Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा, कौतुक । तरी विषय आवश्यक । साधकां होती बाधक । तेणें आत्यंतिक अनुतापू ॥ ६ ॥ अनिवार विषयावस्था । यालागी ने बचे निजसत्ता । तेणे मुमुक्षच्या चित्ता । अत्यंत व्यथा अनुतापें ॥ ७॥ नसतां विषयाची अतिप्रीती । स्वता नव्हे विषयनिवृत्ती । ऐशिया साधकामती । निर्णीत शास्त्रार्थी नेमिला नेमु॥ ८॥ नाहीं विपयाची आसकी । नव्हे विषयनिवृत्ती ऐशी जे का साधकस्थिती । ने, त्याप्रती शास्त्र केला ॥९॥जो का केवळ विषयासक्त । कदा ने मनी शास्त्रार्थ । कां जो जाला जीवन्मुक्त । तोही शास्त्रार्थ मानूनि न मनी ॥ ५१० ॥ जैशी मृगजळाची भासे स्थिती । तैसे विषय मुक्तांप्रती । त्या विषयाचिये निवृत्ती । कोणते शास्त्रार्थी मानावा नेमू ॥११॥ एवं अत्यासक्त अतिविरक्त । त्यासी नेमू न चले येथ । मुमुक्षूसींच शास्त्रार्थ । नेमी निश्चित निजनेमें ॥ १२ ॥ तेथ गुरुशिष्यसवाद । करिता ज्ञानार्थप्रबोध । ते वोधी बाधी विषयवाध । तत्त्यागी प्रसिद्ध शास्त्रार्थनेमू ॥ १३॥ मनसा वाचा कर्मावरोधु । येणे विपयाचा त्रिविध बाधु । त्या तिहींसही त्रिविधु । शास्त्रे अतिशुद्ध नेमिला नेमू ।। १४ ॥ पूर्वश्लोकोत्तरार्धम् ॥ ॥मनोयाकर्मदपद्ध च सत्य शमदमावपि । मनासी नेमू उपर्शमाचा । इद्रिया नेमु तो दमाचा । सत्य नेमिली बाचा । तिहीसही तिहींचा निजनेमू॥१५॥ विपयकामगज दारुण । अहमहामर्दे उन्मत्त पूर्ण । देहतारुण्य अतिपूर्ण । तोडी बंधन विधीचें ।। १६ ।। खंदी सुहृद राजा गुरु । सोडा कवळी स्वगेशिखरू । नरकनदीमाजी अपारू । अतिदुस्तरू वुड्या देतु ॥ १७ ॥ धर्मजळे क्षाळे अवचिता । सवेचि सलोभ धुळी घाली माथा । घोळसी ब्रह्मादिका समस्ता । अहंममता गर्जतू ॥१८॥ त्यासी विवेकमहावंत जाण । माथा चढी जाणे आपण । शास्त्रविधिअकुशे पूर्ण । धरिला आवरून करकरितू ।। १९ ।। त्यासी उपशमाचे संरक्षण । वैराग्ययुक्त ठेवूनि जाण । दमाचे श्रृंखेली आकलून । सत्याचे स्तंभी पूर्ण विवेकू वाधे ॥ ५२० ॥ मनसा चाचा कायिक कर्म । येणे विपयवाधा बाधी परम । त्या तिहाँसी केला त्रिविध नेम । त्या नेमाचे वर्म ऐकराया ॥२१॥ आता शमाची ऐशी स्थिती । मनबुद्धयादि चित्तवृत्ती। सांडपूनि विषयासकी । लावी परमार्थी प्रवोधूनी ॥ २२ ॥ पूर्व उगवता गर्भस्ती । आंधारू सांडी त्रिजगती । तेवीं गुरुवाक्ये शमाची प्राप्ती । विषयनिवृत्ती मानसिक ॥ २३ ॥ वाह्य इंद्रियप्रवृत्ती । दमें दमोनि गुरुवाक्यस्थिती । मग शमाची सगती । आणी निवृत्ती इंद्रियकम ॥ २४ ॥ कन्या प्रतिपालूनि जैसी । दान देता जावयासी । त्यागी वापाचे कुळेगोत्रासी । दमें इंद्रिये तैशी विपयार्था ॥ २५ ॥ झणी वाचा जाईल विकळ । तिसी सत्याचा महामोकळ । देऊनि केली निखळ । अतिअढळ सत्यधूतवाणी ॥ २६ ॥ सत्यनादिया ब्रह्मादि चंदिती । असत्या होय अधोगती। ऐसे व्याख्यान करिती । तेही वदती असत्य ॥ २७ ॥ को रामनामाच्या आवृत्ती । चाचा धुतली स्मरणोत्ती । ते असत्यामाजी पुढी । कदा कल्पाती बुडेना ॥२८॥ मंथूनि काढिले नवनीत । ते पुढती न बुडे ताकांत । तेवीं नामें याचा निर्धूत । असत्य तेथें स्पर्शेना ॥ २९ ॥ जेवीं लागलेनि रविकरें । घृतकणिका स्वयें विरे। तेवीं सत्याचेनि निज १ त्यागिली न चचे सर्वथा २ भात्मखरूपाची प्रतीति होत नाही ३ निश्चय करून शाखा नियम लावून दिरे ४ नियम ५ मानीत नाहीं ६ शम-अतरिदियदमन ५ अहकारमदाने ८ प्रात, हिंगरेला ९ अवमा १० तत्काळ ११ लोचवितो १२ विवेकरूप महात १३ सारादडाने १४ सूर्य १५ कुळधर्मासी. १६ उत्तम कडया १७ लोणी १८ शुद्ध सारेली १९ सूर्यकिरणान