फांसा। मुंगवे सहसा ज्ञात्यासी ॥ ६७ ॥ ज्ञानाभिमानाची जाती कैशी । उभा न ठाके मूर्खापानी। वैर लावी सज्ञानासी । समत्सरेसी वर्तवी ॥ ६८ ॥ एवं निर्मत्सर होणे ज्यासी । तेणे साडाव ज्ञानाभिमानासी । येरवीं तो ज्ञातयासी । समत्सरेसी नांदवी ॥ ६९ ॥ एक मत्सराची सामग्री । देहीं देहाभिमान दृढ करी । तोही ज्ञातेपणाचे वळ धरी । लोभ माझारी अर्थस्वार्थे ॥ १७० ॥ इतुकी सामग्री जेथें होये । तोचि समत्सर द्वेषु चाहे । शुद्ध शिष्य हैं न साहे । त्यागोनि जाये मत्सरू ॥ ७१ ।। मत्सराची जाती कैशी । अवश्य वसे ज्ञात्यापाशीं । मत्सरू थोर पंडिताशीं । यावजन्मेसीन सडिती ॥७२॥ पंडित भेटती समत्सर । लैंचण भजन अतिनम्र । बोलती अतिमधुर । समत्सर छळणोक्ती ।। ७३ ॥ मत्सरे पंडित येती क्रोधा । असंदारोपणे करिती निंदा । एवढी मत्सराची बाधा । नातळे कदा १ज्या ठिकाणी मूळासह नामरूप नाही नामरूपात्मक अविद्या, तिचे मुळ जी मूळमाया किंवा विद्या या दोन्ही जेथे नाहीत असे स्थान प्रापद, त्या ठिकाणी द्वैताचा छेदा नाही २ वटाळा ३ जेथे देहाला किंमत नाही अशा मनाच्या स्थितीत ४समान सोसत नाही . साहे६नवत नाही . मत्सराचा अभाव निषण्यास कठिण ९शानाचा अभिमान सर्व भभिमानात अत्यत दुजय आहे, ह नाथा पुढील आंब्यांत उत्कृष्ट प्रकार चर्णिले आहे १०शानामिनाच्या भयान ११ गवळ्याचा वेष, गवळ्याच्या पोटी जन्म १२ प्रतिष्ठा, किंमत १३ उक्लता येत नाही. १४ शानियासी १५ स्थिति, रमण १६ लवणे, सुति करणे, गरे १७ एक्मेकांवर रोटे भारोप करून