पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. वनआनंदधनु । तुमच्या उदरीं श्रीकृष्णु । अवतार पूर्ण पूर्णाशेंसी ॥ ३८ ॥ उद्धरावया निजगती । थोर उदार केली कीर्ती ।ज्याच्या अवताराची ख्याती पवाडे पढती ब्रह्मादिक ॥३९॥ तरावया अतिदुस्तर । ज्याची कीर्ति गाती सुरनर । परमादरें ऋपीश्वर । कृष्णचरित्र सर्वदा गाती ॥५४०॥ज्याचें नाम स्मरतां भक्त । कळिकाळ नागनंत । तो अवतार श्रीकृष्णनाथ । तुह्मांआंत प्रगटला ।। ४१ ॥ श्रीकृष्ण परब्रह्मैकनिधी । त्यासी पाहूं नका बाळबुद्धी। इतुकेन तुझी भवाब्धी । जाणा त्रिशुद्धी तरलेती ॥ ४२ ॥ ऐशी श्रीकृष्णअवतारकथा । नारद वसुदेवा सागता । शुक ह्मणे गा नृपनाथा । विस्मयो समस्तां थोर झाला ॥ ४३ ॥ श्रीशुक उवाच-एतच्छुत्वा महामागो वसुदेयोऽतिविस्मित ! देवकी च महाभागा जहतुर्मोहमात्मन ॥ ५ ॥ निमिजायंत मुनिगण । इतिहास पुरातन जीर्ण । कृष्ण परमात्मा ब्रह्म पूर्ण । नारद आपण निरूपी हर्षे ॥ ४४ ॥ शुक ह्मणे परीक्षिती । ऐकोनि नारदवचनोकी । देवकीवसुदेवो चित्तीं । अति विस्मिती तटस्थ ॥ ४५ ॥ तया नारदाचेनि वचनें । कृष्ण परमात्मा बोले येणें । देवकी वसुदेव निजमने । दोघे जणे विस्मित ॥ ४६॥ ती परम भाग्यवंत दोन्ही । जो पुत्रस्नेहो होता श्रीकृष्णीं । तो सांडोनियां तत्क्षणी । कृष्णपरब्रह्मपी निश्चयो केला ॥ ४७ ॥ श्रीकृष्णी ब्रह्मभावो । धरितां निःोप मोहनेहो । हृदयींचा निघोनि गेला पहा हो । बाप नवलावो भाग्याचा ॥ ४८ ॥ इतिहासमिम पुण्य धारयेध समाहित । स विधूयेह शमल ब्रह्मभूयाय करपते ।। ५२ ।। इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्कंधे पचमोऽध्यायः ॥५॥ जो निमिजायंतसवादु । वसुदेवा सांगे नारदु । हा इतिहास अतिशुद्ध । जीवशिवभेदच्छेदकु ॥ ४९ ॥ सावधानपणे श्रोता । तल्लीन होऊनि तत्वतां । हे इतिहासाची कथा । सीदरता जो परिसे ॥ ५५० ॥ तेणे सकळ पुण्याचिया राशी । श्रवणे जोडिल्या अहर्निशीं । तो गा पुरुप अवश्यतेसी । ब्रह्मप्राप्तीसी सत्पात्र ॥ ५१ ॥ सार्थक एक एक पद । परिसतां होय अंतर शुद्ध । यालागी पावे ब्रह्मपद । परमानंद निजबोधैं ॥५२॥ हे पंचाध्यायी हणणे घडे । पचवक चंद्रचूडें । एकादशाचे ज्ञान गाढ़ें । वर्णावया फुडें ध्वज उभविला ॥ ५३॥ हे पचाध्यायी नव्हे जाण । एकादशाचे पंचप्राण । उपदेशावया शुद्ध ज्ञान । सामोरे आपण स्वभक्का आले ॥ ५४॥ हे पंचाध्यायी नव्हे केवळ । पंचम आलापे शुककोकिळ । एकादश वसतमूळ । भक्त अलिकुळ आलापवी स्वयें ॥५५॥ हाही नव्हे प्रकार । हे शर्करा पंचधार । चाखो धाडिली सत्वर । ज्ञानगंभीर निजभक्तां ॥५६॥ हे पंचाध्यायी नव्हे सिद्ध । एकादशाचे पंच गंध । भक्त आंधतावया शुद्ध । धाडिली प्रसिद्ध गंधाक्षता ॥५७॥ एकादश अतिविवेकी । यावया पंचाध्यायी पालखी । पुढें धाडिली कवतकी। निजभक्तविखी कृपाळवे ॥५८॥हे कृष्णउद्धवधर्ममात्रा अर्धोदयो महायात्रा। ते यात्रेलागी हाकारा । पचाध्यायी खरासाधकां करी॥५९ ॥ श्रीकृष्णउद्धवमेळा । देखोनि ब्रह्मसुखाचा सोहळा । तो सागों आली कळवळा । भक्ताजवळा पंचाध्यायी ॥ ५६० ॥ १ सतसमुदायावर किंवा सतरुप मनावर आनंदाचा वर्षाव करणारा मेघ १ सोने, पाया पडती ३ नाश पावतो ४ परमामरूप ठेवा ५ मोठा ६ आश्चर्यचक्तिपणा ७ जीव आणि शिव याच्या भेदाचे निरसन करणारा ८सार्थकता र सत्यार्थ पाचे १० अथयुचर ११ बोलावण्यासाठी १२ आपल्या भकाविषयीं दयालु जो त्याने १३ हाकाटा, महापोप