पान:Sanskruti1 cropped.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तापी नदीचाही उल्लेख आहे. म्हणजे राम दक्षिणेकडे गेला, तो मार्ग वाल्मीकिच्या रामायणाहून भिन्न असा दिला आहे. विमलसूरीनंतर दोन तीन शतकांनी कालिदास झाला, तेव्हा सध्याच्या संशोधित आवृत्तीमध्ये दिलेला मार्ग रामायणात होता, असे दिसते. तोपर्यंत भारताच्या दक्षिण टोकाला असलेले लंकाद्वीपही लोकांना माहीत झाले होते. इतके असून रामायणात काय किंवा रघुवंशात काय, लंका ते विंध्य येथपर्यंतच्या भूभागाचे वर्णनच येत नाही. तेथपर्यंतचे वर्णन मात्र अगदी काटेकोरपणे आलेले आहे. लोकगीतांत असलेल्या रामायणात राम दक्षिणेकडे गेला, ह्यापेक्षा कदाचित जास्त काही नसेलच. दक्षिणेचे मार्गही निराळे होते, एक मार्ग दिला. म्हणजे विमलसुरीपर्यंतच्या काळात राम कुठच्या मार्गाने विमलसुरीने त्यातला गेला, हे सर्वमान्य झालेले नव्हते.
 ह्या सगळ्या विवेचनावरून असे वाटते की, रामकथेतील प्रसंग शरयू नदीपासून मध्य प्रदेशाच्या मध्यापर्यंत घडलेले असावेत. पुढे कधीतरी पहिल्यांदा गोदावरी नदी व मागाहून सध्याची लंका त्यामध्ये शिरली. हा प्रकार कालीदासाच्या वेळेपर्यंत झाला पण तरीही किष्किंधा म्हणजे तुंगभद्रेच्या तीरावरील हल्लीचे हंपी हे समीकरण ब-याच मागाहून झालेले दिसते. ते कधी झाले, ह्याचा शोध करणे भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने फार उपयुक्त होईल. कालिदासाच्या काव्यावरून (मेघदूत) राम सध्यांच्या आसपास दक्षिणेकडे उतरला असे दिसते. किष्किंधा कृष्णेच्याही दक्षिणेला व पूर्वेच्या रस्त्याने न जाता नाशिकला आला ही कथा, हे दोनही भाग फार उत्तरकालीन असावेत, असे वाटते.
 सध्याची संशोधित आवृत्ती बाराव्या शतकाची आहे. त्यात ही किष्किंधा कोठे, ह्याचा पत्ता लागत नाही. हा म्हणजे उत्तरकाल बाराव्या शतकापुढचा होता, असे समजण्यास हरकत नाही.
 भवभूतीच्या उत्तर राम चरितात व रामायणाच्या उत्तरकांडात राम परत एकदा दक्षिणेला गेल्याचे वर्णन आहे; पण सबंध उत्तरकांडच प्रक्षिप्त मानिल्यामुळे गंगापार होऊन दक्षिणेकडे जाण्याचा तो प्रसंग वरच्या वृत्तांतातून गाळलेला आहे.

४४

।। संस्कृती ।।