________________
१७६ एकनाथी भागवत मुखी जे पडे । तेणें जोडे निजपद ॥९६ ॥ आणिक अग्नीचें चिन्ह । ऐक राया सावधान । तेंचि साधकासी साधन । सिद्ध लक्षण सिद्धाचें ॥ १७॥ क्वचिच्छा फचिरस्पष्ट उपास्य श्रेय इच्छताम् । भुक्ते सर्वत्र दातॄणा दहन् प्रागुत्तराशुभम् ॥ ४६॥ - भीतरी तेजस्वी वरी झांकिला । होमकुंडी अग्नि पुरिला । का यज्ञशाळे प्रज्वळला । याज्ञिकी केला महायागू ॥ ९८ ।। जो जो उपासका भावो जीवीं | त्या त्या श्रेयांतें उपजवी । पूर्वोत्तर अशुचित्वे आधवी । जाळूनि हवी सेवितु ॥ ९९ ॥ तैशीचि योगियाची लीळा । भाविकां प्रकट दिसे डोळां । एका गुप्तचि होऊनि ठेला । न दिसे पाहिला सर्वथा ॥ ५०० ॥ ऐशियाच्याही ठायीं । भाववळे भाविक पाही । अर्पिती जे जे कांहीं । तेणे मोक्ष पाहीं मुमुक्षां ॥१॥ ते पडतांचि योगियांच्या मुखी । संचित क्रियमाणे असकी। जाळोनियां एकाएकी । करी सुखी निजपदी ॥२॥ आणीकही अग्नीचे लक्षण । राया तुज मी सांगेन जाण । जेणे सगुण आणि निर्गुण । दिसे समान समसाम्ये ॥३॥ ___ स्वमायया सृष्टमिद सदसलक्षण विभु । प्रविष्ट इयते तत्तत्सरूपोऽग्निरिवैधसि ।। ४७ ॥ अग्नि सहजें निराकार । त्यासी काठानुरूपें आकार । दीर्घ चक्र वर्तुल थोर । नानाकार भासतु ॥ ४ ॥ तैसीचि भगवंताची भक्ती । स्वमायाकल्पित कल्पनाकृती । तेथ प्रवेशला सहजस्थिती । बहुधा व्यक्ती तो भासे ॥५॥ जैसे गंगेचे एक जळ । भासे भंवरे लहरी कल्लोळ । तैसा जगदाकारें अखिळ । भासे सकळ जगदात्मा ॥६॥ कां छाया. मंडपीच्या चित्रासी । दीपप्रभा भासे जैसी । राम रावण या नावेसी । दावी जगासी नटनाव्य ॥७॥ तैशा नानाविधा व्यक्ती । नाना मते नाना कृती । तेथ प्रवेशोनि श्रीपती। सहजस्थिती नाचवी ॥८॥ तैशी योगियाची स्थिती । पाहता नानाकार व्यक्ती । आप. णियातें देखे समवृत्ती । भेदभ्रांति त्या नाही ॥९॥ तेथ जे जे काही पाहे । ते ते आपणचि आहे । या उपपत्ती उभवूनि वाहे । सागताहे अवधूतू ॥ ५१० ॥ या देहासी जन्म नाशू । आत्मा नित्य अविनाशू । हा दृढ केला विश्वासू । गुरु हिमांशू करूनि ॥ ११ ॥ विसर्गाया इमशानान्ता भावा देहस्य नात्मन' । कलानामिव चन्द्रस कालेनाध्यक्तवर्मना ॥ ३८ ॥ शुक्लकृष्णपक्षपाडी। चद्रकळाची वाढी मोडी । ते निजचंद्रीं नाही 'वोढी । तैगी रोकडी योगियां ॥ १२ ॥ जन्मनाशादि पडिकार । हे देहासीच साचार । आत्मा अविनाशी निर्विकार । अनंत अपार स्वरूपत्वे ॥ १३ ॥ घटु स्वभावे नाशवंतू असे । त्यामाजीं चंद्रमा विलासे । नश्वरी अनश्वर दिसे । विकारदो लिपेना ॥१४॥ घटासवे चंद्रासी उत्पत्ती । नाहीं नाशासवे नाशप्राप्ती । चंद्रमा आपुले सहजस्थिती । नाशउत्पत्तिरहितु ॥ १५ ॥ तैसा योगिया निजरूपपणे । देहासवे नाही होणे । देह निमाल्या नाही निमणे । अखंडपणे परिपूर्ण ॥१६॥ काळाची अलक्ष्य गती । दाखवी नाश आणि उत्पत्ती । ते काळसत्ता देहाप्रती । आत्मस्थिती नातळे ॥ १७॥ एवं काळाचे वळ गाढे । ह्मणती ते देहाचिपुढे । १ आवन २ कल्याण ३ सचित व क्रियमाण अशुभे ४ सकळ, सर्व ५भगवद्भक्ति ६ चिनाचे खेळ दासविण्याच्या मडपात ७ वृत्ती ८ वाह उमारून ९ चद्र १० क्ला बाटल्या किंवा क्षय पावल्या तरी चद्राला वृद्धिक्षय नसतातच. ११ उत्पन्न होणे, आहेसे वाटणे, बाढणे, परिणामास पावणे, धय पावणे व मरणे असे देहाला सहा विकार माहेत १२ चिचला दिसे १३ नाशवताच्या ठाया अविनाशी वस्तु दिसते, पण तिला नाशवताचे जन्मनाशादि सहा विकार बाधू शकत नाहीत १४ खखरूपाकारपणे १५ मजल्यावर, नष्ट झाल्यावर १६ एकपण.