पान:Sanskruti1 cropped.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असते. हे परीक्षण श्रद्धाळू मनाला जरी धक्का देणारे असले, तरी चिकित्सकांना ग्रंथातील नवी ऐतिहासिक संगती दाखविणारे असते. रामायणात असे काही होत नाही. रामायणातील टोचणा-या या जागा मुळात ख-या म्हणून गृहीत केल्या, तर स्तुतिपाठ करणा-या कुशीलवांची जयकथाच भ्रष्ट होते. आणि या जागा जर प्रक्षिप्त म्हणून गृहीत केल्या, आणि उदात्त भाग मूळचा गृहीत केला, तर रामाच्या दिव्यत्वाला हानी पोहोचविणारा हा भाग धर्मभोळ्या आस्तिकांनी प्रक्षिप्त का करावा, याचा पत्ता लागत नाही. इरावतीबाईंनी रामायणकथेत कौशिक-गोत्रीयांनी घातलेल्या भरीसंबंधीही उल्लेख केलेला आहे. महाभारताच्या वर्धनात भृगुवंशीयांनी जशी भर घातली आहे. तशी कौशिक-गोत्रियांनी रामायणात भर घातली आहे, असा बाईंचा मुद्दा आहे, हा मुद्दा विचारार्ह आहे. चटकन तो मान्य किंवा अमान्य करिता येणार नाही. मात्र हा मुद्दा ज्या प्रकारच्या पुराव्यांनी मांडिला जावयाला पाहिजे, त्या प्रकारचा पुरावा बाईंनी दिलेला नाही. सुखटणकरांनी महाभारतात भृगुवंशाची भर नोंदविताना सूतांच्या वाड्मयाची धार्मिक प्रतिष्ठा गृहित केली आहे. आणि भृगुवंशातील ऋषींना सगळ्याच धार्मिक वाङ्मयात जी भर घातली, तिचे दिशासूचन केले आहे. भृगूंची भर एकट्या महाभारतापुरतीच सीमित नाही. तिचा काही संबंध स्मृतिग्रंथांशीही आहे. रामायण हा कुशीलवांचा ग्रंथ असल्यामुळे कुशीलवांच्या या ग्रंथाला धर्मवाङ्मय म्हणून प्रतिष्ठा केव्हा मिळाली, हे सांगितले पाहिजे, आणि त्यानंतरच्या काळात धर्मवाड्मयात भर घालण्याइतके महत्त्व कौशिकांना मिळाले होते काय, हे ही सांगितले पाहिजे. महाभारत हा ग्रंथ ज्याप्रमाणे शैववैष्णव अशा दोघांचाही ग्रंथ होता, उस रामायणाचे नाही. रामायण हा वैष्णवांचा जास्त लाडका ग्रंथ आहे. विशेष विशेषतः माध्व आणि रामानुजपंथीय वैष्णवांची एक भिन्न रामायणपरंपराही आहे. रामायणात भर पडण्याचा संभव या वैष्णव परंपरेकडूनही आहे, आणि दूच्या षड्दर्शनांपैकी एक वैशेषिक दर्शन हे कौशिकांचे आहे. तेव्हा कौशिकांनाही चा एक काळ असण्याचा संभव आहे. पण ही सगळीच मांडणी अधिक तपशीलवार पुराव्यांनी व्हावयाला पाहिजे. || संस्कृती ।। १७९