पान:Sanskruti1 cropped.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होती. खेळण्यांच्या जोडांपैकी एक जोड फार सुबक होता, व दुसरा वाईट होता. एका मुलीने वाईट जोड मैत्रिणीसाठी म्हणून बाजूला ठेविला; व चांगली खेळणी घेऊन ती खेळण्यात गर्क झाली. दुसरी दोन्ही जोडांकडे पाहत बसली. तोंडाने म्हणत होती, 'बाबी चांगली मुलगी आहे. चांगला खेळ ती मैत्रिणीला देते. आई बाबीला शाबासकी देईल!' तिने चांगला जोड मैत्रिणीसाठी ठेविला; व वाईट घेऊन खेळत बसली. पण अधूनमधून त्या चांगल्या जोडाकडे निराशेने पाहत पाहत पुटपुटत होती. तिसरीने दोन्ही जोड पुढे ठेविले. वाईट जोड हातात घेतला; व ती म्हणाली, 'हा जोड वाईट दिसला, तरी खरोखर जास्त चांगला आहे. त्या दुसऱ्या जोडीतील बाहुल्या किती जड! ह्या कशा हलक्या आहेत!' वगैरे. नंतर तिने वाईट जोड मैत्रिणीसाठी ठेवून ती चांगला जोड घेऊन खेळू लागली. ह्या तीन मुलींपैकी पहिलीच्या अंतःकरणात सामाजिक मूल्यांचा प्रवेश झालाच नव्हता. अगदी नैसर्गिकरीत्या तिला जे जास्त चांगले दिसले, ते तिने घेतले. दुसऱ्या दोघींना सामाजिक मूल्यांची पूर्ण जाणीव होती. पैकी एकीने 'समाजाची पसंती' मिळेल असे वर्तन केले; व शेवटलीने सामाजिक मूल्यांच्या विरुद्ध वर्तन करून जणू काय आपण त्या मूल्यांबरहुकूम बागलो, अशी ती स्वतःची व इतरांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत होती. पहिलीच्या वागण्याला समाजाने नागडा स्वार्थ म्हटले असते. शेवटलीचे वागणे दांभिकपणाचे होते; ती सामाजिक मूल्यांना तोंडदेखले चांगले म्हणत होती.
 हा प्रयोग विस्ताराने देण्याचे कारण सामाजिक मूल्ये व्यक्तिगत कशी होतात, ते ह्यावरून कळावे हे. आपल्या भोवतालच्या व्यक्तींच्या मतांचा व वर्तनाचा ठसा लहान मुलांच्या मनावर जन्मल्या क्षणापासून उमटत असतो. शब्दांचे अर्थ कळायच्या आतच त्या शब्दांमागील भावना लहान मूल समजू भावना विधीनिषेध दर्शवितात; व त्यांचे पडसाद मुलांच्या अंतःकरणात शकते; व त्याचे कोवळे संस्कारक्षम मन त्या भावनांना साद देत असते. ह्या उमटत असतात. व्याकरणाचे कसलेही नियम माहीत नसून मूल बोलायला शिकते. विशिष्ट ध्वनिसमूह व त्याला चिकटलेला अर्थ हे दोन्ही सर्वस्वी सामाजिक संकेत आहेत. त्यांमागे वर्षसहस्त्रकांची सामाजिक परंपरा असते.

६६

।। संस्कृती ।।