पान:Sanskruti1 cropped.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाच


अरण्यकांड


 रामाने आपल्या आयुष्यात चारदा गंगा ओलांडली. पहिल्या वेळेला विश्वामित्र त्याला व लक्ष्मणाला आपल्या यज्ञाच्या रक्षणार्थ घेऊन गेले त्या वेळी. दुसऱ्यांदा वामनाश्रमातून जनकाच्या यज्ञाला उत्तरेकडे गेले त्या वेळी. तिसऱ्यांदा कैकयीने वनवासाला पाठविले त्या वेळी व चौथ्यांदा लंकेहून सीतेला घेऊन परत येताना. ह्या दोन्ही वेळच्या प्रवासाचे जे वर्णन आहे, त्यातला काही भाग तुलना करण्यासारखा आहे. पहिल्या वेळेला रामाने गंगा ओलांडली, ती शरयूच्या संगमाच्या पूर्वेकडे, म्हणजे जवळजवळ हल्लीच्या बिहारच्या हद्दीशी. विश्वामित्र व राम जेथे गंगापार झाले, तेथे मलद आणि कारूष नावाची दोन समृद्ध राज्य पूर्वी होती. ती ताटका नावाच्या राक्षसीने नष्ट केली. तेथे त्या वेळी घोर अरण्य होते. काही मार्ग चालल्यावर ते वामनाश्रमात आले. तेथेच विश्वामित्रांचा यज्ञ चालू व्हायचा होता. रामाने व लक्ष्मणाने यज्ञाचे रक्षण केले. नंतर मैथिल जनकाच्या यज्ञाला आम्ही चाललो आहोत. तूही आमच्या बरोबर चल, असे ऋषींनी सांगितल्यामुळे विश्वामित्र व इतर ऋषी यांच्याबरोबर रामलक्ष्मण वामनाश्रमातून मिथिलेला जायला निघाले. गंगेच्या दक्षिणेकडे वसलेली गिरिव्रज नावाची दुर्गम राजधानी विश्वामित्राने लांबून रामाला दाखविली. त्या राजधानीच्या शेजारून समागधी नदी वाहत होती. पुढे महाभारतात वर्णन केलेली मगधराज जरासंधाची राजधानी ती हीच. म्हणजे या सर्व मंडळींनी मगधदेशात प्रवेश केला होता. एक रात्र सर्वजण शोण नदीच्या काठी निजले व नंतर ते गंगा ओलांडून लगेच विशाला नावाच्या नगरीला पोहोचले. हीच विशाला बुद्ध वैशाली-नगरी होती. हल्लीच्या बिहारमधील मुझफरपूरजवळच जुन्या काळातली वैशालीची

३६

।। संस्कृती ।।