पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा. न्मेषस्फूर्ती । त्याच्या आनंदलेशस्थिती। आनंद उपस्थी भोगिती प्राणी ॥४१॥ एवं चाळकू जो त्रिजगतीं । जो स्वानंदें नादे हदयस्थिती । त्यातें नारायण ह्मणती । तोचि निश्चिती परमात्मा ॥ ४२ ॥ ज्याचेनि मन बुद्धि प्राण । इंद्रिये विचरती सपूर्ण । तो तुं हणसी त्याअधीन । हे कल्पांती कदा न घडे ॥४३॥ तेथ जाणपणे जाणों जासी । ते जाणावे तेंचि नेणसी । तेथ ज्ञातेपणे ज्ञानासी । स्वरूपापाशी रिगू नाहीं ॥४४॥ जाणीव आणि नेणीच । है सोडूनि सर्व भाव । जे उपजे सद्भाव । तै ब्रह्म स्वयमेव पाविजे ॥४५॥ नैतन्मनो विशनि वागुप्त चक्षुरामा प्राणेन्द्रियाणि च यथाऽनलमचिप खा । शब्दोऽपि बोधक निषेधतया ममुग्मयोंतमाह यहते न निषेधसिद्धि ॥३६॥ वैकुंठ कैलास क्षीराब्धी । मन कल्पी कल्पनाविधी । परी आत्मा कल्पावया त्रिशुद्धी। म बुद्धयादी सरेना ॥ ४६॥ स्वयें कल्पी निभुवन । ते स्वरूपी रिपो न शके मन । बुद्धि निश्चयात्मक पूर्ण । तीसही जाण अगम्य वस्तू ॥४७॥ जे मनवुद्धिअगोचर । ते वाचेसी अतिदुस्तर । वस्तु नन्हे शब्दगोचर । परात्पर परब्रह्म ॥४८॥ मोटे बांधतां आकाशात। चारी पालव पडती रिते । तेवीं शन्दै बोलावे वस्तूते । तंव शब्द शब्दार्थ निधर्म ।। ४९ ।। प्राणाचेनि निजढाळें । जे का क्रियाशक्ती चळे । ते क्रियेसी वस्तु नातळे । मा इद्रिया आकळे कसेनी ॥ ६५० ॥ जेवी थिल्लराओतीता । विवोनि वोली नव्हे सविता । तेवीं मनबुद्धिइद्रियापरता । जाण तत्वतां परमात्मा ।। ५१ ॥ जो मनाचे आदि मन । जो बुद्धीची बुद्धि सज्ञान । जो नयनाचे आदि नयन । जो श्रवणाचे श्रवण सावधानत्वे ।। ५२ ।। जो घ्राणाचें निजघ्राण । जो रसनेची रसना आपण । जो त्वचेची निजत्वचा पूर्ण । जीवाचा तो जाण जीवू स्वयें ॥५३॥ जो इंद्रियाचा प्रकाशिता । जो कर्म करोनि अकर्ता । तो इंद्रियीं इंद्रियार्या-1 विषयी मर्वथा हों नेणे ॥ ५४ ॥ जेथ बुद्धीचि न वळचे । तेथ मन मनपणे केनी रिघे । मा श्रवणनयनघ्राणयोगें। विषयसयोगें केवी भेटे॥५५॥जेय प्राणशक्ती न चले पुढें । तेथ वाचा स्वयें लाजिली मुरडे । मा कमेंद्रियासी कोणीकड़े । पाडू पुढे जोडेल ॥ ५६ ॥ अग्नीपासूनि आह्या अनेग । क्षणक्षणा निघती चाग । परी आह्यामाजी अग्नीचे अग । सर्वथा साग प्रगटेना ॥ ५७॥ का सूर्यापासूनि सूर्यकांत । प्रकाशती असख्यात । परी सूर्यकाताआत । कदा भास्वत प्रगटेना ॥५८॥ जेवी सिंधूपासूनि तरग । प्रकाशती अति अनेग । परी तरगों सिधूचे अग । सर्वथा सांग प्रगटेना ॥१९॥ तेवी ब्रह्मापासोनि करणे । प्रकाशती अनेकपणे । परी त्या इंद्रिया ब्रह्म जाणणे । हे जीव माणे घडेना ।। ६६० ॥जरी केळापासूनि केळी निपजे । का साखरेपासूनि ऊस उपजे । तरी इंद्रियीं ब्रह्म जाणिजे। नये निजबोजे ब्रह्मादिका ॥६१॥ आशंका॥ इद्रियीं नन्हे ब्रह्मज्ञान । त जीवाचे भरवधन । कदाकाळी न तुटे जाण । जन्ममरण अनिवार ॥ १२ ॥'शब्दादेवापरोक्षे ति । ऐशी श्रुतिशास्त्रोपपत्ती । तेही मिथ्या वाटे चंदती। ऐसे तू निश्चिती मानिसी राया ।। ६३ ।। तेही अर्थीचे निरूपण । ऐक राया सावधान । शब्द निमोनि आपण । देब्रह्मज्ञान जीवासी ॥१४॥ १ डोळ्यांची पानी हारणे २ जननेंद्रियाचे ठिकाणी ३ हालचाल करतात ४ रिघाव, शिरकाव ५मनासिद्धी सरना ६ पुरी पडत नाही. जे मन व बुद्धि याना कल्पिता येत नाही, असे ८ पदर ९ निजधर्म १० चलन मलनान ११ सापटत नाही १२ उवण्यात १३ मिरलेला, ओला १४ अनाटि १५ बुद्धीची दृष्टी. १६ पोचत 10 मागे पळते १८ यश १९ ज्वाला, हळ्या, ठिणग्या २० सूर्य २१ दिये २२ यात २३ लय पाया . - 4